Monday, 25 July 2016

ओलीस नाट्य

🇮🇳नक्की वाचा🇮🇳
"ओलिस नाट्य" अभिमान वाटावा असे,
      मित्रांनो आपल्या भारत देशाची पवित्र मानली जानारी अंबरनाथ यात्रा(जम्मु कश्मिर) 
यातील वाळवा तालुक्यातील एका वाघाची सत्य कहानी!!
       आपल्या वाळवा तालुक्यातील बावची गावचे सुपुत्र श्री दिनकर मस्के(दलित महासंघ सांगली जिल्हा उपअध्यक्ष)हे आपल्या ७२सहकार्यासह दि.३०/६/२०१६ रोजी अंबरनाथ यात्रेस रवाना झाले.दि.६/७/२०१६रोजी अंबरनाभ येथे पोहचले देवदर्शण घेउन रात्री तेथेच मुक्काम केला व दिं.८/७/२०१६रोजी परतीचा प्रवास सुरु झाला.श्रीनरच्या पुडे ५ कि.मी. पांपुरगावाजवळ रात्री ८.०० वा पोहचले बसमधुन खरेदी साठी सर्व प्रवासी खाली उतरले.इतक्यात तेथे मोठा लोक समुदाय जमा झाला व दगड फेक चालु झाली लोक समुदाय घोशना देत होते."पाकिस्तान जिंदाबाद,हिंदुस्तान मुर्दा बाद अवाम जिंदाबाद,जिहाद जिंदाबाद" आप यहासे नीकल जाओ हिंदुस्तानी फौजोने हमारे आदमी को मारा है!! तसे आम्ही सर्व प्रवाशी धावत बसमध्ये चढलो .बस चालुकरुन ४ते५कि.मी.काजीकुंड या गावा जवळ काही लोकांनी बसला गराडा घातला व दगड फेक चालु केली .त्या मुळे गोंधळ उडाला काहीच कळेनासे झाले. लोक ओरडत होते "पाकिस्तान जिंदाबाद हिंदुस्तान मुर्दाबाद,जिहाद जिंदाबाद म्हनत होते,त्यातील काही लोकांनी बसच्या दारावर लाता मारीत होते.दरवाजा उघताक्षनी तिन अतंकवादी सशस्र रायफल धारी आत बस मधे घुसले व रायफली रोखुन धरल्या तसे सर्वजन घाबरुन गेले पुडच्या सिट वरच दिनकर मस्के बसले होते.त्या तिघा पैकी एकाने मस्के यांच्या छातीला बंदुक लावली व म्हनाले बोल "पाकिस्तान जिंदाबाद हिंदुस्तान मुर्दाबाद" बोल सबको छोड देंगे बोल जल्दी मस्के यांनी त्यांचे एकले नाही.त्यानी मस्के यांच्या छातीत,हातावर पायाव बंदुकीच्या दस्ता(बट)ने मारनेस चालु केले.मस्के बाकावरुन खाली पडले.तरी ते मारतच होते. मस्के यांना याचा राग आला त्या झीटीत त्यानी छत्रपती शिवाजीमहाराज की जय म्हनत एकट्याने ताकतीने तीघांना जोराचा धक्का दिला तसे ते बसच्या पायरीवर उभे असलेले बसच्या दारातुन बाहेर फेकले गेले.व बसचा दरवाजा अॅटोमॅटीक बंद झाला.तसे प्रसंग सावधान राखुन बस ड्रायव्हरने बस पळवली.मागुन त्यानीं बसवर फायरींग केली बसच्या काचा फूटल्या सुदैवाने कोनाला ईजा झाली नाही.पन मस्के यांचा हात मोडला. ती बस सरळ मिलीटरी बेस कॅंप वर नेली. घडलेली सर्व हकीकत अधिकार्यानां सांगीतली. अधीकार्यानी सर्वाना राहन्याची व चहा नाष्ट्याची सोय केली.सकाळी चार वाजता मस्के यांचा सत्कार केला व पन्नास कि.मी. पर्यंत पुढे एक व माघे एक व मधी बस असे संरक्षण देऊन हा ताफा रेल्वेस्टेशन वर पोहचवला.हे ओलीस नाट्या विस मिनीटाचे होते मित्रांनो ह्या रांगड्या मराठ मोळ्या गड्याला आपन फोनवरुन नविन जिवनाच्या व ७२ प्रवाशांचे प्रान वाचवले बद्दल शुभेच्छा देऊ!! बस एवडेच नाही तर हा मॅसेज ईतका शेअर करा की त्या पाकीस्तानला व अतंकवाद्यानां कळुद्या आमचा एक मराठी माणूस  बस आहे तुम्हाला,भारतीय सेनेच्या नादाला लागु नका!! जय हिंद जय महाराष्ट !! छत्रपती शिवाजींचे छावे आहोत आम्ही जय शिवराय.
                 आपला नम्र
        के
🙏🇮🇳🇮🇳🙏

No comments:

Post a Comment