Saturday, 15 October 2016

'मराठा क्रान्ति मूक मोर्चा'-Maratha Krani Morcha-

'मराठा क्रान्ति मूक मोर्चा'            एक मराठा लाख मराठा🚩🚩


मराठ्यांनी स्वतःहून एकत्र येऊन सुरु केलेले एक मूक आंदोलन -मराठा क्रांती मोर्चा 
Maratha Kranti Morcha (March) are probably the largest Silent protests by the single community in Independent India. Marathas form nearly 35% of Total maharashtra's population. Every community has constitutional right to hold protests, marches etc. if they have some demands. In case of these Maratha marches, they are held in almost Every District of Maharashtra, one after the other, with the average of minimum 7-8 lakhs people each district. Reasons for these Marches - 1.Rape and the Brutal Murder of a 14 year old girl - In Ahmednagar district of maharashtra, a girl from maratha community was raped and then tortured to death (murdered) [as brutally as or perhaps more than Nirbhaya case of Delhi] by 3-4 drunk people ( I won't mention their caste since Criminals don't have any caste or religion). 




The first demand of Maratha marches is "To hang them till death". 2.Maratha Reservation - Marathas are largest community in maharashtra. Most politicians, past chief ministers, most factory owners, most educational institution owners are from this community but they are only 5% to the total Maratha population. From the remaining 95% Marathas, 36% are land-less, 8% are below poverty line. Those having farms, averages only 1-2 acres per Family. So, once the land was 15 acres per family in Agrarian Economy came to 2 acres per family in Service based economy today (crop totally based on Rain), it caused many Farmers' suicides as there was either no crop or very low rate to the crop. Most of them are from Maratha Community. Also they don't have enough representation in govt jobs. So, many people from this community can't even or just fulfill basic needs as it leaves Education, Jobs quite away ! That's why once Ruler marathas are in crisis if you consider a caste as a whole. That's why Marathas need reservation to come in flow with others in this new Economic system. Hence, the Second demand is for Reservation. 3.Make changes to Atrocities Act (1989) To Avoid the Misuse - Atrocities act has main purpose to protect people of SC/ST community. But this act is said to be misused than used for proper purpose. People from these communities give threats to so called Upper castes' people, demanding money (extortion) or otherwise ask them to face the atrocity. The figures and reports in recent years show that the actual Conviction rate in these cases is Very Low (only 5-8%). Though rate is low, the time,money and efforts wasted are too much for the upper caste people, though they are innocent. Hence , these Maratha marches' Third demand is to make some changes in this act so that this misuse should not happen. If this act continues, perhaps the rift between Backward class people and so called upper caste people will get widened, instead of shortening. So by discussing with all parts of the society, government can come to the Solution. All these morchas (marches) are totally silent in nature, with no particular leader of march, totally disciplined even the police also praises each march, there is large participation of women and girls. Hence an ideal example for anyone for future protests. Though people try to give Political colors to these marches, they are purely for a Social cause. No party can gather 10 lakhs people in each district without spending money i.e. people are self-motivated. So guessing of some political parties behind these marches may be a foolish thing. Since ALL party leaders are purposefully kept away from the marches by the people.
 'मराठा क्रान्ति मूक मोर्चा'
🚩🚩एक मराठा लाख मराठा🚩🚩

Saturday, 8 October 2016

ज्ञानवानी

🙏🏻🌹 *ज्ञान-वाणी* 🌹🙏🏻
*श्रीज्ञानेश्वरी नववा अध्याय*
॥ श्रीज्ञानेश्वर माऊलि समर्थ ॥
॥ *श्रीविद्याराजगुह्ययोग* ॥

परि सर्वथा आपुलां जीवीं ।
केलियाची शंका कांहींचि नुरवीं ।
ऐसीं धुवोनि कर्मे द्यावीं ।
माझियां हातीं ॥ ४०१ ॥
    पण आपल्या अंतःकरणांत मी अमुक केलें अशी कर्तृत्वाची यत्किंचित् देखील आठवण होणार नाही, अशी धुतल्याप्रमाणे सर्व कर्में मला अर्पण कर.

मग अग्निकुंडी बीजें घातलीं ।
तियें अंकुरदशे जेविं मुकलीं ।
तेवि न फळतीचि मज अर्पिलीं ।
शुभाशुभें ॥ ४०२ ॥
      मग अग्निकुंडात घातलेले बी जसे अंकुर दशेला येत नाही, त्याप्रमाणे मला अर्पण केलेले पुण्यपापरूप कर्मही सुखदुःखरूप फळ देत नाही.

अगा कर्मे जैं उरावें ।
तैं तिहीं सुखदुःखीं फळावें ।
आणि तयातें भोगावया यावें ।
देहा एका ॥ ४०३ ॥
    अर्जुना ! कर्म जर करत राहील तर त्याचे सुख किंवा दुःख फळ होईल आणि तें कर्मफळ भोगण्याकरिता देह घ्यावा लागेल म्हणजेच परत जन्माला यावें लागेल.

तें उगाणिलें मज कर्म ।
तेव्हांचि पुसिलें मरण जन्म ।
जन्मासवें श्रम ।
वरचिलही गेले ॥ ४०४ ॥
     तें कर्मच जर कर्तृत्वासह मला अर्पण केलें, तर कर्माच्या अर्पणाबरोबरच जन्ममरण पुसलें जातें आणि जन्म नाहीसा झाल्या बरोबर जन्मांतरी मिळणारें दुःखहि नाहीसें होतें.

म्हणऊनि अर्जुना यापरि ।
पाहेचा वेळु नव्हेल भारी ।
हे संन्यासयुक्ति सोपारी ।
दिधली तुज ॥ ४०५ ॥
      म्हणून अर्जुना ! कर्मकर्तृत्व व भोक्तृत्वरहित होऊन मद्रूप होण्याची ही सोपी युक्ति तुला सांगितली आणि याप्रमाणे याचा अनुभव घेण्याला तुला फार वेळ लागणार नाही.

*॥जय जय श्रीरामकृष्ण हरि॥*

संत तुकाराम

*संत तुकाराम आणि मुसलमान*                                         जगदगुरु संत तुकोबाराय पुण्यातुन
दिंडी घेवुन जात होते .
मुख्य पुण्यातुन जाताना एका भर चौकात
जोराचा पाउस सुरु झाला.
दिंडितले सर्व वारकरी आडोसा शोधत
इकडे तिकडे पळायला लागले.
आणि सर्वजन
वेगवेगळ्या ठिकाणी व्हरांड्यात वगैरे
जावुन उभे राहीले .
परंतु तुकोबाराय मात्र पावसातच
भिजायला लागले .
त्याच चौकात एकी कडुन *मंदिर*तर
दुसरी कडुन *मस्जिद* होती .
मंदिराच्या *ब्राम्हनानी* लगेच मंदिराचे दरवाजे बंद
केले.
पण मस्जिदित मात्र चर्चा सुरु झाली .
" अरे ओ तुकाराम भिग रहे हैं."
"ओ बहुत ही बडे संत है "
वगैरे वगैर...
आणि मग काय आश्चर्य मस्जिदीतील
मुसलमानांनी तुकोबारायांना मस्जिदीच्या आत
आदरपुर्वक धरुन नेले .
नंतर सर्व दिंडी *मस्जिद* मध्ये  गेली.
सर्व वारकरी *मस्जिद* मध्ये जमले.
रात्रीची किर्तनाची वेळ झाली.
मुर्तीपुजा न मानणारयांच्या मस्जिदित
तुकोबा काय बोलतील आणि कसे किर्तन
करतील याची सर्वाना उत्कंठा लागली .
तुकोबाराय किर्तनाला उभे राहीले
आणि अभंग घेतला.
*अल्ला देवे अल्ला दिलावे !*
*अल्ला दवा अल्ला खिलावे !!*
*अल्ला बगर नही कोये !*
*अल्ला करे सो ही होये !! 1 !!*
(आभंग क्र.444.गाथा देहुची प्रत )
एकही बहुजन संत मुसलमानांच्या  विरोधात नव्हते.
कारण त्यांना ठाऊक होते की मुसलमान आपलेच बांधव आहेत...

महाराजांचा खून

शिवरायांचा खून  का व  कसा झाला :--

 हजारो वर्षांची ब्राह्मनी दादागिरी शिवाजीराजे व संभाजीराजे यांनी संपवली त्यामुळे ब्राह्मण आतून प्रचंड चिडले. म्हणून त्यांनी राज्यांचे कुटुंबात भांडण लावण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

अपयश आले तरी मोरोपंत, अण्णाजी, राहुजी सोमनाथ थांबले नाहीत. शिवरायांना संपवायचेच हा पक्का निश्चय त्यांनी केला होता. आण्णाजी दत्तो  रायगडाच्या पायथ्याशी पाचाडला थांबला होता. गडावर राहुजी सोमनाथ हा ब्राह्मण अधिकारी होता. रायगडाची संपूर्ण  नाकाबंदी करण्यात आली. कसल्याही प्रकारचा सुगावा लागणार नाही याची दक्षता या तिघांनी घेतली. म्हणून या कटाचा संशय येऊ नये यासाठी मोरोपंत आणि अण्णाजी दत्तो घटनास्थळा पासून दूर थांबले होते. हत्त्या करण्याचा कट रचणारे, प्रवृत्त करणारे जवळ थांबत नसतात. या प्रसंगी राज्यातील अत्यंत महत्वाची माणसे गडावर नव्हती. संभाजीराजे पन्हाळा गडावर होते. सेनापती हंबीरराव माहिते हे तळबीड या ठिकाणी होते. ते राजगड    पासून २५० किलोमीटर आहे. शिवाजी महाराज यांचे कुटुंबातील सर्व नातेवाईक हे पाचाडला होते. असा स्पष्ट उल्लेख शिवभारतमध्ये आहे. (  संदर्भ :- वा.सी.बेंद्रे लिखित श्री. छ. संभाजी महाराज ) 
  
 तीन एप्रिलचा दिवस उजाडला तेव्हा शिवरायांचे भोवती ब्राहामानांचेच वलय होते. राहुजी सोमनाथने गडावरचे सर्व दरवाजे बंद केले. गडाची सर्व सूत्रे सोमनाथच्या ताब्यात होती. या सार्या परिस्थितीचा फायदा घेऊन  शिवरायांवर विषप्रयोग झाला. संभाजीराजे व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना राज्यांचे खुनाची माहिती समजणार नाही याची खबरदारी घेण्यात आली. राज्यांचा अंत्यविधी हा घाई घाईत उरकण्यात आला. 

दहा  वर्षाच्या राजारामला सिंहासनावर बसउन ब्राह्मण मंत्री सत्ता ताब्यात घेउ इच्छित होते. म्हणून त्यांनी दहा वर्षाच्या राजारामाच्या राज्याभिषेकाची बातमी फुटू न देता राज्याभिषेक उरकला. शिवरायांचा खून व राजाराम यांचा झालेला राज्याभिषेक चोरून लपउन केला गेला. हि बातमी रायगडावरून फुटणार नाही याची दखल घेतली गेली. लगेच ब्राह्माण मंत्र्यांनी संभाजीराजे यांना पकडण्याचे ( अटक) करण्याचे आदेशपत्र हंबीरराव मोहिते यांना दिले.... पण हंबीरराव यांना शिवरायांनी खाजगीत संभाजीला छत्रपती करा असे सांगितले होते. राजाराम हा दहा वर्षाचा आहे त्याला राजाकरणे हे स्वराज्य ब्राह्मण मंत्र्यांचे हातात देणे होईल अशी सूचना शिवरायांनी पूर्वीच " राजारामाचे सख्खे मामा सेनापती हंबीरराव मोहिते " यांना केली होती. हंबीरराव यांना ब्राह्माण मंत्र्यांचे पत्रं मिळताच त्यांनी संभाजीराजे यांना त्याची माहिती कळवली. 

वरील प्रसंग सिद्ध करतो कि सोयराबाई यांचा सख्खा भाऊ हा स्वतःच्या भाच्याला छत्रपती करायची संधी डावलून स्वराज्याचे हित पाहतो. पहा नीट पहा विचार करा सोयराबाईया संभाजी विरोधक नव्हत्या याचा हा पुरावा नव्हे काय ? तरीही हा खून सोयराबाई यांनी केला अशी अफवा  ब्राह्मणी इतिहासकारांनी नंतर उठवली. 
  
जेव्हा शिवरायांचा खून झाला तेव्हा राज्यांचे वय हे अवघे ५०  वर्ष होते. राज्यांना कोणताही असाध्य रोग नव्हता. ते प्रधीर्ग आजारी नव्हते. राज्यांची प्रकृती निरोगी होती. वयाचे ५० व्या वर्षी राज्यांना अनैसर्गिक मृत्त्यू येणे कदापीही शक्य नाही. 


शिवरायांच्या मृत्त्यू बाबद संशय निर्माण करणाऱ्या काही बाबी :--१. शिवरायांचे धर्म परिवर्तनाचे कार्य. 
२. शिवरायांनी  ब्राह्मणी वर्चस्वाला दिलेला शह. 
३. रायगडावरील ब्राह्मण मंत्र्यांचा अंतर्गत विरोध.
४. तीन एप्रिलचे गडावरील संशयास्पद वातावरण. 
५. शिवरायांचा घाई घाईत उरकण्यात आलेला अंत्यविधी.
६. पराक्रमी, विद्वान,चारित्र्यसंपन्न, जेष्ठपुत्र संभाजीराजे यांना धोका देऊन कोणतीही चूक नसताना कैद करायचे आदेश देऊन.... दहा वर्षाच्या कनिष्ठ राजारामला घाई घाईत छत्रपती करण्यामागचा ब्राह्माण मंत्र्यांचा हेतू काय असावा ? 
७. शिवरायांच्याखुनाची, राजारामाच्या राज्याभिषेकाची, माहिती गोपनीय  ठेवण्या माघे ब्राह्माण मंत्र्यांचा  काय हेतू होता ?
८. संभाजी महाराजांचे सांत्वन  करण्यापेक्षा त्यांना अटक करायला गेलेले ब्राह्मणमंत्री यांचा हेऊ काय होता ?
9. या सार्या प्रकारा नंतर संभाजीराजे यांनी सोयराबाई यांना मान दिला, गौरवले व राजाराम महाराज यांना प्रेमाने वागवले....... तर ब्राह्माण मंत्री यांना कैद केले व पुढे त्यांना हातीचे पायाखाली देऊन ठार केले. हे काय दर्शवते 

               संभाजी महाराज यांना अटक करा व आम्हाला वाटेत भेटा असे आदेश ब्राह्माण मंत्र्यांनी हंबीरराव मोहिते यांना दिले होते .पण संभाजी महाराज यांना कपटाने   कैद करायला निघालेल्या मंत्र्यांना ( मोरोपंत, अण्णाजी, प्रल्हादपंत..) हंबीरराव यांनी वाटेतच अटक केले ! त्यानंतर संभाजीराजे हे रायगडावर आले त्यांनी सर्व मातांचे सांत्वन केले. 

सोयराबाई या निर्दोष होत्या हे सिद्ध करणारा एक भक्कम पुरावा म्हणजे  संभाजीराजे २४ ऑगस्ट १६८० रोजी म्हणतात कि ' सोयराबाई या स्फटिका सारख्या निर्मल मनाच्या आहेत'. याचा अर्थ सोयराबाई या निर्दोष तर होत्याच पण त्या संभाजीराजे यांना आदर स्थानी होत्या. कुमंत्र्यांनीच सोयराबाई यांना संभाजी विरोधात भडकवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. [संधर्भ छ. संभाजी (पान २२१ ) वा. सी बेंद्रे.]

  आता आपण शिवरायांचे मृत्युबाबत देशी आणि परदेशी साधनांचा विचार करू :-- 

पुढील संदर्भ साधनांची चिकित्सा करताना त्या साधनांचा काळ व कर्ता याचा विचार केलेला आहे. मराठी आणि संस्कृत साधनांचे लेखक हे ब्राह्मण या एकाच जातीचे असल्याने सत्यशोधनात अडचणी येतात. तरी देखील अपराधीपणाची जाणीव त्या साधनात सापडते. 


सुरवातीला आपण अमराठी साधने पाहूयात ......

१. इंग्रजांचे पत्र " शिवाजी महाराज यांचा मृत्यू रक्तातीसाराने झाला. "
२. पारसी कागदपत्र ( मासिरे आलमसिगरी - साकीमुस्तेखान ) " शिवाजी हे घोड्यावरून उतरले त्यांना अतिउष्णतेमुळे दोन वेळा रक्ताच्या उलट्या झाल्या. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला "
३. निकोलोमनुची ( असे होते मोगल ) - " शिवाजीराजे यांना रक्ताच्या उलट्या होऊन मरण आले "
४. दाघ रजिस्टर ( डच कागदपत्र - १६८० (पृष्ठ ७२४.२९) संदर्भ परयीच्या दृष्ठी. ) - " राज्यांवर विषप्रयोग केला असावा " 

                   शिवाजीराज्यांनी राजारामाचा विवाह १५ मार्च १६८० रोजी प्रतापराव गुजर यांचे मुलीशी लाऊन दिला आणि अवघ्या १८ दिवसात शिवाजीराजे यांचा खून झाला. शिवाजीराजे रक्ताच्या उलट्या होऊन मरण पावले हे सारे जाणतात पण त्यांना रक्ताच्या उलट्या का झाल्या ? हे मात्र सारेच जाणत नव्हते कारण ब्राह्माण मंत्र्यांनी रायगडावरून वाराही बाहेर जाणार नाही याप्रकारे बंदोबस्त केला होता. 




आता आपण मराठी -संस्कृत साधने पाहू :----

१. शिवदिग्विजय - " सोयराबाईंकडून राज्यांना विषप्रयोग झाला "
२. चिटणीस बखर - " सोयराबाईवरच आरोप ठेवते "
३. जेधे शकावली - " चैत्र शुद्ध शनिवार दिवसा दोन प्रहरी रायगडावर शिवरायांचे निधन झाले हंबीरराव मोहिते यांनी मोरोपंत, अण्णाजी, प्रल्हादपंत यांना कैद केले." 

चिटणीस बखर,शिवदिग्विजय या १८१८ सालच्या असल्याने समकालीन नाहीत. पण त्या विषप्रयोग झाल्याचे बोलतात. ब्राह्माण मंत्र्यांनी विषप्रयोग केला पण सोयराबाई यांच्या नावाने अफवा पसरवली. हे वरील साधनांवरून लक्षात येते. 

जेधे शकावली हि दैनंदिनी असल्याने स्पष्टीकरण नाही पण त्यात निधनानंतर लगेच मंत्र्यांना अटक केल्याचे स्पष्ट होत आहे. मंत्र्यांनी खून केला म्हणून त्यांना अटक केली असा स्पष्ट अर्थ निघतो. 
  
बहुजन सामाज्याची दिशाभूल करण्यासाठी नंतर काही ब्राह्माण इतिहासकरांनी शिवरायांचा मृत्यू हा " गुडघी रोगामुळे " झाला अशी अफवा पसरवली. (पण मित्रहो जगाच्या इतिहासात पूर्वी आणि आजही गुडघीरोग कोणालाही झाल्याचे उदाहरण नाही..) तर काही इतिहासकारांनी शिवरायांचा खून हा सोयराबाई यांनी केला असा कुप्रचार सुरु केला. 


याचा स्पष्ट अर्थ काय निघतो ब्राह्माण हे अफवा पसरवण्यात, दिशाभूल करण्यात, कपटकारस्थानात, खून पचवण्यात जगात एक नंबर आहेत. 

राज्यांचा खून पचावायासाठी ब्राह्मण कंपूने अनेक अफवा पसरवल्या. जनतेला खरे गुन्हेगार समजू नयेत खरे आरोपी सुटावेत यासाठी आजही ब्राह्माण खोटा प्रचार, दिशाभूल करत असतात. 

शिवरायांचा खून पचउन स्वराज्य हस्तगत करायचा ब्राह्माण मंत्र्यांचा डाव होता त्यासाठी त्यांनी राजाराम यांचा राज्यभिषेक घाई घाईत उरकला. 

कारण राजाराम हे १० वर्षाचे बालक होते. राजारामला नामधारी राजा करायचे व राज्यकारभाराची सर्व सूत्रे आपल्या हातात घ्यायची असा ब्राह्मण मंत्र्यांचा डाव होता. तसेच संभाजीराजे हे हुशार, धाडसी,पराक्रमी, होते म्हणून संभाजीराजे यांना अटक करायला मोरोपंत, अण्णाजी, प्रल्हादपंत हे पन्हाळागडाकडे निघाले पण वाटेतच या कपटी, स्वराज्यद्रोही, नरपशूना.... स्वराज्यप्रेमी, शिवभक्त, राजाराम यांचे सख्खे मामा हंबीरराव मोहिते यांनी अटक केली आणि संभाजीराजे यांचा रायगडावर अभीषेक केला. !




तात्पर्य :-

                  विषप्रयोग झाला हे सारे जाणतात. काही ब्राह्मणी विचारांना बळी पडून सोयराबाई ही यात सामील होत्या असे समजतात. पण त्याच वेळी शंभूराज्यांनी सोयराबाई यांना कधीच अटकही केले नाही व कोणताही त्रास दिला नाही उलट खुणानंतर ५-६ महिन्यांनी संभाजीयांनी सोयराबाई यांना गौरवले त्याचा सन्मान केला  ! याचा वर पुरावा दिलेला आहे.म्हणजेच सोयराबाई या निर्दोष होत्या हे कोणीही खरा शिवप्रेमी कबुल करेल. म्हणजेच शिवरायांचा खून हा केवळ स्वराज्य बळकावण्यासाठी ब्राह्माण मंत्र्यांनी केलेला ब्राह्मणीकावा होता हे सिद्ध होते....
तरी आजही आपण ब्राम्हणवादी संस्कृतीचे पालन करतो... किती लाजिरवानी गोष्ट आहे... खरं म्हणजे आपण ब्राम्हणांचा निषेध करायला हवा की त्यांनी आपल्याला लाभलेल्या सूर्याचा घात स्वतःच्या फायद्यासाठी केला.... वेगवेगळ्या जाती निर्माण करुन आपल्याला त्यात अडकवल अणि स्वतःचा फायादा करून घेतला.... डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्याला ब्राम्हणांनापासून दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आडव जाऊन देशाला गुलाम बनवल....
"अरे खूप झाल आता ...!! गप्प नाही बसनारच....
शिवाचा  वाघ आहे...
सगल हादरवून टाकणारच....!!!
ही माहिती इतकी शेअर करा कि प्रत्येकाला मिहिती झाली पाहिजे..

संसार दोघांचा

🎾🎾🎾🎾🎾🎾
🎾*दोघांचा संसार*🎾
🎾🎾🎾🎾🎾🎾

परवा परवा बायकोची
तब्येत नव्हती बरी,
सर्दी, खोकला, तापाने
फणफणली बिचारी...

मी म्हणालो आराम कर
मी कामाच बघुन घेईन,
एक दिवस का होईना
तुझ आयुष्य जगुन घेईन !

थंड पाण्याचा पट्ट्या
डोक्यावर तिच्या ठेवत होतो,
थोडा थोडा बाम
डोक्याला तिच्या लावत होतो !

स्वयंपाकाची वाटल
करावी आता तयारी ,
बायको अंथरूणावरून
पहात होती सारी...

कणीक भिजवतांना
पडल बरच पाणी,
पातेल्यात भाजीची
करपुन गेली फोडणी !

करपलेल्या पोळ्यामध्ये
बरेच होते नकाशे,
बायको सार पाहून
गालातल्या गालात हसे !

एका दिवसाच्या स्वयंपाकाने
उडाली माझी तारांबळ,
कुठून मिळत असेल बर
स्त्रियांना एवढ बळ !

जेवण घेतल वाढुन
बायको म्हणाली छान झालं,
तिच माझ्यावरच प्रेम पाहून
मन माझ भरुन आलं !

खारट तिखट भाजीसुद्धा
ती आनंदात जेवली,
जळालेल्या पोळ्यावर
तिने, मनातून माया लावली !

किती नाव ठेवतो आपण
तिने केलेल्या स्वयंपाकाला,
काय वाटत असेल बर
खरच तिच्या मनाला !

तीचा चवदार स्वयंपाक
अजुन चवदार लागतो,
आजारी पडली तेंव्हापासुन
मी शहाण्यासारखा वागतो !
*संग्रहीत*
अनामिक
🎤 *शब्दमैफिल ( चारोळी/कविता )* 🎵

कडीपत्ता

कढीपत्ता : भारतीय वनांमध्ये आणि भारतीय स्वयंपाक घरातले एक महाऔषध
:::::::::::::::::::🐚🐋🌾
कढीपत्ता हा भारतीय आहारातला एक अविभाज्य घटक असून ते एक सुंदर आणि साधे औषध आहे ...पोह्यातला किंवा उपम्यातला कढीपत्ता वेचून बाहेर काढणारे लोक पाहिले त्यांच्या अज्ञानाची भयंकर कीव येते ....
:::::::::::::::::::🐚🐋🌾
कढीपत्त्याचे झाड बऱ्यापैकी मोठे आणि भारतीय सदाहरित वनांमध्ये सहज सापडते .. जंगलातला कढीपत्ता जास्त गडद रंगाचा आणि घमघमीत सुगंध असणारा असतो ...त्याला बऱ्याचदा बिया लागलेल्या सापडतात या बिया गोळा करून अंगणात लावल्या कि फार चांगल्या पद्धतीने रुजतात ....आणि झाड मोठे झाले कि त्याच्या बिया आजूबाजूला पडून नित्यनेमाने कंटाळा येईल इतकी खोलवर मुळे असलेली झाडे उगवतात .....
:::::::::::::::::::🐚🐋🌾
कढीपत्त्याचे आहार आणि औषध अशा अनुषंगाने उपयोग पाहूया :🐚🐋🌾 
१) कढीपत्ता आपण आहारात एक विशिष्ट सुंगंधी चव यावी यासाठी वापरतो ... प्रत्यक्षात कढीपत्त्या मध्ये असलेले तेल हे जिभेवरच्या चवीची संवेदना वाढवते ... त्यामुळे जेवण रुचकर लागते ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
२) जुलाब लागले असता कढीपत्त्याच्या ताज्या पानांचा रस एक अर्धा कप प्यायला कि पोटातल्या वेदना आणि जुलाबाचे वेग वेगाने नियंत्रणात येतात ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
३) कढीपत्ता पचनास चांगली मदत करतो ज्यांना अजिर्णपणाचा सारखा त्रास होतो , जेवल्यावर अस्वस्थ वाटते , पोटात वायु ( गॅस ) पकडतो ....त्यांनी जेवल्यावर कढीपत्त्याची दहा पाने चटणी करून सैंधव मीठ मिसळून खावीत ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
४) कढीपत्ता हा तारुण्य टिकवून ठेवणारा आहे .... नियमित कढीपत्ता खाणारे लोक लवकर म्हातारे होत नाहीत ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
५) मधुमेही रुग्णांनी कढी पत्त्याची दहा बारा कच्ची पाने दिवसातून तीनदा चावून खावीत याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहायला फार मदत होते ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
७) कोलेस्टेरॉल वाढले असेल कढीपत्त्याची अंशपोटी वीस पाने चावून खावीत ....
:::::::::::::::::::🐚🐋🌾
८) कढीपत्त्याची पाने वाळवून चूर्ण करून ती खोबरेल तेलात मिसळून लावावीत ...केस पांढरे होत नाहीत ...शिवाय केसांची गळती कमी होऊन केस लांब वाढायला मदत होते ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
९) कर्करोगाने पिडीत रुग्ण केमो आणि रेडियो थेरपी घेत असताना त्यांच्या शरीरातील सर्वसामान्य पेशींवर सुद्धा फार घातक परीणाम होऊन शरीराचे भयंकर नुकसान होते .... अशा रुग्णांना दिवसातून तीन वेळा कढीपत्त्याची दहा पाने खडीसाखर सोबत चावून खायला लावावीत ... रुग्णाला बराच आराम मिळतो
:::::::::::::::::::🐚🐋🌾
१०) सर्दी खोकल्या सारखे आजार सारखे होत असतील तर अशा लोकांनी सकाळी अंशपोटी कढीपत्त्याची पंधरा पाने चावून खावीत ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
११) यकृताच्या आजारात कढीपत्ता म्हणजे अमृत आहे ... कोणत्याही प्रकारच्या काविळीत कढीपत्ता चावून खाणे म्हणजे अगदी साधा घरगुती उपाय आहे ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
१२) अंगावर सारखे करट उठून त्रास होत असेल तर कढीपत्त्याची पोटातून कच्ची पाने चावून खाल्ल्यास आणि बाहेरून पानांची चटणी करून लावल्यास खूप आराम मिळतो ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
१३) पित्त वाढून सकाळी पित्ताची उलटी होत असेल तर मिरी, आले आणि सैंधव मिसळून कढीपत्त्याची पाने कुटून एकत्र करून खावे याने पित्त वाढत नाही आणि उलटी आणि मळमळ होत नाही ....
:::::::::::::::::::🐚🐋🌾
१४) कढीपत्ता नियमित सेवन केला तर डोळ्यांचे विकार कमी होतात ....
:::::::::::::::::::🐚🐋🌾
कढीपत्त्याबद्दल लिहावे तितके कमीच आहे ... असा हा बहुगुणी आणि आरोग्यसंपन्न कढीपत्ता आहारात नियमित
ठेवा ... कच्चा चावून खा .... आरोग्य प्राप्ती होईलच यात शंका नाही

Wednesday, 5 October 2016

प्रेम - love

प्रेम  ! - दोन मिनिटे वेळ काढून वाचाच !!

एका गावात एक मध्यमवर्गीय पती पत्नी राहात असतात. नुकतेच लग्न झालेले. मात्र एंजॉय करण्याच्या त्या दिवसात आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने हौस मौज, सिनेमा इत्यादी त्यांच्यासाठी अशक्यच होते. तरी एकमेकांवर नितांत प्रेम असल्याने संसार सुरळीत सुरू असतो. पत्नी दिसायला सुस्वरूप, केस तर इतके सुंदर आणि लांब होते की साक्षात सुकेशिनी !!

एकेदिवशी कामावर निघण्याची तयारी करताना अचानक पतीच्या घड्याळाचा पट्टा तुटला आणि घड्याळ जमिनीवर पडून बंद पडले. इतक्यात पत्नी त्याला "टाटा" करायच्या निमित्ताने आलेली असते, ती म्हणते, "अहो, माझा कंगवा सकाळीच तुटलाय. तुम्ही येताना नवीन घेऊन येता का ?"
यावर पती खिन्न आवाजात म्हणतो, "आधीच महिनाअखेर आहे. त्यात आजच माझ्याही घड्याळाने मान टाकलीय. तरी पाहतो प्रयत्न करून तुझ्या कंगव्यासाठी"

लांब केस असल्याने साधा कंगवा तिला उपयोगी नसायचा. थोडा भारीचा घेतला तरच केस विंचरणे सोपे जायचे. पण ?? महिनाखेरने सगळ्या विचारांवर पाणी पडले. ती नकळत थोडीशी दुःखी झाली.
तोही बिचारा खालमानेने कामावर गेला. दिवसभर तो बेचैन होता. प्रिय पत्नीचा कंगवा की आपले घड्याळ ?? व्दिधा मनस्थिती झालेली. शेवटी घरी निघताना तो घड्याळाच्या दुकानात जातो, आणि ते घड्याळ आहे त्या परिस्थितीत विकून टाकतो. आलेल्या पैश्यातून एक सुंदर कंगवा शिवाय तिच्या आवडीचे सुवासिक वासाचे तेल घेऊन तो निघतो.

घरी येतो, पत्नी दार उघडते, आणि त्याला धक्काच बसतो.
कारण तिने आपले इतके सुंदर केस चक्क कापून लहान केलेले दिसतात. त्याच्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे पाहून ती सांगू लागते.
"अहो, नेंहमी या केसाचा हा खर्च आपल्याला परवडणार आहे का ? शिवाय हल्ली पार्लरमध्ये लांब केस विकत घेतात हे कळले. म्हणून आज दुपारी जाऊन केस कमी केले. आता खर्चही वाचला आणि काही रुपयेही मिळाले. त्यातून तुम्हाला एक साधेच पण नवीन घड्याळ आणले आहे. हे घ्या"
तिच्या हातून नवीन घड्याळ घेताना तो गहिवरला. काही न बोलता त्यानेही पिशवीतून तिच्यासाठी आणलेला कंगवा आणि तेल तिला दिले. आता मात्र तिला हुंदका आवरेना !! ती मुसमुसत म्हणाली, "केस कायमचे गेलेले नाहीत. पुन्हा वाढतील की, तुमचा कंगवा वाया जाणार नाही"
आणि दोघेही एकमेकांच्या मिठीत घट्ट सामावले.
मन हलके झाले होते आणि दोघांचे डोळे मात्र नकळत पाझरत होते !!

पती पत्नीच्या प्रेमामध्ये आर्थिक परिस्थिती हे कारण कधीच दुःखाचे ठरत नाही. ठरू देखील नये. त्याने तिची भावना जपावी, तिने त्याचे मन ओळखावे. सुंदर जगण्याला अजून काय हवे ???
शेवटी तर आपणच दोघं असु*

जरी भांडलो, रागाराग केला,
एकमेकांवर तुटून पडलो,
एकमेकांवर दादागिरी करण्यासाठी,
शेवटी तर आपणच दोघं असु.

जे बोलायचं ते बोल,
जे करायचं ते कर,
एकमेकांचे चष्मे शोधण्यासाठी,
शेवटी तर आपणच दोघं असु.

मी रूसलो तर तु मला मनव,
तु रुसलीस तर मी तुला मनवीन,
एकमेकांचे लाड करण्यासाठी,
शेवटी तर आपणच दोघं असु.

जेव्हा नजर कमी होईल,
स्मरणशक्ती पण कमी होईल,
तेव्हा एकमेकांना,
एकमेकांमध्ये शोधण्यासाठी,
शेवटी तर आपणच दोघं असु.

गुडघेदुखी जेव्हा वाढेल,
कुठे बाहेर फिरणं ही थांबेल,
तेव्हा एकमेकांच्या,
पायाची नख कापण्यासाठी,
शेवटी तर आपणच दोघं असु.

"माझे रिपोर्ट्स अगदी नाॅर्मल आहेत,
I am Alright",
असं बोलुन एकमेकांना छेडण्यासाठी,
शेवटी तर आपणच दोघं असु.

जेव्हा आपली साथ सुटेल,
अंतिम निरोपाची वेळ येईल,
तेव्हा एकमेकांना माफ करण्यासाठी,
शेवटी तर आपणच दोघं असु,

शेवटी तर फक्त आपणच दोघं असु, 🎎                                Dedicated to all lovely Couples....☺