*संत तुकाराम आणि मुसलमान* जगदगुरु संत तुकोबाराय पुण्यातुन
दिंडी घेवुन जात होते .
मुख्य पुण्यातुन जाताना एका भर चौकात
जोराचा पाउस सुरु झाला.
दिंडितले सर्व वारकरी आडोसा शोधत
इकडे तिकडे पळायला लागले.
आणि सर्वजन
वेगवेगळ्या ठिकाणी व्हरांड्यात वगैरे
जावुन उभे राहीले .
परंतु तुकोबाराय मात्र पावसातच
भिजायला लागले .
त्याच चौकात एकी कडुन *मंदिर*तर
दुसरी कडुन *मस्जिद* होती .
मंदिराच्या *ब्राम्हनानी* लगेच मंदिराचे दरवाजे बंद
केले.
पण मस्जिदित मात्र चर्चा सुरु झाली .
" अरे ओ तुकाराम भिग रहे हैं."
"ओ बहुत ही बडे संत है "
वगैरे वगैर...
आणि मग काय आश्चर्य मस्जिदीतील
मुसलमानांनी तुकोबारायांना मस्जिदीच्या आत
आदरपुर्वक धरुन नेले .
नंतर सर्व दिंडी *मस्जिद* मध्ये गेली.
सर्व वारकरी *मस्जिद* मध्ये जमले.
रात्रीची किर्तनाची वेळ झाली.
मुर्तीपुजा न मानणारयांच्या मस्जिदित
तुकोबा काय बोलतील आणि कसे किर्तन
करतील याची सर्वाना उत्कंठा लागली .
तुकोबाराय किर्तनाला उभे राहीले
आणि अभंग घेतला.
*अल्ला देवे अल्ला दिलावे !*
*अल्ला दवा अल्ला खिलावे !!*
*अल्ला बगर नही कोये !*
*अल्ला करे सो ही होये !! 1 !!*
(आभंग क्र.444.गाथा देहुची प्रत )
एकही बहुजन संत मुसलमानांच्या विरोधात नव्हते.
कारण त्यांना ठाऊक होते की मुसलमान आपलेच बांधव आहेत...
Saturday, 8 October 2016
संत तुकाराम
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment