Sunday, 26 June 2016

Relations नाती आणि त्यांचा अर्थ

नाती जपून ठेवा
स्वार्थ खूप झाला ,
थोडी प्रीत पेरा
गोफ सैल झाला .
          

मित्रांनो , माणूस हा समाजशील प्राणी आहे . समाजाशिवाय त्याचे अस्तित्व शून्य आहे . फुलण्यासाठी रोपांना जशी मातीची तशी माणसाला समाजाची गरज असते . अनेक पाकळ्या जेव्हा एकसंघ फुलतात तेव्हा एक सुंदर फूल उमलतं . पण त्यातल्या काही पाकळ्या मिटल्या , कोमेजल्या वा गळून पडल्या तर फूल सौंदर्यविहीन , मूल्यहीन होतं . त्याचा जगण्याचा अर्थही संपतो . आपल्या जीवनाचं पुष्पही असंच नात्याच्या पाकळ्यांनी बहरत असतं . त्याची प्रत्येक पाकळी अनमोल असते .

मी पाहिलेली , अनुभवलेली नात्यांची विलोभनीय उत्कटता शब्दांच्या कँमेरातून टिपण्याचा इथं प्रयत्न करतो आहे .

      ||   आई- वडील  ||
सार्वकालीन  सर्वश्रेष्ठ मानवी नातं
पंचमहाभूतापलिकडची सहावी महाभूतं
आपल्या घराची जीवित दैवतं
तीर्थाचे  सागर , स्नेहाचे आगर
आपल्या सौख्यासाठी स्वजीवन विसरणाऱ्या त्यागमूर्ती
आपण जन्माला येण्याआधीच आपल्यावर प्रेमसिंचन करणारे स्नेह - निर्झर

    || गुरुजन ||
आपल्या भविष्याचे शिल्पकार
आपल्या जीवनाचा प्रकाश
अज्ञान दूर करणारे वासरमणी
मानवतेचे महादूत

    || आजी - आजोबा ||
आपले जीवन फुलविणारे माळी
आपल्या लाडाचं स्थायी व्यासपीठ
सदैव आपली बाजू घेणारे व आपल्याच बाजुने न्याय देणारे प्रेमळ न्यायाधीश
स्वतःचे रुप आपल्यात पाहणाऱ्या वात्सल्यमूर्ती

  || सासू - सासरे ||
आपल्याला जन्म न देणारे आईवडील
पदोपदी जन्मदांची अनुभूती देणाऱ्या स्नेहमूर्ती
आपल्या आईवडिलांचे प्रतिरुप

    || काका - मावशी ||
आईवडिलांची उणीव भरुन काढणाऱ्या  सागर - सरिता
विशुध्द भावाचे चिंतामणी

     || आत्या - मामा ||
वडिलकीच्या नात्याची ओळख करुन देणाऱ्या सौजन्यमूर्ती

      || मामा ||
मानवी जीवनाचं एक मनोरम नातं
जेव्हा दोन मा ( आई ) एकत्र येतात तेव्हा एक मामा तयार होतो
मा + मा = मामा
आपल्या विवाहाचा विधीवत साक्षीदार

     || मामी ||
आपल्या मान सन्मानाची आरंभकर्ती
शैशव अवस्थेत आपली शुश्रुषा करणारी सेवाव्रती

        || जावई ||
आपल्या आदर भावाचं शिखर
एक मित्र , आपले हितचिंतक

     || बहिण ||
आईची पडछाया , उत्सवप्रिया सणसूचिका
मायेचा सुगंध पालवणारी स्नेह लतिका
कुठल्याही परिस्थितीत आपल्या हिताचा विचार करणारी हितचिंतिका

     || भाऊ ||
आपल्या हिमतीच्या धमन्या
आपली शक्ती सुरक्षा यांची नैसर्गिक आवरणं
आपल्या सामर्थ्याची कवच कुंडलं
आपल्या आवाजातील निनाद

    ||  साडू ||
शाश्वत बंधुता निर्माण करणारं अनोखं नातं .

     || साली / मेहुणी ||
आपले जीवन खेळकर करणारी स्नेह सरिता
आपले सासरचे वास्तव्य रमणीय करणारी हर्षवर्धिनी

    || मावस भाऊ बहीण ||
बहीण भावाच्या नात्यातील प्रीतिचा बोनस
बहीण भावाची उणीव भरुन काढणारे समर्थ पर्याय

     || आत्ये भाऊ बहीण ||
नात्यात खेळकरपणा पेरणाऱ्या तिफणी
थट्टा मस्करीतून प्रीतीचा आविष्कार करणारे जीवलग

      || भाचे भाची ||
संस्कृतीचे भान देणारे प्रीतीचे ताटवे
आपल्या दातृत्वाची शोभा वाढविणारी कोंदणं

     || पुत्र ||
भविष्याचा प्रकाश
अस्तित्वाचा अर्थ
वंशाचा कुलदीपक
कुटुंबाचा उध्दारक
म्हातारपणीची काठी

      || पुत्री ||
पहाटेचं दव , वात्सल्याचं विरजण
मायेत खोट नसणारी स्नेहनंदिनी
पवित्र प्रीतीची सह्रदयी झुळूक
मायेला वाळवी लागत नाही अशी वात्सल्यरुपा
जिची माया शिळी होत नाही अशी अक्षय प्रेमज्योती

    || नातवंडे ||
दुधावरली साय
आयुष्याच्या उतारावरील रमणीय बगिचा
अखेरपर्यंत जीवनाची गोडी टिकवून ठेवणारे मधुघट

   || मित्र मैत्री ||
ईश्वरी वरदान
रक्ताच्या नात्यालाही लाजवणारं चिरंतन नातं
विश्वासाची आधारशीला
स्वतःचेच प्रतिरुप

   || शेजार धर्म ||
मानवी मूल्यांचा ओझोन
संस्कृतीचा संधीप्रकाश
आपल्या सौख्याचा आलेख टिपणारी स्पंदन

         || प्रेम ||
आयुष्यात प्रत्येकाला हवे असणारे स्वप्न , जाच्या मिठीत गेल्यावर स्वर्ग सुख मिळते , जाच्या सोबतीने दुःखंचा डोंगर ही पार होईल अशी व्यक्ति

    || शिष्य ||
आपल्या कर्तृत्वाचा कळस
आपल्या कौशल्याची किरणं

खरंच , नातं न जोपासणारा माणूस जणू पिसारा गमावलेला मोरच ! नाही का ?

Saturday, 25 June 2016

बाटली

लहाणपणी आईने  चालू केली दूधाची बाटली.......

शाळेत जाऊ लागल्यावर  चालू केली पाण्याची बाटली ........

माध्यमिक शिक्षण चालू झाले हातात घेतली कोकाकोलाची बाटली .........

उच्च शिक्षण चालू केले  हातात घेतली बियर ची बाटली .........

ती चांगली वाटली पण त्याने तहान नाही भागली........


मग चालू  केली इंग्लिश बाटली तीने खिशाची तिजोरी आटली........

मग सुरु केली देशी बाटली ती काय बरी नाय वाटली........

तेव्हा चालू केली गावटी बाटली ती एवढी चांगली वाटली..........

ओव्हर लोड होऊन आतडी फाटली.........

मग दवाखान्यात गेलो मग डॉक्टरांनी लावली सलाईनं ची बाटली.........

पण त्या बाटली चं काही चालेना शेवटी प्राणजोत मावळ ली बाँडी घरी आणली.......

आणि आंघोळ घातली.

मग अंगावर गुलाब पाणी आणि अत्तरची बाटली........

तिने हाऊस नाय फिटली.......



चितेवर ठेवली मग राँकेल ची बाटली.........

ती मग ओतली जिवाची हाऊस तिथेच मिटली.....

---------[       ]----------

मित्रांनो दारु पिवुन गटारात पडण्यापेक्षा........

दुध पिवुन बलवान व्हा.....

    🐃🐂🐏🐄
      🚩
    {💪}

👆👍आवडले तर,

           😻

  पुढे पाठवा.👉👇

      🙈🙉🙊

👆👎आवडले नाही
           
           😤😤

           😡😡
            
तरीही पुढे पाठवा.👉👉

       😝😛😝
    
   😆😆😍😆😆

👉जनहित मे जारी👈

आपल्या ग्रुपमधील
Non Active लोकांना नमस्कार 👏

जगात असाल तर SMS पाठवा...

स्वर्गात असाल तर अप्सरा पाठवा....

ढगात असाल तर पाऊस पाठवा ...

पण

BALANCE नसेल तर MOBILE पेटवा
आणि रोज त्याची राख कपाळाला लावां....

हसताय काय .........

आता लगेच पुढच्या ग्रुपला पण पाठवा.

😜😝😜😛😜😝😝

My father best father love you baba

VERY GOOD LINE,
NAKKI VACHA.
लहान असल्यापासून आई मुलांना
सांगत असते.......

इथे जाऊ नको-------बाबा मारेल,
तिथे जाऊ नको------बाबा मारेल,
झाडावर चढू नको---बाबा मारेल,
नदीकडे जाऊ नको--बाबा मारेल,
शाळेत जा नाहीतर--बाबा मारेल,

अभ्यासाला बस नाही तर
.............................बाबा मारेल,
हे करू नको नाही तर........................ बाबा मारेल,
ते करु नको नाही तर.........................बाबा मारेल.

मग मुलं सुद्धा बाबांना घाबरतात.

बाबांच्या भयाने शाळेत जातात.

बाबाने मारु नये म्हणून अभ्यास करतात.

बाबांच्या दहशतीखाली शिकत राहतात.

हळू हळू मुलं बाबां कडे दुर्लक्ष
करुन आई वरच प्रेम करु लागतात.

मना मधून बाबांना काढून टाकतात.
आणि आईच्या चरणावर   सर्वस्व अर्पण करतात.

बाबां पासून चार हात लांबच राहतात.
मुलं आईच गाणं गातात.
मुलं आई वर कविता लिहितात.

कोणतंच मुल बाबाला दुधा वरची साय म्हणत नाही, लंगड्याचा पाय म्हणत नाही, वासरांची गाय म्हणत नाही.

बाबांसाठी मुलाकडे 'शब्दच' नसतात.

मुलाच्या पायाला ठेच लागली तरीही मुले "बापरे" म्हणत नाहीत.

स्वामी तिन्ही जगाचा "बाबांविना"
भिकारी होत नाही.

साने गुरुजीनांही "श्यामचा बाप" दिसत नाही.

आई घरात असली कि, घर कस भरल्यासारखं वाटतं.

मुलांना बाबा घरात असला की, मात्र स्मशान शांतता..................... !

मुलं शप्पथ सुद्धा आईचीच घेतात.
बाबा शप्पथेच्याही लायकीचा नसतो.

बाबा असतो केवळ मुलांच्या नावाच्या व आडनावाच्या मध्येi."नावापुरता"!

मुलं विठोबाला 'माउली' म्हणतात.
बाबासाहेबांना "भिमाई' म्हणतात.
धरणीला 'माय' म्हणतात. आणि देशाला 'माता' म्हणतात........ !

बाबा मात्र धरणीतून, देशातून आणि मुलांच्या मनातून केव्हाच झालेला असतो हद्दपार................  !

बाबा असतो कठोर, काळीज नसलेला, निर्दयी, मारकुटा........

बाबा असतो मुलांच्या स्वप्नात येणारा बागुल बुआ.............

बाबा म्हणजे केवळ रुपये, पैसे कमवण्याचे यंत्र.

तेवढं.........काम त्याने केलं की, त्याचं कर्तृत्व संपलं.........

असं असूनही बाबा मेल्यावर..........
मुलांच्या छातीत धडकी का भरते ?????????

का ओघळतो मुलांच्या डोळ्यातून पाऊस.....!

का वाटतं मुलांना पायाखालची जमीन सरकल्या सारखी..........!

का वाटत मुलांना की आपण बेवारस झाल्या सारखं....!

का हंबरतात मुलं बाबा मेल्यावर......!
का मुलं घाबरतात बाबा मेल्यावर...............!

कथा, कादंबऱ्या आणि कवितेत कधीही नसलेला हा "पत्थरदिल" बाबा..................
प्रत्यक्षात जेव्हा नसलेला होतो,
तेव्हा का वाटत मुलांना की, ...........................

बाप कुणाचा मरू नये !
बाप कुणाचा मरू नये !
बाप कुणाचा मरू नये !

डोळे मिटुन जी प्रेम करते तीला प्रेयसी म्हणतात..
डोळे उघडे ठेऊन जी प्रेम करते तीला मैत्री म्हणतात..
डोळे वटारुन जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात..
आणि स्वत:चे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला "आई"म्हणतात..

पण, डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो, त्याला" बाप" म्हणतात...🙏 naki share kara

Respect women

...ती हळदी कुंकू करते
...सौभाग्य जपण्यासाठी !
...ती देवीची 'ओटी' भरते
...मातृत्व जपण्यासाठी !
...ती घट बसवते
...प्रपंचाच्या स्थैर्यासाठी !
...ती हरतालिका पूजते
...सुखी संसारासाठी !
...ती वड पूजते
...पती प्रेमासाठी !

...कोणतं व्रत करते
...ती स्वतःसाठी ?
मग तरीही तिची थट्टा ?
...कशासाठी ?
पुरुष करतो एखादी पूजा, व्रत, उपास आपल्या बायकोसाठी ?
...म्हणतो कधी, "दमलीस ? बस जरा ! मी करेन गॅस बंद तीन शिट्टया झाल्यावर !
टेबल तर आवरायचंय ना, मी आहे ना !
आज कपाट मी आवरतो, तो पर्यन्त तू अजिबात मधे येऊ नकोस !
आज बाई येणार नाही म्हणून काय झालं,
ए चल, आज माझ्या हातचा पुलाव खाऊन बघ !
...नसेल जमत मला बायकोला 'आय लव्ह यू' म्हणायला, पण कधी ते डोळ्यांच्या भाषेत तरी मी बोललोय का ?


'स्त्री'च्या "बायको"पणाची थट्टा म्हणजे पुरुषार्थ नव्हे,
तर 'बायको'मधल्या "स्त्री"चा सन्मान हा खरा पुरुषार्थ आहे !
आयुष्यभर केवळ कुटुंबाकरिता जगणाऱ्या प्रत्येक स्त्रीला आपल्या ग्रुपतर्फे मानाचा मुजरा !!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Save girl save world....मुली वाचवा भविष्य वाचवा

'कन्यारत्न' ...




डॉक्टरांच्या समोर जोडपं बसलं होतं.

'डॉक्टर,
आम्हाला मुलगी नकोय !'
होणाऱ्या बाळाचे बाबा बोलले.

'तुम्हाला कसं कळलं
मुलगीच आहे म्हणून?'
डॉक्टरांनी विचारलं.

'तुम्ही टेस्ट करायला नकार दिलात.
मग आम्ही शेजारच्या राज्यातील सोनोग्राफी सेंटरवर टेस्ट करून आलो.'
बाळाचे बाबा बोलले.

'मग तिथंच का केलं नाहीत अबॉर्शन?'
डॉक्टर म्हणाले.

'तिथं सोय नव्हती.
त्यांनी दिला होता पत्ता एका डॉक्टरचा. पण त्यांची फी खूपच जास्त वाटली. मग म्हटलं की तुम्ही ओळखीचे आहात. लाखाऐवजी हजारात काम होईल.'
बाळाचे बाबा निर्विकारपणं बोलले.

'मी काय कसाई वाटलो काय तुम्हाला?' डॉक्टर संयम ठेवत पुढं म्हणाले,
'अहो, तुम्हाला पहिली मुलगीच आहे'

ईतका वेळ गप्प बसलेली बाळाची आई म्हणाली, 'म्हणून तर दुसरी मुलगी नकोय आम्हाला. दुसरा मुलगाच हवा. दोन मुली नकोत!'

डॉक्टरांनी आईच्या मांडीवर बसलेल्या त्या पहिल्या मुलीकडं पाहिलं. निरागस, निष्पाप, बोलके डोळे. हसरा चेहरा. नजरानजर होताच ती बाहुली डॉक्टरांकडे झेपावली. त्या चिमण्या जिवाला डॉक्टरांनी कवेत घेतलं.

डॉक्टर काही बोलत नाहीत हे बघून मुलीचे बाबा म्हणाले, 'फी व्यवस्थित देउ आम्ही. शिवाय ही बातमी कुठेही लीक होणार नाही याची खात्री !'

डॉक्टरांचे डोळे आता लकाकले. होणाऱ्या बाळाच्या आईबाबांना ते म्हणाले, 'तुमचा विचार पक्का आहे?
तुम्हाला खरंच दोन मुली नको आहेत?
परत विचार करा.'

मुलीचे बाबा म्हणाले,
'पक्का आहे विचार.
दोन मुली नकोत.'

'ठीक आहे तर मग.
आपण आईच्या पोटातली मुलगी राहू देउ. या पहिल्या मुलीला मी मारून टाकतो. म्हणजे तुम्हाला एकच मुलगी राहिल.' असे म्हणत डॉक्टरांनी टेबलवरची सुरी उचलून त्या पहिल्या मुलीच्या गळ्याला लावली.

आणी त्या मुलीची आई मोठ्यांदा किंचाळली,
'थांबा डॉक्टर...
काय करताय?...
तुम्ही डॉक्टर आहात का कसाई?'

डॉक्टर शांतपणे मंद हसत दोघा आईबाबांकडे बघत होते. निष्पाप बाहुली हसत खेळत होती.

दोनच क्षण ...
दोनच क्षण शांततेत गेले.
अन आईबाबांच्या लक्षात सारा प्रकार आला. ते भयानक खजिल झाले.
ईतकंच म्हणाले,
'आम्हाला माफ करा डॉक्टर.
आम्ही कसाई व्हायला निघालो होतो. आमची चूक आम्हाला कळली.'

ते जोडपं कडेवरच्या आणी पोटातल्या आपल्या दोन्ही राजकन्यांसह केबिनमधून बाहेर पडते झाले.















ते बाहेर पडत असताना डॉक्टर म्हणाले
'आणखी एक सांगायचं राहिलंचं..
आणि तेही तुम्हाला सांगायचं कारण असं कि, मला तुमचा निर्णय बदलल्याची मनोमन खात्री झाली म्हणुनच'.

'आमच्या व्यवसायात देखिल काही राक्षस प्रवृत्तीचे लोक आहेत हे दुर्दैव आहे. पण ते ईतक्या नीच थराला गेले आहेत की, सोनोग्राफीत मुलाचा गर्भ दिसत असुनही, पैशासाठी तो मुलीचा आहे असे तुम्हाला सांगितले आहे !'


आता मात्र आईबाबांच्या पायाखालची जमिनच सरकली !

संदेश चांगला वाटल्यास पुढे पाठवायला हरकत नसावी .

SAVE GIRL CHILD...

Marathi charolya मराठी चारोळ्या

घडून गेलेल्या गोष्टीचे दुःख करुन आपण आपल्यालाच त्रास देतो,

गेलेल्या गोष्टीकडे पाहत राहण्यापेक्षा पुढील मार्ग पहावा,

कदाचित परमेश्वराने आपल्याला यासाठीच मागे डोळे न देता पुढे दिले आहेत...

      शुन्यालाही देता
येते किंमत.....
फक्त त्याच्यापुढे "एक" होऊन
उभे रहा....!!!

    💐💐💐💐.

Whats app marathi jokes

पाटलाच्या घरी एकदा 2 मित्र भेटायला आले.........
पाटलांनी बंदुक काढून हवेत 2दा गोळीबार केला.....
मित्र : काही चुकलं का पाटील आमचं...........
पाटील: नाही रे मित्रा,चौकातल्या हॉटेलमधे 2 चहा सांगितले.....
🐅पाटलाचा नादच खुळा.🐅

भाऊ,जोक इथंच नाही संपला.....









चौकातल्या हॉटेल वाल्याने 4 तोफांचे बार काढले...

मित्र- हे काय होतं पाटील?

पाटील(शर्मिंदा होऊन)- पहिल्यांदा आधीची उधारी जमा करा म्हणतोय हरामखोर... 😜😜😜  


भाऊ,जोक इथंबी नाही संपला.....














नंतर पाटिल बंदुकीच्या 7 गोळया न्  12 तोफांचे बार उडवतो ....

मित्र पुन्हा विचारतो - हे काय होतं, पाटील?





पाटील म्हणतात, त्या हरामखोराला आठवण करून देत होतो की तुझा 7/12 माझ्याकडं गहाण आहे, हे विसरलास का ??

आणि 5 च मिनिटात चहा सोबत भजी पण आली ....😜😜

💣पाटलाचा नाद नाय करायचा🔫
🔫🔫🔫🔫💣💣💣
.
.
आयुष्य फार सुंदर आहे
.
.
.
.
फ़क्त ग्रामपंचायत ताब्यात आली पाहिजे
😜😜😜😜😜😜

अनुभवाच बोल

*अनुभवाच बोल :*

👉 ज्यांनी तुम्हाला *दुखावले* आहे त्यांचेही आभार माना कारण तुम्ही मानसिकदृष्टय़ा *अधिक बळकट* व्हावे, यासाठी त्यांचा हातभार लागलेला आहे.

👉तुम्हाला ज्यांनी *फसवले* त्यांच्या विषयी देखिल कृतज्ञ राहा कारण त्यांनी तुम्हाला *शहाणपण* शिकवले आहे.

👉ज्यांनी तुम्हाला *नकार* दिला त्यांनाही धन्यवाद द्या कारण त्यामुळे *लढण्यासाठी*चेतवले गेलात.

👉ज्यांनी तुम्हाला *सोडून* दिले त्यांच्या विषयी चांगली भावना ठेवा कारण त्यांनी तुम्हाला *स्वावलंबी* बनण्याची प्रेरणा दिली

👉जे तुमच्यावर *टीका* करतात त्यांची गुणग्राहकता लक्षात घ्या. तुमच्यावर टीका करून ते तुमच्या *व्यक्तीमत्वात सुधारणा* करण्यासाठीज साहाय्य करत असतात.

👉तुमचे *पाय मागे* खेचणाराचे आभार माना कारण, ते तुमच्या *पायात बळ* निर्माण करण्याची प्रेरणा देत असतात.

👉तुम्हाला *कमी लेखणाऱ्यांचे* कौतुक करा. कारण ते तुम्हाला तुमच्यातील *कमतरता* किंवा *त्रुटी* दाखवून देत असतात.

👉 तुम्हाला ताकद देणाऱ्या विषयी  कायम कृतज्ञ राहा

Thursday, 23 June 2016

सोमनाथ मंदिर - बाण स्तंभ

"बाण स्तंभ" #सोमनाथ_मंदिर

इतिहास हा फार चकवणारा विषय आहे. आणि इतिहासाचा मागोवा घेता घेता आपण एखाद्या अश्या जागी येऊन उभे राहतो की मन अक्षरशः थक्क होऊन जाते. हे असं शक्य आहे कां, या विषयी मनात गोंधळ उडतो. दीड हजार वर्षांपूर्वी हे इतकं प्रगत ज्ञान आपल्यापाशी होतं यावर विश्वासच बसत नाही.

गुजराथ च्या सोमनाथ मंदिरापाशी येऊन आपली अशीच परिस्थिती होते. मुळात सोमनाथ मंदिराचा इतिहासच विलक्षण. बारा ज्योतिर्लिंगांतील हे एक देखणं, वैभवशाली शिवलिंग. इतकं समृध्द की उत्तर पश्चिमेतून येणाऱ्या प्रत्येक आक्रमकाचं लक्ष सोमनाथ कडे गेलं आणि अनेकवार सोमनाथ लुटल्या गेलं. सोनं, नाणं, चांदी, हिरे, माणकं, रत्न. . . सर्व गाडे भरभरून नेलं. आणि इतकी संपत्ती लुटल्या जाऊन ही दर वेळी सोमनाथ चं शिवालय परत तश्याच वैभवानं उभं राहायचं.

मात्र फक्त ह्या वैभवासाठी सोमनाथ महत्वाचं नाही. सोमनाथ चं मंदिर भारताच्या पश्चिम समुद्र किनाऱ्यावर आहे. विशाल पसरलेला अरबी समुद्र रोज सोमनाथाचे पादप्रक्षालन करत असतो. आणि गेल्या हजारो वर्षांच्या ज्ञात इतिहासात ह्या सागराने कधीही सोमनाथाचा उपमर्द केलेला नाही. कोणत्याही वादळामुळे सोमनाथाचे गौरवशाली मंदिर कधी उध्वस्त झाले नाही.

ह्या सोमनाथाच्या मंदिराच्या आवारात एक स्तंभ आहे. हा ‘बाण स्तंभ’ म्हणून ओळखला जातो. हा केंव्हापासून त्या ठिकाणी आहे, हे सांगणं अवघड आहे. इतिहासाचा धांदोळा घेत घेत मागे गेलो की कुठेतरी सहाव्या शतकापाशी आपण पोहोचतो, जिथे ह्या बाण स्तंभाचा उल्लेख आढळतो. पण म्हणजे हा सहाव्या शतकात उभारल्या गेलाय असं सिध्द होत नाही. हा स्तंभ किती जुना आहे, याबद्दल नक्की सांगणं शक्य नाही.

हा बाण स्तंभ म्हणजे दिशादर्शक स्तंभ आहे. यावर एक बाण उभारलाय आणि खाली लिहिलंय –

‘आसमुद्रान्त दक्षिण धृव पर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग’

याचा अर्थ असा – या बिंदुपासून दक्षिण धृवा पर्यंत सरळ रेषेत एकही अडथळा नाही. अर्थात या मार्गात एकही जमिनीचा तुकडा नाही.

ज्याक्षणी सर्वप्रथम मी हा स्तंभ बघितला अन हा शिलालेख वाचला, तो वाचून डोक्यात त्याचा अर्थ जाता क्षणीच अंगावर काटा उभा राहिला ! हे ज्ञान इतक्या पूर्वी आपल्याला होतं..? कसं शक्य आहे हे? आणि जर हे खरच असेल तर किती समृध्दशाली ज्ञानाचा वैश्विक वारसा आपण बाळगतोय..!

संस्कृत मधे कोरलेल्या ह्या एका ओळीच्या अर्था मधे अनेक गूढ अर्थ सामावलेले आहेत. ह्या ओळीचा सरळ अर्थ आहे, सोमनाथ मंदिराच्या त्या बिंदुपासून दक्षिण धृवा पर्यंत (म्हणजे अन्टार्टिक पर्यंत) एक सरळ रेघ ओढली तर मधे एकही भूखंड लागत नाही. आता हे खरं कश्यावरून..? आजकालच्या ह्या तंत्रज्ञानाच्या युगात हे शोधणं सोपं व्हावं. मात्र हे तितकंसं सोपं नाही. गुगल मेप वरून बघितलं तर वर वर बघता भूखंड दिसत नाही. मात्र तो मोठा भूखंड. एखादा लहान भूखंड शोधायचा असेल तर त्या पूर्ण मार्गाला ‘एन्लार्ज’ करत करत पुढे जायचे. हे तसं किचकट काम. मात्र संयम ठेऊन, चिकाटीने हळू हळू बघत गेलं की मार्गात एकही मोठा भूखंड, म्हणजे 10 Km X 10 Km चा, लागत नाही. त्या खालचा भूखंड हा विशेष तंत्रज्ञानानेच शोधावा लागेल. थोडक्यात, तो संस्कृत श्लोक खरा आहे असं धरून चालू.

पण मूळ प्रश्न तसाच राहतो. अगदी सन ६०० मधे हा बाण स्तंभ उभारला असं जरी म्हटलं, तरी त्या काळात पृथ्वीचा दक्षिण गोलार्ध आहे, हे ज्ञान कुठून मिळालं ? बरं, दक्षिण गोलार्ध माहीत होता हे गृहीत धरलं तरी सोमनाथ मंदिरापासून दक्षिण धृवापर्यंत सरळ रेषेत गेलं की मध्ये कोठेही एकही भूखंड येत नाही, हे ‘मेपिंग’ कोणी केलं ? सारंच अद्भुत..!
याचाच अर्थ, बाण स्तंभ उभारण्याच्या काळात, भारतीयांना पृथ्वी गोल आहे हे माहीत होतं आणि फक्त तितकंच नाही, तर ह्या पृथ्वीला दक्षिण धृव आहे (म्हणजेच अर्थात उत्तर धृव ही आहेच), हे ज्ञान ही होतं. हे कसं काय शक्य झालं ? त्यासाठी पृथ्वीचा ‘एरियल व्ह्यू’ घेण्याचं काही साधन होतं कां ? नसल्यास पृथ्वीचा नकाशा त्या काळी अस्तित्वात होता कां ?
नकाशाशास्त्र (इंग्रजीत ‘कार्टोग्राफी’ – मूळ फ्रेंच भाषेतून उचललेला शब्द) हे फार प्राचीन शास्त्र. ख्रिस्तपूर्व सहा ते आठ हजार वर्षांपूर्वी गुहेत कोरलेल्या आकाशस्थ ताऱ्यांचे नकाशे मिळाले आहेत. मात्र पहिल्यांदा पृथ्वीचा नकाशा कोणी काढला, यावर एकमत नाही. भारतीय ज्ञानाचे पुरावे मिळाले नसल्याने ‘एनेक्झीमेंडर’ ह्या ग्रीक शास्त्रज्ञाकडे हा मान जातो. ख्रिस्तपूर्व ६११ ते ५४६ हा त्याचा कालखंड. मात्र त्याचा नकाशा हा अत्यंत ढोबळ आहे. त्या काळात जिथे जिथे ज्ञात मनुष्यवस्ती आहे, तो भाग या नकाशात दाखविण्यात आलेला आहे. या नकाशात उत्तर आणि दक्षिण धृव दिसण्याचं ही काही कारण नाही.
आजच्या वास्तविक जगाच्या जवळ जाणारा पृथ्वीचा नकाशा हेनरीक्स मार्टेलस ने साधारण सन १४९० च्या आसपास केलेला आढळतो. असं म्हणतात, कोलंबस ने ह्याच नकाशा चा आधार घेतलेला होता.

‘पृथ्वी गोल आहे’ हे मत युरोपातील काही शास्त्रज्ञांनी ख्रिस्तपूर्व काळात व्यक्त केलेले आढळते. एनेक्झीमेंडर ने ख्रिस्तपूर्व ६०० वर्षांपूर्वी पृथ्वीला एका ‘सिलेंडर’ च्या स्वरूपात बघितले होते. एरिस्टोटल ने ही पृथ्वीला गोल म्हटलेले आहे.

मात्र भारता जवळ हे ज्ञान फार आधीपासून होते ह्याच्या अनेक खुणा मिळतात. याच ज्ञानाच्या आधारावर सन ५०० च्या आसपास आर्यभट्ट ने फक्त पृथ्वी गोल आहे, हेच सांगितले नाही, तर पृथ्वीचा व्यास ४,९६७ योजने आहे (म्हणजे नवीन मापना प्रमाणे ३९,९६८ कि. मी.) हे देखील ठासून सांगितले. आज सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून पृथ्वीचा काढलेला व्यास ४०,०७५ कि. मी. आहे. अर्थात आर्यभट्ट च्या आकलनात चूक होतेय ती फक्त ०.२६ %. सोळाशे वर्षांपूर्वी आर्यभट्ट जवळ हे ज्ञान आले कोठून..?
सन २००८ मधे जर्मन इतिहासतज्ञ जोसेफ श्वार्टझबर्ग ने हे सिध्द केले की ख्रिस्तपूर्व दोन / अडीच हजार वर्षांपूर्वी पासून भारतात नकाशाशास्त्र अत्यंत विकसित होते. नगर रचनेचे नकाशे तर त्या काळात उपलब्ध होतेच, पण नौकानयना साठी आवश्यक असे नकाशे असल्याचे ही पुरावे आढळतात.

भारतात नौकानयन शास्त्र फार पूर्वीपासून विकसित होतं. संपूर्ण दक्षिण आशियात ज्या प्रकारे हिंदू संस्कृतीच्या पाउलखुणा आढळतात, त्यानुसार भारताची जहाजं पार पूर्व टोकापर्यंत, म्हणजे जावा, सुमात्रा, यवद्वीप ओलांडून जापान पर्यंत समुद्रात विहार करत होती याचे भरभक्कम पुरावे मिळाले आहेत. १९५५ साली शोधण्यात आलेल्या गुजरात च्या लोथल मधे अडीच हजार वर्षांपूर्वीचे अवशेष सापडले आहेत. यात भारताच्या प्रगत नौकानयना विषयी अनेक पुरावे दिसतात. 
अर्थात सोमनाथ मंदिर उभारण्याच्या काळात दक्षिण धृवापर्यंत चे दिशादर्शन त्या काळातील लोकांना असेल हे निश्चित.

दुसरा अजून एक विचार समोर येतो की दक्षिण धृवा पर्यंत सरळ रेषेत जमीन नसलेला समुद्र आहे हे नंतर शोधून काढण्यात आलं की दक्षिण धृवापासून जमीन नसलेल्या सरळ रेषेची सांगता भारतात जिथे होते, तिथे सोमनाथ हे ज्योतिर्लिंग उभारण्यात आलं..? त्या बाण स्तंभावर लिहिलेल्या ओळीत उल्लेख केलेला आहे, (‘आसमुद्रान्त दक्षिण धृव पर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग’) तो ज्योतीर्मार्ग म्हणजे नेमकं काय..... pics 👆