Sunday, 19 June 2016

वटपौर्णिमा

बरीच लोक वटपोर्णिमा म्हणजे अंधश्रद्धा आहे व चिकित्सक व विज्ञानवादी व्हायला सांगत आहेत.त्याविषयी थोडस.
जर आज समाजात केक कापुन व पार्टी देऊन लोक लग्नाचे वाढदिवस साजरे करतात व एकमेकांना शुभेच्छा देऊन चांगल्या सोबतीची कामना करताहेत तसेच पुर्वी लोक वटवृक्षास दोरा गुंडाळुन निसर्गाच्या साक्षीने वडासारख नवराबायकोच आयुष्य दिर्घायुष्यी व्हाव,मायेची सावली त्याच्या सावलासारखी गर्द राहावी,पारंब्यासारखा संसार फुलत जावा व त्यावर भावीपिढी आनंदाने स्वार व्हावी ही मनोकामना असासची.त्यातुनच एकप्रकारे वृक्षा बद्दलची आत्मीयता दिसुन येते व काही प्रमाणात त्याच रक्षणही होण्यास कारणीभुत होत.सात जन्मी म्हणजे साथ-सोबत लाभणे.
ज्या स्त्रीवर अन्याय होतो व जीचा नवरा तिला त्रास देतो ती स्त्री कधीच मनापासुन हे व्रत करणार नाही.ज्यांना वाटत की आपल्यात खऱ्या अर्थाने सुख लाभाव ते आनंदाने साजरा करतात.काही गोष्टी स्त्रियांनी तर काही गोष्टी पुरषांनी चालु केल्या व त्या चालत आल्या.स्त्री-पुरुष समानता ही खुप महत्वाची आहे पण जर एखादी स्त्री तिच्या नवऱ्यासाठी व संसारासाठी किंबहुना दोघांसाठी काही मागण स्वइच्छेने निसर्गाच्या साक्षीने मागितल तर त्यात गैर व वाईट काय?.जो सण स्त्रीच्या चेहऱ्यावरचा व घरात आनंदाच कारण बनत असेल तर वावग काय?झाडांची पुजा ह्याच्यासारख पवित्र कार्य केल तर काय बिघडत?फक्त नवरा सांगतो म्हणुनच हा सण साजरा होत नाही................................पण आम्ही चिकित्सा करणार विज्ञानाच्या पातळीवर.बरोबर आहे चिकित्सा करावी व विज्ञानवादी व्हावे पण त्याचबरोबर प्रत्येक गोष्ट चांगली कि वाईट व ती आनंदासाठी कि दुःखासाठी ह्याचाही विचार व चिकित्सा व्हायला हवी.चिकित्सक होत असताना वृक्षांची बेसुमार तोड,प्रदुषणाच वाढत प्रमाण,आवर्षण व इतर वाढत्या समस्या कशामुळ झाल्यात?.विज्ञानाचा किती उपयोग व किती दुरुपयोग आम्ही करतो आम्ही हेही चिकित्सक नजरेन पाहिल पाहिजे.माणसाण माणुस व्हायला हव मशीन नाही.भावना आहेत त्याच्यात व त्यातुनच आनंदाचे अथवा निरनिराळे प्रयोजन समाजात आलीत.केक कापण्यान किंवा पार्टी करण्यान प्रदुषण थांबत असेल व संसार सुखी होत असतील तर ते कराव पण प्रत्येकातुन शेवटी आनंद व आनंदाच कारण हाच मतितअर्थ असतो त्यांच स्वरुप वेगळ असेल कदाचित पण भाव तोच.
ह्यादिवशी वृक्षारोपनाचा कार्यक्रम जर राबवला(कुटुंबाने) तर त्यात आनंदात,निसर्गात व येणाऱ्या पिढीस तो आनंददायी,लाभदायक ठरेल.
"संकल्पना जुनी,विचार नवे,
जगायला आनंदाचे क्षण हवे."
चालत आलय(चांगल)त्यास जपायला हवं,येणाऱ्या पिढीसाठी बदलायलाही हवं,
जुन्याच नव्याशी नात जुळायला हवं,जगण कस सार समाधानाच होऊन जायला हवं..सत्यवान सावित्री सारख प्रेमनिष्ठेच आयुष्य लाभो..
खऱ्या अर्थाने वटपोर्णिमेचा सण साजरा होवो...

No comments:

Post a Comment