काय आहेत *छत्रपती शिवराय...*
आपल्या ४२ पिढ्यांनी भोगलेल्या नरकांचा *स्वर्ग* आहेत *शिवराय*
सह्याद्रीच्या कडेकपारीतुन गर्जणारा *नाद* आहेत *शिवराय*
त्या कृष्णा, भिमा,... इंद्रा, गोदा आणि पंचगंगेच्या अनंत जललहरीतील *अमृत* म्हणजेच *शिवराय*
स्वराज्याच्या पाचविला पुजलेल्या प्रत्येक अन्यायाचा *न्याय* म्हणजेच *शिवराय*
धर्मवीरांच्या नसा नसतील प्रत्येक रक्ताचा धर्मवेडा *थेंब* म्हणजे *शिवराय*
मृत्युलाही कवटाळणारा काशिदांचा *शिवाजी* म्हणजेच *शिवराय*
पावनखिंडीत लढणार्या ३०० मावळ्यांचा *जोश* म्हणजेच *शिवराय*
वेडात दौडलेल्या सात वीर मराठ्यांच्या सळसळणार्या रक्ताचा *पाट* म्हणजेच *शिवराय*
अफजल्याच्या कबरीतुन आजही येणारा दिन...दिन चा *थरकाप* म्हणजेच *शिवराय*
राजमाता माँसाहेब यांचा प्रत्येक *विश्वास* म्हणजेच *शिवराय*
महाराजा शहाजीराजे यांच्या स्वप्नातील स्वराज्याची *स्वप्नपूर्ती* म्हणजेच *शिवराय*
रायबाचं लग्न सोडुन कोंढाण्याचं लग्न लावणारी तानाची *भक्ती* म्हणजेच *शिवराय*
महाराणी सईबाई साहेब यांचा *श्वास* म्हणजेच *शिवराय*
नवर्याच्या सुख दुखःत सदैव पाठिशी असणारा पुतळाबाईंचा *विश्वास* म्हणजे *शिवराय*
स्वराज्याच्या हेरखात्याची रंगभुषा बदलणारी बहिर्जींची ती *वेशभुषा* म्हणजेच *शिवराय*
किल्ले पुरंदरच्या माचीवर अचाट पराक्रम काय असतो हे दाखवून देणारे नरवीर *मुरारबाजी* म्हणजेच *शिवराय*
*मराठ्यांची आन्, बान् आणि शान्* म्हणजेच *शिवराय*
देशद्रोही गनिमांचा *कर्दनकाळ* म्हणजे *शिवराय*
अंगात ३२ हत्तींचे बळ आणुन शौर्याने लढणार्या मराठ्यांची *स्वराज्यनिष्ठा* म्हणजेच *शिवराय*
रणभुमित शत्रुपासुन भयभित होऊन पळुन न जाता, त्यावर *प्रतिकार* करणे म्हणजेच *शिवराय*
आपल्या आया बहिणीवर हात टाकणाऱ्या निच नराधमाचे हातपाय काढून चौरंगा करण्याचा *न्याय* म्हणजेच *शिवराय*
शत्रुच्या बळापेक्षा रणांगणात मावळ्यांचे निर्भिड *आत्मबल* म्हणजेच *शिवराय*
रणांगणात भयभित न होता शत्रुचा *संहार* करणे म्हणजेच *शिवराय*
हर हर महादेव ! च्या गर्जनेने मराठी माणसांच्या अंगावर येणारा प्रत्येक *काटा* म्हणजे *शिवराय*
*तुमचा, माझा, सर्वांचा श्वास आणि प्राण* म्हणजेच *शिवराय*
*३५० वर्षांनंतरही ज्यांच्यासाठी करोड़ों शिवभक्त मरायला तयार आहेत असे जगातील एकमेव व्यक्तिमत्वं म्हणजे छत्रपती शिवराय*
*हिंदूनृसिंह* म्हणुन अवघ्या हिंदुस्थानाचे *सिंहासनाधिश्वर* असणारे *महापुरुष* म्हणजे *छत्रपती शिवराय*
_*जय शिवराय... जय शिवराय... जय शिवराय*_
🚩जगदंब जगदंब🚩
No comments:
Post a Comment