Monday, 23 May 2016

Modi Modi मोदी मोदी sarkar

पंतप्रधानाना खुले पत्र ...

आदरणीय श्री. मोदी जी,

आमची लायकी नाही तुमच्यासारखा पंतप्रधान पहायची.

देशातील बहुसंख्य लोकांना तुमच्या कामाची कदर नाही.

तुम्ही सोळा सोळा तास काम करता,

रात्री प्रवास करुन वेळ वाचवता,

पण तुमच्या या बलिदानाची स्तुती हे भित्रे आणि मनोरुग्ण लोक कधीच करणार नाहीत.

हे लोक साठ वर्ष एका कुटुंबाकडे देश सोपवतात....

पण तुम्हाला पाच वर्ष शांततेने काम करुन देणार नाहीत.

हा देश खोटी  देशभक्ती,पैसा,
प्रसिद्ध आणि आळशी वृत्ती असलेल्या लोकांचा आहे.

यांची अशी अपेक्षा आहे की या देशाने आम्हाला सगळं दिलं पाहिजे....

पण मी देशासाठी काहीच करणार नाही.

मला पाणी चोवीस तास पाहिजे पण मी एकपण वृक्ष लावणार नाही.

आणि ते काम तुम्ही केल पाहिजे अशी अपेक्षा ठेवणार.

यांना आपलं चार माणसांचं कुटुंब चालवता येत नाही....

पण देश कसा चालवायचा ते मात्र तुम्हास बरोबर सांगतील.

वा !!!!!!!!!!!

हि गोतावळ तुमचा बदला घ्यायला बघते आहे.....

जसा काय तुम्ही पंतप्रधान बनुन जगातला सर्वात मोठा गुन्हा केलाय.

यांना घरवापसी नको आणि धर्मपरिवर्तन बंदी कायदा पण नको.

दादरी कांडात ह्यांची रांग लागली पण देशासाठी बलिदान देणाऱ्या संतोष महाडीक कडे कोणीच आलं नाही.

गोवंश हत्या बंदी कायदा असताना उघडपणे गोमांसाच्या पार्ट्या होतात. हेच लोक अहिंसेसाठी निदर्शने करतात

मुलींची छेड काढणारा, देशद्रोही कन्हय्या याला खरे बलीदांन विसरुन समर्थन केले जाते.

तुमच्या नावाचा उल्लेख करुन तुमचा अपमान करतात.

असहिष्णूता म्हणून पुरस्कार परत करतात.

पण निर्भया हत्याकांड, २६/११ स्फोट यांसारखे प्रसंग दिसत नाहीत.

बिहार निवडणुकाच पहा...

लोकांनी १० वी १२ वी पास/ फेल उमेदवार निवडलेत.

आता जनताच अशी आहे तर त्यांचे प्रतिनिधीत्व करणारे कसे असणार.

तुम्ही देशासाठी येवढं काम करता आणि तेच लोकं तुम्हाला देशभक्ती शिकवतात.

मह्तआश्चर्यम ....!!!!! 

 
सत्यपरिस्थीती अशी आहे की तुम्ही पंतप्रधान झाले आहात हे या लोकाना सहन होत नाही.

ज्यांची अपेक्षा असते की माझ्या घरासमोरचा कचरा मनपाने उचलावा पण मी हात लावणार नाही.....

त्यांची बोंबाबोंब एवढी आहे की सगळा देश जसा काय सर्वनाशाकडे चाललाय.

हे सगळे एक वस्तुस्थीती स्विकारत नाहीत की देश बळकट होतोय, देश प्रगती करतोय.....

पण नाही.......

यांना तुरडाळ १ रुं किलो, कांदे फुकट पाहिजेत.

तुम्ही भ्रष्टाचार बंद करणार आणि या लोकांना असे सकारात्मक बदल नको आहेत.

लोकांना फुकट खायची सवय लागली आहे.

आपला इतिहास साक्ष आहे....

कोणी स्वताला बदलवणार नाही पण देश बदलला पाहिजे हे नक्की वाटणार.

पन्नास हजाराचा स्मार्टफोन वापरणार.....

3G, 4G पॅकेज वापरणार....

आणि बोलणार " काय मोदी सरकारमधे काही खरं नाही. किती महागाई आहे".

२९७ रुपयाचा 3G पॅकेज लागतो आणि तुरडाळ, कांदा फुकट पाहिजे.

रस्त्यावर पान खाऊन थुकणारा, सार्वजनिक नळावर पाणी फुकट घालवणारा विचारतो अच्छे दिन कधी येणार.

अशी आपली जनता साहेब.

तुम्ही जगातल्या १० नामवंत आणि  प्रातिभावान व्यक्तीमधे समाविष्ट आहात पण यांना त्याच काही नाही पडल.

तुम्ही या वयात आराम करायला पाहिजे तर तुम्ही १६ तास काम करता आणि तरुणांनी काम करायला पाहिजे तर ते आराम करुन देश बदलण्याची कल्पना करतात.     

तुमच्या कामाची त्यागाची ईथे काही किंमत नाही.

तुम्ही जगाचं नेतृत्व कराल असं तुमचं व्यक्तीमत्व आहे,

पण या देशातील जनतेला त्याची किंमत नाही.

मला मोदीजींबद्द्ल आदर होता, आहे, आणि राहणार....

काहींना ते पटणार नाही.

पण मला त्याचे वावगे नाही.

वैचारीक दरिद्री का श्रीमंती हे काळच ठरवेल.

दुर्दैव, निम्मे लोक हे फोरवर्ड देखील करणार नाहीत.

तरी, सत्य आणि खरे ते मी पाठवणारच.

पाठवा नाहीतर जुने सरकार आठवा..................
🤔🤔🤔

No comments:

Post a Comment