Wednesday, 25 May 2016

नवरा बायको

प्रेम लग्नानंतरच...

ऐकदा एक फोन आला
म्हणाली छान लिहीता,
कवी महाशय सांगा ना
तुम्ही कुठे रहाता...

मी ही थोडा बावरलो
भलतच हे अघटीत,
डायरेक्ट पत्ता विचारते
बाई पहिल्याच भेटीत....

हळुहळु जिव गुंतला
रोज फोन यायचा,
घरात असल्यावर जीव
धाकधुक व्हायचा....

कळलं जर बायकोला तर
आपलं काही खरं नाही,
या वयात प्रेम करणे
हे काही बर नाही.....

तासनतास चॅटींग मग
व्हाटसपवर करायचो,
मीही मलाच विसरून
तिचा होऊन उरायचो....

बस झाल म्हणलं आता
ऐकदा तरी भेट दे,
मोहरलेली ,मंतरलेली
सोनेरी पहाट दे......

ठरला दिवस ठरली वेळ
ठरल्या जागी गेलो मी,
जवळ जाताच तिच्या
कावरा बावरा झालो मी....

दुसरी तिसरी कुणीच नसुन
होती माझीच बायको,
हल्ली तुम्हाला सुचतात म्हणे
धंदे ते नको नको.....

कसा बसा घरी आलो
युद्ध घनघोर चाललेलं,
ऐकवत होती ऐकेक शब्द
फोनवर बोललेलं.....

आपल्या ताटातलं सोडुन म्हणे
दुसर्याच्या ताटावर डोळा,
वाढायला गेलं बुंदी तर
आवडतो शंकरपाळा...

कधीकधी झाला प्रसंग
डोळ्यापुढे आणतो,
चुकुन कुणाचा आलाच फोन
तर ताई असचं म्हणतो.....
😷😄😷😜🙄🙃😎😘😇

No comments:

Post a Comment