Saturday, 10 December 2016

मराठा क्रांती मोर्चाची भगवी लाट आज पैठणमध्ये – मोर्चाला प्रचंड प्रतिसाद

मराठा क्रांती मोर्चाची भगवी लाट आज पैठणमध्ये – मोर्चाला प्रचंड प्रतिसाद

दिवाळीच्या विश्रांतीनंतर परत एकदा मराठवाड्यात मराठा क्रांती मोर्चाची भगवी लाट आज पहायला मिळाली. यावेळी मोर्चाचे ठिकाण होते औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण.
कोपर्डी बलात्कार घटनेतील आरोपींना फाशी यासह मराठा आरक्षण, अट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापराला आळा, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव, इत्यादि. वेगवेगळ्या मागण्यांचे फलक घेऊन साधारण अडीच ते तीन लाख मराठा समाजबांधव या मोर्चात सहभागी झाले होते. महिला व मुलींची संख्या लक्षणीय होती. तालुक्याच्या ठिकाणीही इतक्या मोठ्या संख्येने लोक एकत्र येतात यावरुन कडाक्याच्या थंडीच्या मोसमातही मराठा क्रांती मोर्चाची धग अजिबात कमी झाली नसल्याचे दिसुन येते.
maratha-kranti-morcha-paithan-2
मराठा क्रांती मोर्चा पैठण ड्रोन फोटो
मोर्चासाठी कावसानकर स्टेडियम या ठिकाणी सकाळपासुन लोक जमा होत होते. सकाळी ११ वाजता मोर्चास प्रारंभ झाला. मोर्चाच्या पहिल्या फळीत महिला व मुली होत्या. मध्यभागी युवक,पुरुष व शेवटी स्वछता करणारे मराठासेवक होते. मोर्चा छत्रपती शिवाजी चौकात आल्यानंतर मुलींनी मोर्चाच्या मागण्यांच्या निवेदनाचे वाचन केले. यावेळी मुलींनी उत्स्फुर्तपणे मनोगते व्यक्त केली. राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता झाली. आतापर्यंतच्या मोर्चात पहायला मिळालेली शिस्त, शांतता आणि स्वच्छता याही मोर्चात पहायला मिळाली.
मराठा क्रांती मोर्चा पैठण जमलेला प्रचंड जनसागर

maratha-kranti-morcha-paithan

No comments:

Post a Comment