Monday, 6 June 2016

Chance To win - विजयाची संधी

नदीच्या किनाऱ्यावरील एका झाडावर एक माकड त्याच्या मैत्रीण माकडीणसह गप्पा बसलेले होते.

अचानक आकाशवाणी सुरू झाली...

"जो कोणी आकाशवाणी संपल्या संपल्या ह्या नदीच्या पाण्यात उडी मारेल तो राजकुमार किंवा राजकुमारी बनून बाहेर येईल... "

       आकाशवाणी सुरूच असते.

अर्धा तास होतो. माकड,माकडीण ऐकत असतात.

मनात विचारांचे थैमान सुरू असते.

काय करू ? काय करू ? काय करू ? दोघे विचार करत असतात.

आकाशवाणी संपते,

तेवढ्यात माकडीण नदीच्या पाण्यात उडी मारते...

माकड ओरडतो, "वेडी झालीस का?

असं कुठे घडतं का ? आकाशवाणी खोटी ठरली तर..."

तेवढ्यात पलिकडून माकडीण एक सुंदर राजकुमारी बनून बाहेर येते.

ती माकडाला म्हणते,
" अरे आकाशवाणी जरी खोटी ठरली असती, तरी मी पाण्यातून बाहेर येऊन माकडीणच राहिली असते;

पण एक संधी घेतल्यामुळे आता मी राजकुमारी झाली आहे.

संधी असून फक्त विचारच करत बसल्यामुळे किंवा निर्णय न घेतल्यामुळे आज तु माकडच राहिलास.

संधी दररोज मिळत नाही.
तू संधी ओळखू न शकल्यामुळे,
शंका घेत बसल्यामुळे,
अतिविचारी स्वभावामुळे माकडच राहिलास....!!!!"

       मनातील आवाजही आकाशवाणी  सारखाच असतो.

जीवनात आपणही आलेली प्रत्येक संधी साधून संधीचे सोने करावे;

अन्यथा माकडाप्रमाणे विचार करीत फांदीवरच बसून राहावे...
   🌴🌾🌴

No comments:

Post a Comment