....एका माणसाची कार पार्किंग मधून चोरीला गेली. दोन दिवसांनी कार परत जाग्यावर पार्क केलेली आढळली.
आत मध्ये एक लिफाफा होता. त्यात माफी पत्र होतं की “गावी आईची तब्येत अचानक खालावली होती त्यासाठी तातडीने रातोरात निघणे आवश्यक होते. परंतु इतक्या बेरात्री आणि सुट्ट्यांच्या सिझनमधे गाडी मिळू शकली नाही, सबब आपली गाडी वापरली. आपल्या गैरसोयीबद्दल दिलगीर आहे.....गाडीत पूर्वी एवढेच पेट्रोल ठेवले आहे आणि फुल न फुलाची पाकळी म्हणून उद्या रात्रीची "सैराट" सिनेमाची चार तिकिटे आपल्या कुटुंबासाठी ठेवली आहेत. मला मोठ्या मनानी माफ करावे...... ही विनंती”…..
चिट्ठी मधली स्टोरी जेन्युईन वाटल्याने आणि गाडी परत जशीच्या तशी जाग्यावर नीट मिळाल्यामुळे सगळं कुटुंब शांत झालं. दुसऱ्या दिवशी, शनिवारी संध्याकाळीच सगळं कुटुंब आधी पाव-भाजी आणि मग "सैराट"साठी बाहेर पडलं (तेंव्हा त्या सिनेमाची तिकीट ब्लॅकमधे सुद्धा सहज मिळत नव्हती)
रात्री परत घरी आले तो घराचं दार लोटलेलच दिसलं. आत जाऊन पाहतात तर काय! घरातल्या सगळ्या किमती चीज वस्तू गायब, कपाटं फोडलेली.....बाहेर हॉलमधल्या टिपॉयवर लिफाफा होता..."आवडला का सिनेमा?....बाय द वे, ह्याला पण म्हणत्यात "सैराट"
व्हा आता झिंगाट...😭😭😭😭😭
Thursday, 19 May 2016
Sairat zal ji in zigat style
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment