School म्हणजे स्कूल म्हणजे स्कूल असतं
नावडत्या पीरियड ला सुद्धा फुल असतं
काय म्हणता?
सगळ्यांचं स्कूल सेम असतं?
सगळ्यांचं आपल्या स्कूल वर प्रेम असतं?
असलं तर असूदे
प्रेम वाटलं तर वाटुदे
तरीसुद्धा, तरीसुद्धा
स्कूल म्हणजे स्कूल म्हणजे स्कूल असतं
नावडत्या पीरियड ला सुद्धा फुल असतं
जूनच्या रिमझिम पावसात
ओल्या मातीचा गंध
नवीन दप्तरात भरताना
नव्या कोरया पुस्तकांचा सुगंध
नाचत बागड़त शाळेत जायचं असतं
मित्रानो, स्कूल म्हणजे स्कूल म्हणजे स्कूल असतं
देसाई मैडमशी इतिहासाच्या लढाया लढताना
भूगोलाचा पृथ्वीचा गोल आपल्या उत्तरपत्रिकेवर मार्क्स म्हणून येताना
p.t. आणि drawing च्या पीरियड ला मात्र
अटेंशन फुल ठेवायचं असतं
कारण, स्कूल म्हणजे स्कूल म्हणजे स्कूल असतं
गणिताच्या पीरियडला ओणवं उभं राहाताना
मराठीच्या तासाला कोंबडा बनताना
वहिच्या कागदाचे विमान बनवून उडवताना
तिसऱ्या बेंचवरच्या "ति"च्या पासून लपायचं असतं
कारण तेच खरं आपलं ब्यूटीफुल असतं
हो रे टवाळानो, स्कूल म्हणजे स्कूल म्हणजे स्कूल असतं
कबड्डी खोखो खेळताना भरपूर लागयचं
मग तेच झोंबणारं लाल औषध लावायचं
Match जिंकल्यावर मित्रांनी खांद्यावर उचलून घ्यायचं
आपलं मन वर्ल्ड कप जिंकल्यासारखं धुंद असतं
ख़रच स्कूल म्हणजे स्कूल म्हणजे स्कूल असतं
प्रार्थनेला हळूच एक डोळा मिचकावत इकडे तिकडे पहायचं
मधल्या सुट्टीची बेल झाली की लगेच पळायचं
मराठीच्या पुस्तकात पिंपळाचं पान, मोरपीस जपून ठेवायचं
ते वय खरंच खुळ असतं
आणि म्हणून स्कूल म्हणजे स्कूल म्हणजे स्कूल असतं
Lab मधला सांगाडा नक्की कोणत्या माणसाचा असतो?
लिटमस पेपर गुलाबीच का असतो?
यूरेका म्हणून ओरडण्याआधी आर्किमिडीज़ अंघोळ न करता राहतो?
न्यूटन पडलेलं सफरचंद न खाता उपाशी का राहतो?
एक ना अनेक प्रश्न?
न्यूटन, आर्किमिडीज़, पायथागोरस सगळ्यांशीच् आपलं हाडवैर असतं
स्कूल म्हणजे स्कूल म्हणजे स्कूल असतं
हा हा म्हणता 10 वर्ष सरली
शाळेची ती मजा आता आयुष्यात नाही उरली
आता काही चुकलं तर शिक्षा कोण देणार
काळे सर आता कान कसा पिळणार?
कितीही मोठे झालो तरी आपलं मन लहान मूल असतं
काय सांगू मित्रानो स्कूल म्हणजे स्कूल म्हणजे स्कूल असतं
त्या दिवशी 25 वर्षानी शाळेच्या जवळून जाताना
शाळेची जूनी इमारत माझ्याकडे आशेने पहाताना
असं वाटलं.....
जिने माझ्या जीवनाचा पाया रचला
तिला आज माझी गरज आहे
तिचं माझ्यावर कधीही न फेडता येणार ऋण आहे
तरीही....स्कूल म्हणजे स्कूल म्हणजे अजूनही स्कूलच आहे
सर मैडम तुम्ही परत या
आमच्या मुलांना शिस्त लावा
आदरयुक्त भीती त्याना माहित नाही
गुरु देवो भव हे त्यांच्या गावीच् नाही
संस्कार, विद्यार्जनासाठीच स्कूल असतं
अगदी खरय मित्रानो
स्कूल म्हणजे स्कूल म्हणजे स्कूल असतं
आपल्या नावडत्या पीरियड ला सुद्धा फुल असतं
No comments:
Post a Comment