Thursday, 28 July 2016

Something@japan

जपान
बुद्धाना मानणारा जपान सुमारे ६८०० द्वीपांनी बनला आहे. हा देश सतत काहीतरी नवीन करण्यात सर्वात पुढे असतो.
जपानी लोक इतके मेहनती आहेत की, दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने तसेच इतर काही देशांनी दबाव आणून पण त्यांनी माघार घेतली नाही.
अशीच थोडी माहिती जपान बद्दल...
१. जपान मधे दरवर्षी साधारण १५०० भूकंप होतात म्हणजे दररोज ४.
२. मुसलमानांना “नागरिकता” न देणारे जपान हे एकमेव राष्ट्र आहे. इतकेच नाही तर जपान मध्ये मुसलमानांना भाड्याने पण
घरे मिळण्यात अडचणी येतात.
३. जपान मधील कुठल्याही विश्वविद्यालयात अरबी किंवा कुठलीही इस्लामी भाषा शिकवली जात नाही.
४. कुत्र पाळणारा प्रत्येक जपानी नागरिक त्याला फिरावयास घेऊन जाताना आपल्या सोबत एक विशेष बॅग ठेवतो, ज्यामध्ये कुत्र्याची शी तो भरून घेतो. रस्त्यातच घाण करत नाही.
५. जपान मधे १० वर्ष वयापर्यंत मुलांना कसलीही परीक्षा द्यावी लागत नाही.
६. जपान मधे विध्यार्थी आणि शिक्षक मिळून वर्गाची सफाई करतात.
७. जपानी लोकांचे सरासरी आयुष्य ८२ वर्षे असून जपान मध्ये आज १०० पेक्षा जास्त वयाचे ५०००० लोक जिवंत आहेत.
८. जपान कडे कुठलीही नैसर्गिक साधन संपत्ती नाही शिवाय दरवर्षी शेकडो भूकंप झेलूनही तो जगातील दोन नंबरचा आर्थिक सुबत्ता वाला देश आहे.
९. “सुमो” हा जपानचा सर्वात लोकप्रिय खेळ आहे. याशिवाय बेसबॉल पण तिथे खूप लोकप्रिय आहे.
१०. जपान मधे १००% साक्षर लोक आहेत.  जिथे आपल्या प्रमाणे वर्तमान पत्रात दुर्घटना, राजनीति, वाद-विवाद, फिल्मी मसाला वगैरे बातम्या छापल्या जात नाहीत तर आधुनिक माहिती आणि आवश्यक बातम्या छापल्या जातात.
११. जपान मधे जी पुस्तके छापली जातात त्यातील २०% पुस्तके कॉमिक असतात.
१३. जपान मधे नवीन वर्षांचे स्वागत मंदिरात १०८ घंटा वाजवून केले जाते.
१३. जपानी लोक वेळेचे पक्के असतात. तिथल्या रेल्वे गाड्या जास्तीत जास्त १८ सेकंद उशिराने सुटतात.
१४. जपान मध्ये सर्व वस्तूंसाठी व्हेंडिंग मशीन मध्ये पैसे घातल्यानंतर मशीन मधून त्या वस्तू बाहेर येतात, जीवनावश्यक वस्तूंपासून रोजच्या वापरातील अनेक वस्तूंची अशा प्रकारे खरेदी केली जाते. अशी ५५ लाख  व्हेंडिंग मशीन जपान मध्ये कार्यरत आहेत.
१५. जपान मध्ये रात्री उशिरा पर्यंत
नाचण्यास मनाई आहे.
१६. जपान मध्ये एक अशी इमारत आहे की जिच्या मधून हायवे जातो.
१७. जपानच्या चारी बाजूंनी समुद्र असून देखील २७% मासे जपान बाहेरून आयात करतो.
१८. जपान मध्ये काळ्या मांजराला शुभ आणि भाग्यशाली मानले जाते.
१९. जापानी लोक आंघोळ करतांना देखील मोबाईल वापरतात म्हणून तिथले सर्व मोबाईल वॉटर प्रुफ असतात.
२०. जपान मधे ७० प्रकारचे फॅंटा (fanta) मिळतात.
२१. जपान मध्ये अनेक रस्ते असे आहेत की ज्यांचे नामकरण केलेले नाही.
२२. जपानी लोक वेगवेगळ्या २० प्रकारे सॉरी म्हणतात.
२४. जपान जगातील सर्वात मोठा वाहन उत्पादक देश आहे.
२५. २०११ मध्ये झालेला भूकंप हा आता पर्यंतचा जपान मधला सर्वात मोठा भूकंप होता. ज्यामुळे पृथ्वीच्या फिरण्याच्या वेगात १.८ मायक्रो सेकंदांनी वाढ झाली आहे.
२५. जपान हा जगातला एकमेव असा देश आहे की ज्याच्या वर अणु हल्ला झाला आहे.
६ आणि ९ ऑगस्ट १९४५ या दिवशी अमेरिकेने हीरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणु बॉम्ब फेकले होते. या बॉम्बला little-boy आणि Fat-man अशी नावे दिली होती.
२६. जपान मध्ये आजपर्यंत एकही
आतंकवादी हल्ला झाला नाही तसेच जपान मध्ये स्लीपर सेल पण नाही.
२७. जपानी लोक सतत कामात मग्न असतात आणि ते देशासाठी काम करतात असे समजतात.
२८. जापान मध्ये क्रिकेट ला जुगारु खेळ तसेच देशाच्या विकासास बाधक खेळ म्हणून समजल्या जाते.
त्यामुळे जापान ची क्रिकेटची टीम नाही.

🙏वाचा आणि विचार करा🙏

आजचा सुविचार

*डोळे* हे तलाव नाहीत,
                      तरीपण *भरून* येतात.
*अहंकार* हा शरीर नाही,
                     तरीपण *घायाळ* होतो.
*दुश्मनी* ही बीज नाही,
                    तरीपण *उगवली* जाते.
*ओठ*  हे कापड नाहीत,
                    तरीपण *शिवले* जातात.
*निसर्ग* हा बायको नाही,
                   तरीपण कधीतरी *रुसतो*.
*बुध्दी* ही लोखंड नाही,
                   तरीपण तिला *गंज* लागतो.
*माणूस* हा वातावरण नाही,
                   तरीपण तो *बदलला* जातो.।।
🐾🌹 *काळजी घ्या* 🌹🐾
🍁🌴🙏🌴🍁
*आयुष्य खूप सुंदर आहे*
💐 *बंध आपुलकीचे* 💐
💐 *नाते माणुसकीचे* 💐
       *Good Morning*

Monday, 25 July 2016

एक छिद्र उरलेले

मित्रांनो,

"एक छिद्र उरलेलं"

महाभारतातील ही गोष्ट तुम्हाला माहीत आहे का?

एक गरीब म्हातारा हस्तिनापूरला गेला.

काहीतरी दान मिळेल या आशेनं तो धर्मराजाला भेटला.

परंतु, तोपर्यंत सूर्यास्त झाला होता.

त्यानं धर्मराजाला काहीतरी दान द्यावं अशी विनंती केली.

तेव्हा धर्मराज त्याला म्हणाले,

'आता सूर्यास्त झाला आहे. त्यामुळे मी आता दान देवू शकत नाही. तू उद्या सूर्योदयानंतर केव्हाही ये. मी तुला निराश करणार नाही.'

तो गरीब म्हातारा नाराज होवून परत फिरला.

या दोघांमधला संवाद बाजूला बसलेले भीम ऐकत होते.

तो गरीब म्हातारा निघून गेल्यानंतर भीमसेन धर्मराजाला म्हणाले,

'दादा, तुम्ही त्या याचकाला उद्या सकाळी दान देण्याचं वचन दिलं आहे. पण, एक विचारू? माणसाला दुसऱ्या दिवशीच्या आयुष्याची खात्री देता येते?'

धर्मराजाला स्वतःची चूक कळली.

त्यांनी लगेच त्या गरीब म्हाताऱ्याला बोलावलं आणि भरपूर दान दिलं.

गोष्ट इथं संपली....

पण, भीमानं विचारलेला हा प्रश्न छोटासा असला तरी, अस्वस्थ करणारा आहे.

आणि हा प्रश्न जो स्वतःला विचारतो, त्याला आयुष्याचं खरं महत्त्व कळतं.

'तो काल मला भेटला होता, आज तो नाहीये',

'तो मघाशी माझ्याशी फोनवर बोलला होता, आत्ता तो नाहीये.'

असे अनेक प्रसंग आपल्या आजूबाजूला नेहमी घडत असतात.

हा क्षण माझा आहे.

पुढचा क्षण माझा नाही, हे एकदा का आपण आपल्या मनात रूजवले की, संताप, चीड, द्वेष, मत्सर या सगळ्या भावना आपोआप गळून पडतात आणि हातात राहते ते सूर ताल, लय, ठेका घेवून आलेलं आयुष्याचं रंगीबेरंगी गाणं!

जी मोठी माणसं किंवा नेते मंडळी असतात, ते गेल्यानंतरही त्यांचे चौकात पुतळे होतात.
जे शास्त्रज्ञ, विचारवंत असतात, त्यांचे विचार आपल्याला ते गेल्यानंतरही पुस्तकातून भेटतात.

जे कलावंत, गायक, खेळाडू असतात, ते गेल्यानंतरही ते त्यांच्या कलेतून, कृतीतून आपल्याला आठवतात.

पण आपल्यासारख्या सामान्य माणसाचं काय?

शरीरातून जीव गेल्यानंतर कुठे असतो आपण?

कुठल्या रूपात मागे उरतो आपण?

माझ्या घरात आज मी आहे.

उद्या मी नसेन.

माझ्या जागी एक मिणमिणता दिवा असेल.

दहा दिवसांनी तो दिवा विझेल.

मग, त्या जागी माझा एक फोटो असेल.

लाकडी चौकट, कोरीव नक्षीकाम, हसरा फोटो.

काही दिवसांनी माझ्या लटकलेल्या फोटोवर साचलेली धूळ असेल किंवा त्या फोटोची पातळ काच वेडीवाकडी तडकलेली असेल.

काही वर्षांनी माझा तो हसरा फोटो भिंतीवरच्या छिद्रातून खिळ्यासकट निखळलेला असेल...

आणि मग त्यानंतर पिढ्यान् पिढ्या, माझ्याच घरात, माझ्या नावाचं फक्त उरलेलं एक छिद्र असेल !

आपलं रूपांतर अशा छिद्रात होण्यापूर्वी आपल्याला दानात मिळालेल्या ह्या श्वासांच रूपांतर आपण 'उत्सवात'  करायचं का?...                                                    
इतिहास सांगतो काल सुखी होतो.

भविष्य सांगतं उद्या सुखी असशील.

पण...

तुमचे मन आणि विचार चांगले असेल, तर रोजच सुख आहे... नाही का ?

तर, मग, जगा, आनंदाने !!

अंधश्रद्धा

एका देवळाच्या सभामंडपात एका बाईच्या अंगात देवी आली होती ती जोराजोरात घुमुन शांत झाल्यावर तीच्यासमोर पाचसहा बाया पुरूषांनी रांग लावली.
स्वतःच्या अडचनी सांगू लागले कारण बाईच्या आंगातली देवी फार कडक होती बाई ही त्यांच्या प्रश्नाची उत्तरे देऊ लागली कोणाला लिंबू नाराळाचा उतारा करायला सांगू लागली तर कोणाला देवीच्या नवसाची पूर्तता करायला सांगू लागली.कोणाला कोंबड्या,बकरे कापायला सांगू लागली तर कोणाला आंगार्याची राख पाण्यात टाकून प्यायला सांगू लागली अनेकांच्या प्रश्नाला मिळते जुळते उत्तरे देत आसताना एक महाशय मला म्हणाले ...."तुमच्याही काही आडचनी,काही प्रश्न आसले तर विचारा आईला".मि म्हणालो नाही....नाहीत्यावर ते महाशय म्हणाले ...आहो जगातलं सारं ग्यान आईकडे हाय....आणि आय सुद्धा लय जागृत हाय.
तुम्ही कोणताबी प्रश्न टाका...
आई ऊत्तर देणारचचचचच...
मी म्हणालो ठिक आहे विचारतो एक दोन प्रश्न ...
तसा तो महाशय हसला व कपाळभर कुंकु लावलेल्या कपाळाकडं हात करत म्हणाला विचारा......विचारा.             
मी पुढे गेलो आई समोर हात जोडले व विचारलं......
आई
स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण.....?                         स्रीयांना शिक्षणाचे अधिकार कोणी मिळवून दिले....?        
आईने घट्ट धरलेली हाताची मीठी सोडली.अर्धवट झाकलेले डोळे उघडले ..
तसा मी तिसरा प्रश्न विचारला....
आई स्वतंत्र भारताची राज्य घटना कोणी लिहली...?       
आईने मोकळे सोडलेले केस बांधायला सुरवात केली आणि अस्तव्यास्त झालेला पदरही निटनेटका केला.....
तसा मी चौथाही प्रश्न विचारला...
हिंदवी स्वराजाचे संस्थापक कोण....?   
आई माझ्याकडे मोठे वटारे डोळे करुन पाहात तडातडा तेथुन निघाली ती थेट मंदिराच्या बाहेरच.    
तेथे जमलेले सारे माझ्याकडे आ वासुन पाहू लागले आई देवळाच्या बाहेर गेली खरी पण घरी नाही गेली देवळाबाहेरच थांबली माझी वाट पाहात.
मी जेव्हा बाहेर आलो तेव्हा ती रागाने पाहात माझ्याकडे आली आण् मला म्हणाली .......मुडद्या.......
अशे प्रश्न विचारायला तुला मीच घावले व्हय.

😀😀😀😀😀😀😀😀😀😀😂😂

Whatsapp fever

💥एक  नंबर स्थळ💥

गंगुबाई  :-  काय हो ,शांताबाई तुमच्या मुलीला कुठलं स्थळ आल होत आज पाहायला
.
.
शांताबाई :- फार चांगल स्थळ आल आहे, मुलीच्या लग्नासाठी
.
.
गंगुबाई :- काय करतो मुलगा ??
.
.
शांताबाई :- मुलगा whatsapp कंपनीत ग्रुप अँडमीन पदावर नोकरीला आहे ,म्हणे पुर्वी १०० लोक होते, आता २५६ लोक त्याच्या हाता खाली काम करतात.
गंगुबाई:अगं छानच आहे
मग पसंत  आहे का आपली कोमल ?

शांताबाई:अगं तिची शाळा कमी असूनदेखील  एका प्रश्नाच्या
उत्तरातच' तिला पसंत केले

गंगुबाई:  कोणता प्रश्न ??

शांताबाई: अगं, कोमलला' विचारले,
तुला वाटसाप' चालवता येत का?

ती म्हणाली,,,,,
नाही येत चालवता ,,,,,
तुम्ही चालवा मी मागे बसेन,,,,,

मग काय तो आनंदाने म्हटला की ,,,,,
मला हिच मुलगी पसंत आहे ,,,,,,

आम्ही पण एकदम होकारच' देऊन टाकला

पोरीनं भाग्य काढलं बघ

पोरगं सुद्धा खुप कष्टाळू आहे
रात्रंदिवस वाटसापवर'.काम करतय'

😃😃😃😜😜😜

ओलीस नाट्य

🇮🇳नक्की वाचा🇮🇳
"ओलिस नाट्य" अभिमान वाटावा असे,
      मित्रांनो आपल्या भारत देशाची पवित्र मानली जानारी अंबरनाथ यात्रा(जम्मु कश्मिर) 
यातील वाळवा तालुक्यातील एका वाघाची सत्य कहानी!!
       आपल्या वाळवा तालुक्यातील बावची गावचे सुपुत्र श्री दिनकर मस्के(दलित महासंघ सांगली जिल्हा उपअध्यक्ष)हे आपल्या ७२सहकार्यासह दि.३०/६/२०१६ रोजी अंबरनाथ यात्रेस रवाना झाले.दि.६/७/२०१६रोजी अंबरनाभ येथे पोहचले देवदर्शण घेउन रात्री तेथेच मुक्काम केला व दिं.८/७/२०१६रोजी परतीचा प्रवास सुरु झाला.श्रीनरच्या पुडे ५ कि.मी. पांपुरगावाजवळ रात्री ८.०० वा पोहचले बसमधुन खरेदी साठी सर्व प्रवासी खाली उतरले.इतक्यात तेथे मोठा लोक समुदाय जमा झाला व दगड फेक चालु झाली लोक समुदाय घोशना देत होते."पाकिस्तान जिंदाबाद,हिंदुस्तान मुर्दा बाद अवाम जिंदाबाद,जिहाद जिंदाबाद" आप यहासे नीकल जाओ हिंदुस्तानी फौजोने हमारे आदमी को मारा है!! तसे आम्ही सर्व प्रवाशी धावत बसमध्ये चढलो .बस चालुकरुन ४ते५कि.मी.काजीकुंड या गावा जवळ काही लोकांनी बसला गराडा घातला व दगड फेक चालु केली .त्या मुळे गोंधळ उडाला काहीच कळेनासे झाले. लोक ओरडत होते "पाकिस्तान जिंदाबाद हिंदुस्तान मुर्दाबाद,जिहाद जिंदाबाद म्हनत होते,त्यातील काही लोकांनी बसच्या दारावर लाता मारीत होते.दरवाजा उघताक्षनी तिन अतंकवादी सशस्र रायफल धारी आत बस मधे घुसले व रायफली रोखुन धरल्या तसे सर्वजन घाबरुन गेले पुडच्या सिट वरच दिनकर मस्के बसले होते.त्या तिघा पैकी एकाने मस्के यांच्या छातीला बंदुक लावली व म्हनाले बोल "पाकिस्तान जिंदाबाद हिंदुस्तान मुर्दाबाद" बोल सबको छोड देंगे बोल जल्दी मस्के यांनी त्यांचे एकले नाही.त्यानी मस्के यांच्या छातीत,हातावर पायाव बंदुकीच्या दस्ता(बट)ने मारनेस चालु केले.मस्के बाकावरुन खाली पडले.तरी ते मारतच होते. मस्के यांना याचा राग आला त्या झीटीत त्यानी छत्रपती शिवाजीमहाराज की जय म्हनत एकट्याने ताकतीने तीघांना जोराचा धक्का दिला तसे ते बसच्या पायरीवर उभे असलेले बसच्या दारातुन बाहेर फेकले गेले.व बसचा दरवाजा अॅटोमॅटीक बंद झाला.तसे प्रसंग सावधान राखुन बस ड्रायव्हरने बस पळवली.मागुन त्यानीं बसवर फायरींग केली बसच्या काचा फूटल्या सुदैवाने कोनाला ईजा झाली नाही.पन मस्के यांचा हात मोडला. ती बस सरळ मिलीटरी बेस कॅंप वर नेली. घडलेली सर्व हकीकत अधिकार्यानां सांगीतली. अधीकार्यानी सर्वाना राहन्याची व चहा नाष्ट्याची सोय केली.सकाळी चार वाजता मस्के यांचा सत्कार केला व पन्नास कि.मी. पर्यंत पुढे एक व माघे एक व मधी बस असे संरक्षण देऊन हा ताफा रेल्वेस्टेशन वर पोहचवला.हे ओलीस नाट्या विस मिनीटाचे होते मित्रांनो ह्या रांगड्या मराठ मोळ्या गड्याला आपन फोनवरुन नविन जिवनाच्या व ७२ प्रवाशांचे प्रान वाचवले बद्दल शुभेच्छा देऊ!! बस एवडेच नाही तर हा मॅसेज ईतका शेअर करा की त्या पाकीस्तानला व अतंकवाद्यानां कळुद्या आमचा एक मराठी माणूस  बस आहे तुम्हाला,भारतीय सेनेच्या नादाला लागु नका!! जय हिंद जय महाराष्ट !! छत्रपती शिवाजींचे छावे आहोत आम्ही जय शिवराय.
                 आपला नम्र
        के
🙏🇮🇳🇮🇳🙏

Saturday, 23 July 2016

Please Think over It

...खरोखर वेळ काढुन वाचा...Vimp... "भडकवणारे" आणि
"भडकणारे"...
----------------------
तो एक तरूण, अत्यंत हुशार, सर्वांचा लाडका...
हा मुलगा एकदा पोलिसांनी पकडला, गाड्या फोडताना...
गेला तुरूंगात, लागली केस, वारी सुरू झाली कोर्टाची....
करिअर गेलं, वर्षे वाया गेलं, जामीन पण नाही,
जवळ पैसे नाहीत,
आयुष्यातुन उठला..का..?

का...तर याला कोणीतरी
कुणाच्या तरी विरोधात
भडकवले आणि हे घडले,
हे एक प्रातिनिधीक
उदाहरण आहे. पण लक्षात ठेवा...

आज जगात दोन प्रकारचे
लोक आहेत, दुसऱ्याला भडकवणारे आणि भडकणारे...!

भडकवणारे-दारू विक्रेत्याप्रमाणे द्वेष विकतात आणि भडकणारे
-दारूप्रमाणे द्वेष पितात..
दारूची नशा लगेच उतरते
पण, द्वेशाची नशा चढत राहते आणि एक दिवस
ज्याप्रमाणे, दारू विकणारा बंगले बांधतो आणि दारू पिणारा भिकारी होतो. तसे भडकवणारे मोठे होतात आणि भडकलेले
बरबाद होतात...
आज आपला तंबाखू सारखा वापर करून
घेतला जातोय, यासाठी शिवाजी महाराजांचे, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नांव घेतले जाते...
त्यांच्या नावाने भडकावले जाते.ज्याने भडकावले,
त्याचा मुलगा स्टडीरूममधे आणि जे भडकले ते कस्टडी रूममधे...
ज्यांनी भडकवले, त्याचा मुलगा अभ्यास करतोय
आणि जे भडकले ते खडी फोडायचा अभ्यास करतेय...
ज्यानी भडकवले त्याचा पोरगा परदेशा शिकायला जातो आणि जे भडकले ते देशी प्यायला शिकतेय...
भडकवणाऱ्यांचा मुलगा
फाड-फाड ईग्लिश बोलतो
आणि भडकणारा बघून घेतो, तंगडंच काढतो,
नादाला लागू नको, वावर गेलं तरी पावर नाय गेली पाहिजे असं बोलतोय...
भडकवणारे परदेशातून
विमानाने भारतात येतात
आणि भडकणारे शिवाजीनगर:१०-१० रूपये; संभाजीनगर:0५- 0५ रूपये बसा ना...
ह्या बाजूला-त्या बाजूला
गाडी भरली, की लगेच निघणार.१०रूपये-५रूपये...
भडकवणारे विमानतळावर उतरतात,
भडकणारे गर्दीत घोषणा देतात...आमके तमके आगे बढो...हम तुम्हारे साथ है...बजाव...वन्सं मोर...ढिंगच्यांग ढिच्यांग...

भडकवणाऱ्यांचा पोरगा पंचतारांकित हाँटालात
ऐटीत बसतो आणि
भडकणारे तिथं वेटर असतात...

कुठे गेली लाज, कुठे गेला आत्मसन्मान...?

छञपती शिवाजी महाराजांचे नांव घेता....
डॉ. बाबासाहेब आंबेडकराचे नांव घेता...

पण, स्वाभिमान माञ
गहाण टाकलाय लाजाही वाटत नाही. अरे किती दिवस, किती पिढ्यां
आपल्या तरूणांना
वाटत नाही कां...?

स्वतःकाही तरी स्वाभिमान निर्माण करावा दुसऱ्याचे
पाय चाटण्यापेक्षा स्वतः मधे आत्मविश्वास निर्माण करावा...!
दुसऱ्याला मोठं करण्यापेक्षा स्वतः मोठं व्हावे...!
दुसऱ्याच्या झाडाला पाणी घालण्यापेक्षा, स्वतः चे रोपटे लावले तर ते मोठं झाड होतं...!

कधी कळणार आम्हाला हे...??

आज आमच्या पोरांचा
केवळ वापर करून घेतला जातो कुणाच्या तरी विरोधात भांडण करण्यासाठी, मारामारी करण्यासाठी...
कसा होणार आमचा
भारत देश महासत्ता...???

२१व्या शतकात आहोत
पण, आमची पोरं काय करतायेत....
वाद घालणे, भांडण करणे,
मारामारी करणे...
हीच गोष्ट मनाला खटकत होती, वाईट वाटत होते,
तळमळ वाटत होती...
पण सांगणार कुणाला...?

एकमेकांशी वाद लावतोय,
वापर करून घेतोय, स्वतःच्या पक्ष, संघटना वाढवतोय....
भावांनो, वाद घालण्यापेक्षा स्वतःशी जर संवाद साधला तर यश मिळाल्या शिवाय राहणार नाही...!
आपल्याला भडकावणाऱ्यांनी कधी स्वतःच्या मुलाला,भावाला,
गाड्या फोडायला, मारामारी करायला लावले का...का नाही लावत...??

अरे, विचार करा आणि
तरीही जर तुम्ही
भडकवणाऱ्या लोकांचं
ऐकत असाल तर तुमचं भविष्य अंधारात आहे...!
विचार करा...कुणाच ऐकून का बरबाद होता...?

या लोकांचं ऐकण्यापेक्षा
स्वतःच्या नोकरी, व्यावसाय, धंदा, शिक्षण, घर, संसार इ. कडे लक्ष द्या...कोणी जर कुणा विरोधात भडकवले
तर त्याला सांगा, अगोदर स्वतःच्या मुलाला सांग...
त्याला गाड्या फोडायला लाव...म्हणजे,काम करायाला आम्ही- आरामाला तुम्ही, बनवायला आम्ही-
खायला तुम्ही, रस्त्यावर आम्ही-पेपरात तुम्ही,
तुरूंगात आम्ही-tv वर तुम्ही...
हे आता थांबले पाहीजे,
तरूणांनो जागे व्हा....
दुसऱ्याला गुलाम म्हणणारे विचार करा,आपण कुणाचे गुलाम नाही ना...?
आपला कुणी वापर करत नाही ना...?
विचार करा...विचार पटले तर मिञांना पाठवा...
🙏🏻धन्यवाद 🙏🏻

Believe ---- there is god even do for uuu

एका गावात एक श्रीमंत कुटुंब राहत असते. नवरा बायको भरपूर दानधर्म करायचे. पण त्यांचा मुलगा देवधर्म काही करत नव्हता. लहान होता तेव्हा काही वाटले नाही.

पण जसा मोठा झाला तशी घरच्यांना चिंता पडली की पुढे याचे कसे होणार ? हा तर देवाचे काहीच करत नाही....

एकदा गावात एक साधू येतात, त्यांना हे कुटुंबिय विनंती करतात.

एकदा तरी त्याच्या मुखातून श्री गुरुदेव दत्त नाम येऊ द्या......!

साधू महाराज खूप वेळ विचार करून त्यांना म्हणतात मी सांगेल तेव्हा त्याला माझ्याकडे घेऊन या, मी त्याच्या कडून दत्त गुरूंचे नाव वदवून घेईल......!

ठरलेल्या दिवशी ते कुटुंबिय त्यांच्या मुलाला घेऊन साधू महाराजां कडे येतात.

तेव्हा साधू महाराज मुलाला प्रश्न विचारतात एकदा श्री गुरुदेव दत्त म्हंटले तर काय होईल.......?

मुलगा त्यांनाच उलट प्रश्न विचारतो....

एकदा श्री गुरुदेव दत्त म्हंटले तर काय होईल......?

मुलाच्या तोंडून दत्तगुरुंचे नाव आले, हे बघून घरच्यांना आनंद होतो आणी ते निघून जातात.

कालांतराने वयोमानानी त्या मुलाचे निधन होते आणि तो यम धर्मापुढे उभा असतो.

तेव्हा तो यमाला म्हणतो. तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची असेल ती द्या,

पण आधी माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या......

यम म्हणतो विचार काय प्रश्न आहे........

मुलगा :- एकदा श्री गुरुदेव दत्त म्हंटले कि काय होते..?

यम :- मला दत्त गुरुंबद्दल माहित आहे पण एकदा श्री गुरुदेव दत्त म्हंटले कि काय होते, हे मला नाही सांगता येणार यासाठी आपण ब्रह्म देवाकडे जाऊ तेच ह्या प्रश्नाचे उत्तर देतील.

मुलगा :- मी ब्रह्म देवाकडे येईल पण तुम्हाला माझ्या प्रश्नाचे उत्तर आले नाही,

म्हणून तुम्ही मला पालखी मध्ये बसवून ब्रह्म देवाकडे घेऊन जायचे......

त्या पालखी चे भोई तुम्ही होणार.........

यमदेव तयार होतात. दोघे ब्रह्म देवाकडे जातात. ब्रह्म देवाला पण तोच प्रश्न विचारला जातो.

ब्रह्म देवाला पण उत्तर माहित नसते. मग ते म्हणतात आपण भगवान विष्णू कडे जाऊ त्यांना हा प्रश्न विचारू. तेव्हा तो मुलगा म्हणतो.....

माझ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आले नाही, म्हणून तुम्ही पण पालखीचे भोई होणार.

ब्रह्म देव तयार होतात....

असे तिघे ते भगवान विष्णू कडे जातात. भगवान विष्णूं ना पण तोच प्रश्न विचारतात.

एकदा श्री गुरुदेव दत्त म्हंटले तर काय होते....?

विष्णू उत्तर देतात दत्त गुरुं बद्दल मला पण खूप माहिती आहे.

पण एकदा गुरुदेव दत्त म्हंटले कि काय होते ते मला पण सांगता येणार नाही......

आपण भगवान शिवांकडे जाऊ त्यांना नक्की माहित असेल. आता पालखी चे दोन भोई झाले असतात.

मुलगा विष्णू ना म्हणतो तुम्हाला माझ्या प्रश्न चे उत्तर आले नाही,

म्हणून आता तुम्ही पंखा घेऊन मला हवा घालणार.....

असे करत ते भगवान शिवा कडे पोचतात. भगवान शिवांना पण या प्रश्न चे उत्तर येते नाही,

म्हणून ते म्हणतात आपण हा प्रश्न स्वतः गुरुदेव दत्तांनाच विचारू..... असे म्हणून सगळे दत्त गुरुं कडे येतात.

श्रीगुरुदेव दत्तां ना बघून मुलगा पालखीतून खाली उतरतो.

अन् दत्त गुरुं ना प्रश्न विचारतो एकदा श्री गुरुदेव दत्त म्हंटले तर काय होते...?

तेव्हा गुरुदेव त्याच्या कडे बघून हसतात आणि सांगतात.......

एकदा श्रीगुरू देव दत्त म्हंटले कि काय होते....?

हा प्रश्न घेऊन तू आयुष्यभर बेचैन राहिलास आणि न कळत पणे किती तरी वेळा माझे नाव घेतले. त्याने काय होते हे तर तुला बघायचे असेल तर बघ......

तू नाम घेत राहिला म्हणून प्रत्यक्ष यम, ब्रह्मा - विष्णू आणि शिव हे तुला जन्म मरणाच्या फेऱ्यातून काढून माझ्या पायापाशी घेऊन आले, तू ह्या सगळ्यातून मुक्त झाला आता कायम माझ्या चरणा जवळ राहशील.......

हेच ते फळ एकदा श्री गुरुदेव दत्त म्हंटले कि मिळते....