प्रिय ,
आर्ची.....
बाळा मी बोलतोय ,
माझ्या बाळा तु जरी
चीरडुन गेली आमच आयुष्य
तरी,
प्रींन्स ने तुमच्या सोबत जे केल ते
लय वाइट.
बाळा त्याला काय माहीत,
माझ्या या काळजाच्या तुकड्याला
मी कीती जपल होत.,.
.
तु तुझ्या आईला म्हनाली होतीस ना डोळ्यात
पाणी आनुन,
अन्ना बोलतील का ....
हा मी बोलतोय!
बाळा मला विचारायचय तुला काय कमी पडलो
आम्ही तूला वाढवीण्यात....
बाळा जातीपाती च्या चीखलातला
मी नाही ......
प्रतेक हौस मोज हात जोडून उभी होती
तुझ्या समोर .
अशा वेळी मी
काहीच न कमवणारय पोरा सोबत लग्न... कस मान्य
करु.
कोणता गुण होता परशात म्हणून मी तुझा हात त्याच्या
हातात द्यायचा होता..
किशोर वयात मन हळवं व शरिराची भुक तिव्र असते,
हे
मान्य आहे मला,
पण तेवढ्या एकाच कामा साठी जन्म
नाही झाला आपला.
या वयात उज्वल करियर करायचे , सोडून तुम्ही
आजकालची पिढी प्रेमातच करियर करत
आहात.
बाळा तुला जिवापाड जपनारी तुझी आई,
तुझ्या केसालाही धक्का लागु नये याची
काळजी घेनारा भाऊ ,
आजी ,आजोबा मामा
मावशी काका काकी आत्या, या सगळ्यांचा
एकदाही विचार आला नाही का तुला...
एका मुला साठी एका झटक्यात आम्हाला लाथाडून
गेलीस.
अग लहान पणी तुला झोपवाण्या साठी
तासंतास खांद्यावर घेऊन फीरायचो तेंव्हा
झोपेतही कोनाकडे जात नव्हती मला
सोडुन.
आम्हा सर्वांपेक्षा काल परवा भेटलेला तो एक पोरगा जास्त
महत्वाचा वाटला का तुला.
आर्चे हे आकर्षण फक्त तुलाच वाटत होत अस
नाही , ते प्रतेकालाच असत या वयात.
काही जगावेगळ सैराट कराव आस प्रतेकालाच वाटत
असत.
कधी तरी बोलायच होतंस ,
माझ्याशी नायतर आईशी.
अग ,सैराट व्हायला का हा यवढाच मार्ग नाही.
राणीलक्ष्मी बाई सारख
देशासाठी ,
मेधा पाटकर समाजा साठी ,
मदर
तेरेसा रंजल्या गांजल्यांसाठी सैराट झाल्या होत्या....
तुला माहीत आहे का तु गेल्या नंतर आपल्या तालुक्यात
पोरींना शाळा कॉलेजात पाठीवन जवळपास बंदच
केल,
आन बर्याच कोवळ्या पोरींचे लग्न
उरकीले.
मायबापांनी.
अशा सैराट होन्याच्या
भीतीन.
तु वासनांध लांडग्यांची शिकार होन्या पासून
वाचली मात्र सगळ्याच वाचतात आस नाही.
अन मग बाटले पणाची जाणीव
दोघांनाही सतावते. ...
तु गेल्या पासुन
तुझी आई कधीच हासली
नाही,
अन आमदारकीचा
उमीदवार मी स्वतःला बुडवुन घेतलं दारुत .
हे
सगळ विसरण्या साठी.
पोरीचे बाप नसलेले काहीजन मला बुरसटलेल्या
विचाराचा म्हनतीलही पण .....
बाळ आर्चे व परशा मला विचारायचय आम्हा सगळ्यांना उध्वस्त
करुन
खरच तुमच सैराट होन जरुरी होत का ?
तुझा तात्या....
No comments:
Post a Comment