😊🌹 Very Nice Poem🌹 😊
आनंदात असताना
सुखात भागीदार
कुणीही चालतं,
पण दु:खात रडताना
अश्रू पुसायला ,
आपलंच माणूस लागतं ...
घोळक्यात असताना
दंगामस्ती करायला
कुणीही चालतं..
पण एकांतात असताना
गुपित सांगायला ,
आपलंच माणूस लागतं ...
वरवरच्या जखमांना
फुंकर घालायला
कुणीही चालतं ...
पण मनात खोलवर
रुतलेल्या जखमांना
फूंकर घालायला
आपलंच माणूस लागतं ...
काळाच्या अंधारात
विरणार्या आठवणींसाठी
कुणीही चालतं ...
पण मनाच्या कप्प्यात
घर करण्यासाठी
आपलंच माणूस लागतं ...
कायमचंच रुसण्यासाठी
अबोला धरण्यासाठी
कुणीही चालतं ...
पण आपल्यावर
रुसण्यासाठी
रुसवा आपला
काढण्यासाठी
आपलंच माणूस लागतं ...
यशाच्या शिखरावर
बेहोश होण्यासाठी
कुणीही चालतं..,
पण अपयशाच्या दरीत
तोल सावरण्यासाठी
"आपलंच माणूस लागतं ..."
Thursday, 19 May 2016
Very nice poem
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment