'कन्यारत्न' ...
डॉक्टरांच्या समोर जोडपं बसलं होतं.
'डॉक्टर,
आम्हाला मुलगी नकोय !'
होणाऱ्या बाळाचे बाबा बोलले.
'तुम्हाला कसं कळलं
मुलगीच आहे म्हणून?'
डॉक्टरांनी विचारलं.
'तुम्ही टेस्ट करायला नकार दिलात.
मग आम्ही शेजारच्या राज्यातील सोनोग्राफी सेंटरवर टेस्ट करून आलो.'
बाळाचे बाबा बोलले.
'मग तिथंच का केलं नाहीत अबॉर्शन?'
डॉक्टर म्हणाले.
'तिथं सोय नव्हती.
त्यांनी दिला होता पत्ता एका डॉक्टरचा. पण त्यांची फी खूपच जास्त वाटली. मग म्हटलं की तुम्ही ओळखीचे आहात. लाखाऐवजी हजारात काम होईल.'
बाळाचे बाबा निर्विकारपणं बोलले.
'मी काय कसाई वाटलो काय तुम्हाला?' डॉक्टर संयम ठेवत पुढं म्हणाले,
'अहो, तुम्हाला पहिली मुलगीच आहे'
ईतका वेळ गप्प बसलेली बाळाची आई म्हणाली, 'म्हणून तर दुसरी मुलगी नकोय आम्हाला. दुसरा मुलगाच हवा. दोन मुली नकोत!'
डॉक्टरांनी आईच्या मांडीवर बसलेल्या त्या पहिल्या मुलीकडं पाहिलं. निरागस, निष्पाप, बोलके डोळे. हसरा चेहरा. नजरानजर होताच ती बाहुली डॉक्टरांकडे झेपावली. त्या चिमण्या जिवाला डॉक्टरांनी कवेत घेतलं.
डॉक्टर काही बोलत नाहीत हे बघून मुलीचे बाबा म्हणाले, 'फी व्यवस्थित देउ आम्ही. शिवाय ही बातमी कुठेही लीक होणार नाही याची खात्री !'
डॉक्टरांचे डोळे आता लकाकले. होणाऱ्या बाळाच्या आईबाबांना ते म्हणाले, 'तुमचा विचार पक्का आहे?
तुम्हाला खरंच दोन मुली नको आहेत?
परत विचार करा.'
मुलीचे बाबा म्हणाले,
'पक्का आहे विचार.
दोन मुली नकोत.'
'ठीक आहे तर मग.
आपण आईच्या पोटातली मुलगी राहू देउ. या पहिल्या मुलीला मी मारून टाकतो. म्हणजे तुम्हाला एकच मुलगी राहिल.' असे म्हणत डॉक्टरांनी टेबलवरची सुरी उचलून त्या पहिल्या मुलीच्या गळ्याला लावली.
आणी त्या मुलीची आई मोठ्यांदा किंचाळली,
'थांबा डॉक्टर...
काय करताय?...
तुम्ही डॉक्टर आहात का कसाई?'
डॉक्टर शांतपणे मंद हसत दोघा आईबाबांकडे बघत होते. निष्पाप बाहुली हसत खेळत होती.
दोनच क्षण ...
दोनच क्षण शांततेत गेले.
अन आईबाबांच्या लक्षात सारा प्रकार आला. ते भयानक खजिल झाले.
ईतकंच म्हणाले,
'आम्हाला माफ करा डॉक्टर.
आम्ही कसाई व्हायला निघालो होतो. आमची चूक आम्हाला कळली.'
ते जोडपं कडेवरच्या आणी पोटातल्या आपल्या दोन्ही राजकन्यांसह केबिनमधून बाहेर पडते झाले.
ते बाहेर पडत असताना डॉक्टर म्हणाले
'आणखी एक सांगायचं राहिलंचं..
आणि तेही तुम्हाला सांगायचं कारण असं कि, मला तुमचा निर्णय बदलल्याची मनोमन खात्री झाली म्हणुनच'.
'आमच्या व्यवसायात देखिल काही राक्षस प्रवृत्तीचे लोक आहेत हे दुर्दैव आहे. पण ते ईतक्या नीच थराला गेले आहेत की, सोनोग्राफीत मुलाचा गर्भ दिसत असुनही, पैशासाठी तो मुलीचा आहे असे तुम्हाला सांगितले आहे !'
आता मात्र आईबाबांच्या पायाखालची जमिनच सरकली !
संदेश चांगला वाटल्यास पुढे पाठवायला हरकत नसावी .
SAVE GIRL CHILD...
No comments:
Post a Comment