Monday, 25 July 2016

अंधश्रद्धा

एका देवळाच्या सभामंडपात एका बाईच्या अंगात देवी आली होती ती जोराजोरात घुमुन शांत झाल्यावर तीच्यासमोर पाचसहा बाया पुरूषांनी रांग लावली.
स्वतःच्या अडचनी सांगू लागले कारण बाईच्या आंगातली देवी फार कडक होती बाई ही त्यांच्या प्रश्नाची उत्तरे देऊ लागली कोणाला लिंबू नाराळाचा उतारा करायला सांगू लागली तर कोणाला देवीच्या नवसाची पूर्तता करायला सांगू लागली.कोणाला कोंबड्या,बकरे कापायला सांगू लागली तर कोणाला आंगार्याची राख पाण्यात टाकून प्यायला सांगू लागली अनेकांच्या प्रश्नाला मिळते जुळते उत्तरे देत आसताना एक महाशय मला म्हणाले ...."तुमच्याही काही आडचनी,काही प्रश्न आसले तर विचारा आईला".मि म्हणालो नाही....नाहीत्यावर ते महाशय म्हणाले ...आहो जगातलं सारं ग्यान आईकडे हाय....आणि आय सुद्धा लय जागृत हाय.
तुम्ही कोणताबी प्रश्न टाका...
आई ऊत्तर देणारचचचचच...
मी म्हणालो ठिक आहे विचारतो एक दोन प्रश्न ...
तसा तो महाशय हसला व कपाळभर कुंकु लावलेल्या कपाळाकडं हात करत म्हणाला विचारा......विचारा.             
मी पुढे गेलो आई समोर हात जोडले व विचारलं......
आई
स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण.....?                         स्रीयांना शिक्षणाचे अधिकार कोणी मिळवून दिले....?        
आईने घट्ट धरलेली हाताची मीठी सोडली.अर्धवट झाकलेले डोळे उघडले ..
तसा मी तिसरा प्रश्न विचारला....
आई स्वतंत्र भारताची राज्य घटना कोणी लिहली...?       
आईने मोकळे सोडलेले केस बांधायला सुरवात केली आणि अस्तव्यास्त झालेला पदरही निटनेटका केला.....
तसा मी चौथाही प्रश्न विचारला...
हिंदवी स्वराजाचे संस्थापक कोण....?   
आई माझ्याकडे मोठे वटारे डोळे करुन पाहात तडातडा तेथुन निघाली ती थेट मंदिराच्या बाहेरच.    
तेथे जमलेले सारे माझ्याकडे आ वासुन पाहू लागले आई देवळाच्या बाहेर गेली खरी पण घरी नाही गेली देवळाबाहेरच थांबली माझी वाट पाहात.
मी जेव्हा बाहेर आलो तेव्हा ती रागाने पाहात माझ्याकडे आली आण् मला म्हणाली .......मुडद्या.......
अशे प्रश्न विचारायला तुला मीच घावले व्हय.

😀😀😀😀😀😀😀😀😀😀😂😂

No comments:

Post a Comment