Sunday, 18 December 2016

कवी कलश -शंभूराजे

अजरामर मैत्रीचे प्रतीक कवी कलश -शंभूराजे

कविची जातकुळी त्याच्या रंगावरून वा वर्णावरून जोखली जात नाही. ती
त्याच्या शब्दसामर्थ्यावरून मापली जाते. तेव्हा औरंगजेबासमोर अकलूज येथे
कवी कलश आणि शंभूराजांना साखळदंड आणि काढण्या लावून उभे केले होते.
तेव्हा हे दोन्ही राजबंदी आपल्या हाती खरेच गवसले आहेत का यावर
औरंगजेबाचा विश्वास बसत नव्हता.

तो आपल्या सिंहासनावरून अचंब्याने खाली उतरून जमिनीवर नाक रगडून
अल्लातालाला लाख लाख दुवे देऊ लागला होता. तेव्हा तो देखावा पाहून कवी
कलशांच्या मुखातून विजय- उन्मादाने कोणते शब्द बाहेर पडले पाहा;

'यावन रावन की सभा संभू बंध्यो बजरंग
लहू लसत सिंदूर सम खूब खेल्यो रनरंग
ज्यो रवि सारी लखतही, खद्योत होत बदरंग
त्यो तूव तेज निहार के तख्त त्यजो अवरंग.'

(अर्थ - रावणाच्या सभेत जैसे जखडूनी उभे केले हनुमाना
औरंगदरबारी तसाच ठाकसी उभा तू मराठ्यांच्या पंचप्राणा.
शेंदुरासवे रणरंग माखला अंगावरी तुझ्या रे भाग्यवंता
काजव्याचा जळतो टेंभा सूर्यबिंब देखता।
दिव्य मुरत, नखरा नजाकत पाहुनी झुकली दिल्ली
मुजर्‍यास्तव तुझ्या औरंग्या तख्त उतरून येई खाली)

मराठ्यांना कावेबाज शत्रूंचे अंतरंग कधी ओळखता आले नाही आणि दिलदार
दोस्तांची यारीदोस्तीही कधी जोखता आली नाही!

आजमितीला कवि कलशाइतका मराठी इतिहासात कोणी दुष्ट, कपटी आणि बदनाम खलनायक
दुसरा नाही.  मराठी नाटककारांना इतके सुंदर कुपात्र सापडल्यावर त्यांनी
त्याच्याभोवती एकापेक्षा एक नाट्यप्रसंग चितारले. कलश म्हणे कब्जी,
महाकारस्थानी, महापाताळयंत्री. उलट्या काळजाचा. व्यसनांचे वारूळ म्हणजेच
कवि कलश! ज्याने शिवाजीराजांच्या संभाजी नावाच्या कोवळ्या राजकुमाराला
मद्यपी बनविले आणि सरतेशेवटी संभाजीसह मराठ्यांचे राज्य बुडवायचे पापकर्म
केले.

संभाजीराजांनी कवि कलशांना 'छंदोगामात्य' व 'कुलयेख्तियार' असे दोन किताब
दिले होते. त्यांचा समावेश आपल्या अष्टप्रधानांमध्ये केलेला होता. तसेच
पोर्तुगीजांच्या सुद्धा १६८४मधील दोन पत्रांमध्ये ''संभाजीराजांचा
सर्वेच्च प्रधान'' असा कवि कलशांचा उल्लेख करण्यात आला आहे. यावरूनच कवि
कलश हे संभाजीराजांचे अत्यंत निकटतम मित्र होते याबद्दल शंकाच नाही.
संभाजीराजांनी 'बुद्धभूषण' हा संस्कृत ग्रंथ लिहिला. तसेच 'नखशिख',
'सातसतक', 'नायिकाभेद' हे तीन ब्रिज भाषेतील ग्रंथ लिहिले. या
ग्रंथरचनेवेळी संभाजीराजांना कवि कलशांच्

No comments:

Post a Comment