Thursday, 19 May 2016

आमची शेती

आजचा शेती सल्ला   .जिवामृत बनवीने .
सर्वच पिकांसाठी उपयुक्त
जीवामृत ठिबकद्वारे देण्यात बऱ्याच जणांना अडचणीचे अनुभव आहेत. जिवामृतातील शेणामुळे. ड्रिपच्या   लॅटरल (पाईप) चोक होतात. त्यामुळे ड्रीप वापरणारे शेतकरी जीवामृत वापरण्याचा कंटाळा करतात. बाजारात काही कंपन्यांनी यासाठी फिल्टरही बनवले आहेत. पण सर्वसामान्य शेतकऱ्याला जर ती किंमत परवडणारी नसेल तर तो परत आपल्या रासायनिक पद्धतीकडे वळतो.
जीवामृत बनविण्याच्या पद्धतीत थोडासा बदल केल्यास तयार होणारे जीवामृत कुठल्याही कंपनीच्या ठिबक (ड्रिप) संचाद्वारे अथवा स्प्रिंकलर द्वारे अगदी सहज देता येते.

यासाठी लागणारे साहित्य —---
१ किंवा २ किलो गायीचे ताजे शेण
५ लिटर गोमूत्र
१ किलो बेसन पीठ किंवा द्वीदल धान्याचे पीठ, सोयाबीन शक्यतो नको कारण त्यात तेलाची मात्रा जास्त आहे. बेसन पीठ आपण स्वत: डाळ दळून तयार केल्यास उत्तम , कारण तयार मिळणाऱ्या पीठात काय भेसळ असेल हे सांगता येत नाही.
१ किलो अशुद्ध गुळ (काळा गुळ) किंवा ३ लिटर उसाचा रस. शक्य असल्यास उसाचा रसच वापरावा. बाजारातील कुठल्याही रसवंतीमधून समक्ष पिळून घेतल्यास शुद्धतेची साशंकता अजिबात नसते. उसाच्या रसाने जिवामृतातील तसेच आणखीही इतर द्रावणातील किण्वन प्रक्रियेचा वेग जास्त असतो. बाजारातील गुळात काही रासायनिक अशुद्धी असू शकतात. खात्रीच्या गुऱ्हाळातून किंवा दुकानातील असेल तर जरूर वापरावा.
शेतातील ज्याठिकाणी रासायनिक खतांचा वापर किंवा तणनाशके मारलेली नसतील अशा ठिकाणची (बांधावरची) मूठभर माती. बांधावरची यासाठी कि बांधावर कुठल्याही प्रकारच्या रसायनांचा वापर झालेला नसतो. व ती माती निसर्गत: सुपीक असते.
पाणी हे शक्यतो बोअरचे किंवा विहीरीचे असावे.

कसे तयार करावे —---
गोमुत्र, बेसन पीठ, मूठभर घेतलेली माती, उसाचा रस किंवा गुळ घेतला असल्यास तो पाण्यात कालवून ड्रममधे टकताना स्वच्छ फडक्याने गाळून घ्यावा. हे सर्व साहित्य प्लास्टिकच्या २०० लिटर पाणी बसेल अशा ड्रममधे घ्यावे व नंतर त्यास पाण्याने पूर्ण भरावे. १ किंवा २ किलो ताजे शेण फडक्यात घेऊन त्याची पोटली बांधावी व ही पोटली ड्रममधील पाण्यात बुडेल अशी टांगावी. हे द्रावण सावलीच्या ठिकाणी ४८ तास भिजत ठेवावे. यादरम्यान दिवसातून दोनदा लाकडी काठीने ढवळावे. ४८ तासानंतर द्रावण फडक्याने गाळून घ्यावे.
या द्रावणत आपण शेण पाण्यात मिसळत नसल्याने. शेणाचा चोथा द्रावणात नसतो केवळ शेणातील जिवाणूच द्रावणात प्रवेश करतात व वाढतात. द्रव पदार्थांचा जास्तित जास्त वापर केल्यामुळे अशा प्रकारे बनवलेले जीवामृत फिल्टरला चोक करीत नाही तसेच स्प्रिंकलर मधे वापरण्यास उपयुक्त आहे

No comments:

Post a Comment