Friday, 3 June 2016

शनी महाराज

ॐ शं शनैश्वरायनमः
उद्या श्री शनीमहाराज जयंती शनीअमावस्या

उपासना -भक्ती -साधना

उद्या वैशाख कृ.१५ (शनि अमावस्या) म्हणजे शनि जयंती....शनिभक्तांसाठी अतिशय महत्वाचा दिवस...उद्या अमावस्या ठीक सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी सुरु होत आहे आणि ती दुसऱ्या दिवसांपर्यंत आहे. शनि जयंती हा दिवस श्रीशनिमहाराजांच्या भक्तांसाठी अतिशय महत्वाचा दिवस असुन या दिवशी केलेली शनि आराधना अधिकस्य अधिकं फलं या न्यायाने जास्त लाभदायक होते. उद्या शनिउपासनेपूर्वी संपूर्ण दिवस मांसाहार (कोणत्याही स्वरुपात), आणि मद्यपान करु नये हे आवर्जून लक्षात ठेवावे...दिवसभरात कोणतेही महत्वाचे व्यवहार, विशेषत: उधार रक्कम देणे, कर्ज घेणे देणे, महत्वाच्या कागदपत्रांवर सह्या करणे, भेटीगाठी घेणे टाळावे ही नम्र विनंती..संपूर्ण दिवसभरात वादविवाद, भांडणे यापासून दूर रहावे...( सचिन मधुकर परांजपे ®™)

उपासना:- शनि अमावस्या सकाळी ११.५० ला सुरु होत असली तरी सूर्यास्तानंतर शनि महाराजांचा जन्म झालेला असल्याने खाली दिलेली उपासना सुर्यास्तानंतर म्हणजे संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांपासून सुरु करावी (उपासना समाप्ती त्यानंतर केव्हाही करावी) सर्वप्रथम ७ वाजून १० मिनिटांपुर्वी स्नान वगैरे उरकून, एखादे कांबळे-घोंगडे आंथरुन पश्चिमाभिमुख (तोंड पश्चिमेला करुन) बसावे. श्री गणेश, कुलस्वामिनी, कुलदैवत, सद्गुरु यांचे स्मरण करुन त्यानंतर श्रीशनिमहाराजांचे स्मरण करावे. प्रार्थना करावी. हे झाल्यानंतर खालील शनिमंत्राचा जप १०८ वेळा मध्यम स्वरात करावा...( सचिन मधुकर परांजपे ®™)

॥ॐ निलांजन समाभासं, रविपुत्रं यमाग्रजम,छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम ॥

...या मंत्रजपानंतर खालील अतिशय दुर्मिळ असा "शनिमालामंत्र" वाचावा...
------------------------------------------------

अस्य श्रीशनैश्चरमालामन्त्रस्य काश्यप ऋषिः, अनुष्टुप् छन्दः,
शनैश्चरो देवता, शं बीजं, निं शक्तिः, मं कीलकं,
समस्तपीडा परिहारार्थे शनैश्चरप्रसादसिद्ध्यर्थे जपे विनियोगः ।
शनैश्चराय अङ्गुष्ठाभ्यां नमः, कृष्णवर्णाय तर्जनीभ्यां
नमः, सूर्यपुत्राय मध्यमाभ्यां नमः, मन्दगतये अनामिकाभ्यां
नमः, गृध्रवाहनाय कनिष्ठिकाभ्यां नमः, पङ्गुपादाय करतल-
करपृष्ठाभ्यां नमः, एवं हृदयादि न्यासः ॥

ध्यानम् ॥

दोर्भिर्धनुर्द्विशिखचर्मधरं त्रिशूलं
     भास्वत्किरीटमुकुटोज्ज्वलितेन्द्रनीलम् ।
नीलातपत्रकुसुमादिसुगन्धभूषं देवं
     भजे रविसुतं प्रणतोऽस्मि नित्यम् ॥

ॐ नमो भगवते शनैश्चराय मन्दगतये सूर्यपुत्राय महाकालाग्नि-
सदृशाय क्रूर (कृश) देहाय गृध्रासनाय नीलरूपाय चतुर्भुजाय
त्रिनेत्राय नीलाम्बरधराय नीलमालाविभूषिताय धनुराकारमण्डले
प्रतिष्ठिताय काश्यपगोत्रात्मजाय माणिक्यमुक्ताभरणाय छायापुत्राय
सकलमहारौद्राय सकलजगत्भयङ्कराय पङ्कुपादाय क्रूररूपाय
देवासुरभयङ्कराय सौरये कृष्णवर्णाय स्थूलरोमाय अधोमुखाय
नीलभद्रासनाय नीलवर्णरथारूडाय त्रिशूलधराय सर्वजनभयङ्कराय
मन्दाय दं, शं, नं, मं, हुं, रक्ष रक्ष, ममशत्रून्नाशय,
सर्वपीडा नाशय नाशय, विषमस्थशनैश्चरान् सुप्रीणय सुप्रीणय,
सर्वज्वरान् शमय शमय, समस्तव्याधीनामोचय मोचय विमोचय,
मां रक्ष रक्ष, समस्त दुष्टग्रहान् भक्षय भक्ष्य, भ्रामय भ्रामय,
त्रासय त्र्रासय, बन्धय बन्धय, उन्मादयोन्मादय, दीपय दीपय,
तापय तापय, सर्वविघ्नान् छिन्धि छिन्धि,
डाकिनीशाकिनीभूतवेतालयक्षरक्षोगन्धर्वग्रहान् ग्रासय ग्रासय,
भक्षय भक्षय, दह दह, पच पच, हन हन, विदारय विदारय,
शत्रून् नाशय नाशय, सर्वपीडा नाशय नाशय,
विषमस्थशनैश्चरान् सुप्रीईणय सुप्रीणय, सर्वज्वरान् शमय शमय,
समस्तव्याधीन् विमोचय विमोचय, ओं शं नं मं ह्रां फं हुं,
शनैश्चराय नीलाभ्रवर्णाय नीलमेखलय सौरये नमः ॥

....शनिमालामंत्र या शनिपीडानाशक व संरक्षक मानला जातो. शनिपीडेपासुन रक्षण होऊन आरोग्यप्राप्ती, सुयशप्राप्ती, गुढबाधांपासुन मुक्तता होते. ही उपासना पूर्ण झाल्यावर पुनश्च शनिस्मरण, प्रार्थना करावी. कुटुंबासाठी, नातेवाईकांसाठी, समाजासाठी अभिष्टचिंतन करावे. आणि उपासना समाप्त करावी

दिवसभर:- (तोडगे)....सकाळी ११.५० नंतर करण्याचे (सचिन मधुकर परांजपे ®)

१) सकाळी ११.५० नंतर संध्याकाळपर्यंत आपल्या ऐपतीप्रमाणे गोरगरिब, मुके प्राणी यांना शिजवलेले अन्न दान करावे. त्यात प्रामुख्याने आंबवलेले पदार्थ, बेकरी प्रॉडक्ट्स, बिस्किटे, ब्रेड दान करावे. शनिजयंतीला वस्त्रदान व अन्नदानाला अनन्यसाधारण महत्व आहे.
२) संध्याकाळी उपासनेपूर्वी मारुती मंदिरात जाऊन मारुतीरायाच्या् मस्तकावर अर्धी वाटी तिळाचे तेल, ११ काळे अख्खे उडीद, चिमुटभर मीठ एकत्र करुन अर्पण करावे. (या उपाय तुळ, वृश्चिक आणि धनु राशीच्या मंडळींनी आवर्जून करावा-साडेसाती सुरु आहे म्हणून)
३) संपुर्ण घरातून एक नारळ फिरवून आणुन बाहेर नेऊन वाढवावा, त्याचा तुकडा प्रसाद म्हणून घरात आणू नये. तिथेच टाकून देणे
४) शनिचे दान:- काळे तीळ, काळे उडीद, गोडेतेल, तीळाचे तेल, शेंगदाणे, स्टीलचे भांडे, काळे कापड यापैकी जे जमेल ते, शक्य असेल ते यथाशक्ति एखादा भिकारी, अपंग यांना दान करावे.

...विनम्रपणे श्रीशनिमहाराजांना शरण जावे. प्रार्थना करावी. कल्याण चिंतावे

(पोस्ट नावासह शेअर करावी, नाव वगळून कॉपी पेस्ट करु नये. धन्यवाद).

No comments:

Post a Comment