सध्या संभाजी महाराजांवर एक मेसेज सर्वत्र
फिरत आहे...
छत्रपती संभाजी महाराज.
ऊंची = 7.5 फुट.
वजन= 170 ते 200 किलो.
छाती= 75.
तलवार=4 फुट लांब आणी 65 किलो वजन.
जेवन = फक्त नाश्ता 12 भाकर्यांचा 2 लिटर दुध.
लढाई = 128 युद्ध कधी ही न हरता, 500 ते 1000
सैन्य एकटे मारुन टाकायचे.
कारनामे = वाघ सिंह फाडुन टाकला.
.... आहे का आज असा कोणी...... छत्रपती
संभाजीराजाना मानाचा मुजरा.......
यातील सत्य जानुण घेण्याचा एक प्रयत्न..
आपण वरील माहितीतील एक एक मुद्दे घेउ ...
१) उंची ७.५ ???
● सत्य- शिवरायांची ऊंची जास्तीत जास्त
५.५ ते ५.८ एवढीच असावी . ते जेव्हा अफजल
खानास भेटले तेव्हा त्यांचे मस्तक खानाच्या
छाती एवढे लागले . म्हणजे खानाची ऊँची
जास्तीत जास्त ७ फुट असेल. (हव असल्यास
तपासून पहा)
शंभूराजे हे शिवरायांपेक्षा उंच होते असे मानले
तरी ते जास्तीत जास्त ६ फुट असतील . आज
भारतातील प्रसिद्ध रेसलर The Great Khali
याची ऊँची ७ फुट आहे . आणि आज तो कसा
चालतो ते आपण पाहिल असेलच .
ज्याची ऊंची ७ फूटापेक्षा जास्त असते त्याला
कंबरेचा त्रास होतो हे सर्वांना ठाउक आहेच.
आणि पुन्हा एवढ्या वजनाचा माणूस चपळ असू
शकतो का हाही प्रश्न आलाच ..
२) वजन १७०-२०० ???
● सत्य- माझी ऊंची ६ फुट आहे आणि माझ वजन
आहे ७५ किलो आहे .
संभाजी राजे हे व्यायाम करत असत त्यामुले ते
बळकट होते . तरी सुध्दा त्यांचे वजन जास्तीत
जास्त ८०-ते १०० असावं .
ही गोष्ट आपण आपल्या तेवढ्याच उंचीच्या
मित्रांना पाहून सहज समजू शकतो.
३) तलवार ही ४ फूटाची असू शकते . पण तिचं वजन
६५ किलो हे शक्य नाही.
●
शिवरायांची भवानी तलवार जी आज
सातारा येथे आहे ती पाहिल्यावर तीच वजन
जास्तीत जास्त २ ते ४ किलो असेल.
४) शंभूराजांचे कारनामे- वाघ सिंह फाडले ??
● वाघ सिंह फाडले हे कारनामे नाही तर तो
शिकारीचा छंद आहे . शंभूराजांचे कर्तुत्व
यापेक्षा फार मोठे आहे . त्यांनी एकाच वेळी
औरंगजेब इंग्रज ,पोर्तुगीज, डच, सिद्दी अशा
बलाढ्य शत्रुशी लढा दिला.
Thursday, 19 May 2016
Sambhaji maharaj संभाजी महाराज
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment