Sunday, 18 December 2016

कवी कलश -शंभूराजे

अजरामर मैत्रीचे प्रतीक कवी कलश -शंभूराजे

कविची जातकुळी त्याच्या रंगावरून वा वर्णावरून जोखली जात नाही. ती
त्याच्या शब्दसामर्थ्यावरून मापली जाते. तेव्हा औरंगजेबासमोर अकलूज येथे
कवी कलश आणि शंभूराजांना साखळदंड आणि काढण्या लावून उभे केले होते.
तेव्हा हे दोन्ही राजबंदी आपल्या हाती खरेच गवसले आहेत का यावर
औरंगजेबाचा विश्वास बसत नव्हता.

तो आपल्या सिंहासनावरून अचंब्याने खाली उतरून जमिनीवर नाक रगडून
अल्लातालाला लाख लाख दुवे देऊ लागला होता. तेव्हा तो देखावा पाहून कवी
कलशांच्या मुखातून विजय- उन्मादाने कोणते शब्द बाहेर पडले पाहा;

'यावन रावन की सभा संभू बंध्यो बजरंग
लहू लसत सिंदूर सम खूब खेल्यो रनरंग
ज्यो रवि सारी लखतही, खद्योत होत बदरंग
त्यो तूव तेज निहार के तख्त त्यजो अवरंग.'

(अर्थ - रावणाच्या सभेत जैसे जखडूनी उभे केले हनुमाना
औरंगदरबारी तसाच ठाकसी उभा तू मराठ्यांच्या पंचप्राणा.
शेंदुरासवे रणरंग माखला अंगावरी तुझ्या रे भाग्यवंता
काजव्याचा जळतो टेंभा सूर्यबिंब देखता।
दिव्य मुरत, नखरा नजाकत पाहुनी झुकली दिल्ली
मुजर्‍यास्तव तुझ्या औरंग्या तख्त उतरून येई खाली)

मराठ्यांना कावेबाज शत्रूंचे अंतरंग कधी ओळखता आले नाही आणि दिलदार
दोस्तांची यारीदोस्तीही कधी जोखता आली नाही!

आजमितीला कवि कलशाइतका मराठी इतिहासात कोणी दुष्ट, कपटी आणि बदनाम खलनायक
दुसरा नाही.  मराठी नाटककारांना इतके सुंदर कुपात्र सापडल्यावर त्यांनी
त्याच्याभोवती एकापेक्षा एक नाट्यप्रसंग चितारले. कलश म्हणे कब्जी,
महाकारस्थानी, महापाताळयंत्री. उलट्या काळजाचा. व्यसनांचे वारूळ म्हणजेच
कवि कलश! ज्याने शिवाजीराजांच्या संभाजी नावाच्या कोवळ्या राजकुमाराला
मद्यपी बनविले आणि सरतेशेवटी संभाजीसह मराठ्यांचे राज्य बुडवायचे पापकर्म
केले.

संभाजीराजांनी कवि कलशांना 'छंदोगामात्य' व 'कुलयेख्तियार' असे दोन किताब
दिले होते. त्यांचा समावेश आपल्या अष्टप्रधानांमध्ये केलेला होता. तसेच
पोर्तुगीजांच्या सुद्धा १६८४मधील दोन पत्रांमध्ये ''संभाजीराजांचा
सर्वेच्च प्रधान'' असा कवि कलशांचा उल्लेख करण्यात आला आहे. यावरूनच कवि
कलश हे संभाजीराजांचे अत्यंत निकटतम मित्र होते याबद्दल शंकाच नाही.
संभाजीराजांनी 'बुद्धभूषण' हा संस्कृत ग्रंथ लिहिला. तसेच 'नखशिख',
'सातसतक', 'नायिकाभेद' हे तीन ब्रिज भाषेतील ग्रंथ लिहिले. या
ग्रंथरचनेवेळी संभाजीराजांना कवि कलशांच्

*मुख्यमंत्री - राज्यपाल*

*मुख्यमंत्री - राज्यपाल*
         .
*1) राज्य : अरुणाचल प्रदेश*
राजधानी : इटानगर
मुख्यमंत्री : पेमा खंडू  (रा.कॉ.)
राज्यपाल : ज्योतीप्रसाद राजखोवा
.
*2) राज्य : असम*
राजधानी : दिसपुर
मुख्यमंत्री : सर्वानंद सोनोवाल (भाजप)
राज्यपाल : पी.बी. आचार्य
.
*3) राज्य : आंध्रप्रदेश*
राजधानी : हैदराबाद (प्रस्तावित : अमरावती)
मुख्यमंत्री : एन. चंद्राबाबू नायडू (टीडीपी)
राज्यपाल : ई.एल. नरसिंहम 
.
*4) राज्य : बिहार*
राजधानी : पटना
मुख्यमंत्री: नितिश कुमार (जेडीयू)
राज्यपाल : रामनाथ कोविंद
.
*5) राज्य : छत्तीसगढ़*
राजधानी : नया रायपुर
मुख्यमंत्री : डॉ. रमण सिंग(भाजप)
राज्यपाल : बलराम दास टंडन
.
*6) राज्य : दिल्ली (कें.प्र.)*
राजधानी : दिल्ली
मुख्यमंत्री : अरविंद केजरीवाल(आप)
राज्यपाल : नजिब जंग
.
*7) राज्य : गोवा*
राजधानी : पणजी
मुख्यमंत्री : लक्ष्मीकांत पार्सेकर (भाजप)
राज्यपाल : मृदुला सिन्हा
.
*8) राज्य : गुजरात*
राजधानी : गांधीनगर
मुख्यमंत्री : विजय रुपाली(भाजप)
राज्यपाल : ओ.पी. कोहली
.
*9) राज्य : हरियाणा*
राजधानी : चंडिगढ़
मुख्यमंत्री : मनोहरलाल खट्टर (भाजप)
राज्यपाल : कप्तानसिंग सोलंकी
.
*10) राज्य : हिमाचल प्रदेश*
राजधानी : शिमला
मुख्यमंत्री : वीरभद्रसिंग (रा. कॉ.)
राज्यपाल : आचार्य देवव्रत
.
*11) राज्य : जम्मु काश्मीर*
राजधानी : जम्मू, श्रीनगर 
मुख्यमंत्री: मेहबूबा मुफ्ती (पीडीपी)
राज्यपाल : एन.एन. व्होरा
.
*12) राज्य : झारखंड*
राजधानी : रांची
मुख्यमंत्री : रघुवर दास (भाजप)
राज्यपाल : श्रीमती द्रोपदी मुर्मू
.
*13) राज्य : कर्नाटक*
राजधानी : बंगलुरू 
मुख्यमंत्री : सिद्धरम्मैया (रा. कॉ.)
राज्यपाल : वजुभाई वाला
.
*14) राज्य : केरल*
राजधानी : तिरूअनंतपुरम
मुख्यमंत्री : पीनाराई विजयन (माकप)
राज्यपाल : पी. सथशिवम
.
*15) राज्य : मध्य प्रदेश*
राजधानी : भोपाल
मुख्यमंत्री : शिवराजसिंह चौहान ( भाजप )
राज्यपाल : राम नरेश यादव
.
*16) राज्य : महाराष्ट्र*
राजधानी : मुंबई
मुख्यमंत्री : देवेंद्र फडणवीस ( भाजप )
राज्यपाल : सी. विद्यासागर
.
*17) राज्य : मणिपुर*
राजधानी : इंफाल
मुख्यमंत्री : ओकराम इबोबी सिंग (रा. कॉ.)
राज्यपाल : व्ही. षण्मुखानाथन
.
*18) राज्य : मेघालय*
राजधानी : शिलाँग
मुख्यमंत्री : मुकुल संगमा ( रा. कॉ.)
राज्यपाल : व्ही. षण्मुखनाथन
.
*19) राज्य : नागालैंड*
राजधानी : कोहिमा
मुख्यमंत्री : टी.आर. झेलियांग (एन.पी. एफ.)
राज्यपाल : पद्मनाथ आचार्य
.
*20) राज्य : मिजोरम*
राजधानी : ऐजॉल
मुख्यमंत्री : पु. ललथनहवला (रा. कॉ.)
राज्यपाल : निर्भय शर्मा
.
*21) राज्य : ओडिशा*
राजधानी : भूवनेश्वर
मुख्यमंत्री : नवीन पटनाईक ( बीजेडी )
राज्यपाल : एस.सी.जमीर
.
*22) राज्य : पांडिचेरी (कें.प्र.)*
राजधानी : पांडिचेरी
मुख्यमंत्री : व्ही. नारायणसामी ( रा. कॉ.)
राज्यपाल : किरण बेदी
.
*23) राज्य : पंजाब*
राजधानी : चंडीगढ़
मुख्यमंत्री : प्रकाश सिंग बादल (अकाली दल)
राज्यपाल : कप्तानसिंग सोलंकी
.
*24) राज्य : राजस्थान*
राजधानी : जयपूर
मुख्यमंत्री : वसुंधरा राजे शिंदे (भाजप)
राज्यपाल : कल्याण सिंग
.
*25) राज्य : सिक्किम*
राजधानी : गंगटोक
मुख्यमंत्री : पवनकुमार चामलिंग (एसडीएफ)
राज्यपाल : श्रीनिवास पाटिल
.
*26) राज्य : तमिलनाडू*
राजधानी : चेन्नई
मुख्यमंत्री : जे. जयललिता (एआयएडीएमके)
राज्यपाल : के. रोसैय्या
.
*27) राज्य : तेलगांना*
राजधानी : हैदराबाद
मुख्यमंत्री : चंद्रशेखर राव (टीआरएस)
राज्यपाल : इ. एस. एल. नरसिंहन
.
*28) राज्य : त्रिपुरा*
राजधानी : अगरतला
मुख्यमंत्री : माणिक सरकार (माकप)
राज्यपाल : तथागत रॉय
.
*29) राज्य : उत्तरप्रदेश*
राजधानी : लखनऊ
मुख्यमंत्री : अखिलेश यादव (सपा)
राज्यपाल : राम नाईक
.
*30) राज्य : उत्तराखंड*
राजधानी : देहरादून
मुख्यमंत्री : हरिष रावत ( रा. कॉ.)
राज्यपाल : कृष्णकांत पॉल
.
*31) राज्य : पश्चिम बंगाल*
राजधानी : कोलकता
मुख्यमंत्री : ममता बॅनर्जी (टीएमसी)
राज्यपाल : केसरीनाथ त्रिपाठी
,

महाराष्ट्र केसरी विजेते

1961 ते २०15 पर्यंतचे महाराष्ट्र केसरी विजेते
...!!!

१) पैलवान दिनकरराव दह्यारी-१९६१
२) पैलवान भगवान मोरे -१९६२
३) अनिर्णायीत -१९६३
४) पैलवान गणपतराव खेडकर -१९६४
५) पैलवान गणपतराव खेडकर-१९६५
६) पैलवान दिनानाथ सिंह-१९६६
७) पैलवान चंबा मुतनाळ -१९६७
८) पैलवान चंबा मुतनाळ-१९६८
९) पैलवान हरिश्चंद्र बिराजदार -१९६९
१०) पैलवान लक्षण वडार -१९७०
११) पैलवान दादू मामा चौगुले -१९७१
१२) पैलवान युवराज पाटील-१९७२
१३) पैलवान लक्षण वडार -१९७३
१४) पैलवान युवराज पाटील -१९७४
१५) पैलवान रघुनाथ पवार -१९७५
१६) पैलवान हिरामण बनकर -१९७६
१७) अनिर्नयित -१९७७
१८) पैलवान अप्पा कदम -१९७८
१९ ) पैलवान शिवाजीराव पाचपुते -१९७९
२०) पैलवान इस्माइल शेख -१९८०
२१) पैलवान बापू लोखंडे -१९८१
२२) पैलवान संभाजी पाटील-१९८२
२३) पैलवान सरदार कुशाल -१९८३
२३) पैलवान नामदेव माले-१९८४
२४) पैलवान विष्णुजी जोशीलकर -१९८५
२५) पैलवान गुलाब बर्डे -१९८६
२६) पैलवान तानाजीराव बनकर-१९८७
२७) पैलवान रावसाहेब मगर -१९८८
२८) अनिर्णायीत -१९८९
२९) अनिर्नयित -१९९०
३०) अनिर्नायीत -१९९१
३१) पैलवान अप्पालाल शेख -१९९२
३२) पैलवान उदयराज यादव -१९९३
३३) पैलवान संजय दादा पाटील-१९९४
३४) पैलवान शिवाजी -केकाण १९९५
३५) स्पर्धा झाल्या नाहीत...१९९६
३६) पैलवान अशोक शिर्के-१९९७
३७) पैलवान गोरख सरस -१९९८
३८) पैलवान धनाजी फडतरे -१९९९
३९) पैलवान विनोद चौगुले -२०००
४०) पैलवान राहुल काळभोर-२००१
४१) पैलवान मुन्नालाल शेख -२००२
४२) पैलवान दत्ता गायकवाड -२००३
४३) पैलवान चंद्रहास निमगिरे -२००४
४४) पैलवान सइद चाऊस -२००५
४५) पैलवान अमोल बुचडे -२००६
४६) पैलवान चंद्रहार पाटील-२००७
४७) पैलवान चंद्रहार पाटील -२००८
४८) पैलवान विकी बनकर-२००९
४९) पैलवान समाधान घोडके-२०१०
५०) पैलवान नरसिंह यादव-२०११
५१) पैलवान नरसिंग यादव 2012
52) पैलवान  नरसिंग यादव2013
53) पैलवान विजय चौधरी 2014
54) पैलवान विजय चौधरी 2015
  55)पैलवान विजय चौधरी 2016.

गरूडभरारी

*गरूडभरारी म्हणजे काय ?*
👌👌👌👌👌👌👌👌

गरूडाचं आयुष्य असतं 70 वर्षाचं,पण तो 40 वर्षाचा होईपर्यंत त्याची चोच बोधट आणि वाकडी होते. त्याची नखं निकामी होतात. त्याच्या पंखातील बळ कमी होतं. सावज पकडणं त्याला जमत नाही. जीवनातील शौर्य संपलं . आता खाण्यापिण्याची भ्रांत अशी अवस्था होते. नखं नसलेला आणि आयाळ नष्ट झालेल्या म्हाता-या सिंहासारखं किंवा दात काढलेल्या सापासारखं जगणं पदरी येतं. कमालीचं नैराश्य जगणं असह्य होऊन जातं.
पण गरूडाचं काळीज वेगळचं असतं. उंच उंच उडत गरूड एका पहाडावर जातो एकटाच. खडकावर चोच आपटून आपटून तो मोडून टाकतो. एखाद्या ऋषींनी तपश्चर्येला बसावं असे दिवस काढतो त्या पहाडावर.
त्याला कुणी शिकवत नाही. हळूहळू पुन्हा अणकुचीदार चोच येऊ लागते; मग त्या चोचीनं तो स्वत:ची नखं उपसून काढतो. किती वेदना होत असतील; पण तो ते सहन करतो. नखं पुन्हा येतात तर त्या नखांनी तो स्वत: चे पंख उपसून फाडून काढतो. बिनपंखांचा गरुड पुन्हा एकटा राहतो. काही काळानंतर त्याला पुन्हा पंख येतात, चोच तोवर मोठी होते, नखं धारदार होतात.
आणि मग तो जगप्रसिध्द गरूड आकाशात उंच भऱारी मारतो. तितक्याच ताकदीनं आत्मविश्वास आणि शौर्यानं तो पुढील 30 वर्षॆ जगतो.
स्वत:ची नखं उपसणं ही तपश्चर्या, वेदना परिवर्तनासाठी सहन करणं ही तितिक्षा (वेदना हसतमुखानं सहन करणं म्हणजे तितिक्षा) . एखाद्या योद्ध्याचं शौर्य आणि ऋषीचं तप अंगी बाळगणा-या त्या राजपक्ष्याची भरारी ही जगभऱ गरूडभऱारी म्हणून मानानं ओळखली जाते.
🎭
"रडतोस काय माणसा , बदलाला सामोरं जा. तोड ती तुझी नैराश्याची बोथट झालेली चोच, उपट तुझी ती आळसानं बोथट झालेली नखं ; फाड तुझ्या त्या नाकर्तेपणाचे आणि पुन्हा एकटा वाट बघ. या सृष्टीचं सृजनत्व नक्कीच तुला नवसंजीवनी देईल. निराशेचं तुटलेलं मुंडकं हातात घेऊन शौर्याचं खड्ग पुन्हा एकदा तळपव त्या काळ्या खडकावर आणि सज्ज हो पुन्हा एकदा गरूडभरारी घ्यायला .

हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे फक्त तुम्ही त्यातुन काय घेता ते महत्वाचे...

Really good message.

एका गावात एक विद्वान अर्थतज्ज्ञ रहात होता . त्याची ख्याती सर्वदूर पसरलेली होती ...

तिथल्या स्थानिक राजाने एकदा चर्चा करायला त्याला बोलवले,

भरपूर वेळ चर्चा झाली मग राजा  म्हणाला " महाशय
तुम्ही अर्थशास्त्रात खरेचं फार विद्वान आहात पण मग तुमचा मुलगा असा बावळट का ?

काही त्याला शिकवा.

त्याला सोने आणि चांदी यात
जास्त मुल्यवान काय इतके सुध्दा कळत नाही "

आणि

मोठ्याने हसू लागला ....

हे ऐकून त्या विद्वानाला फार वाईट वाटले ...

तो घरी गेला ....

त्याने मुलाला विचारले
" बाळा मुल्यवान काय आहे सोने का चांदी ? "

" सोने " क्षणाचाही विलंब न लावता मुलगा उत्तरला

" हो तुझे उत्तर बरोबर आहे . मग तो राजा असा का हसला ?

म्हणाला तुला सोने आणि चांदी यात मुल्यवान काय माहीत नाही ..!

माझी चार लोकात खिल्ली उडवली जाते ..

तुला माहीत आहे मुल्यवान काय आहे..!!

मुलगा म्हणाला
राजा रोज त्याच्या वाड्याजवळ छोटा दरबार भरवतो ...

रोज मी शाळेत जातो त्या रस्त्यातचं राजाचा वाडा आहे

मी दिसताचं राजा मला बोलावून घेतो ..

त्याच्या सोबत गावातील
सारे लोकं प्रतिष्ठीत तिथेचं असतात ....

राजा एका हातात
सोन्याचे नाणे आणि एका हातात चांदीचे नाणे माझ्या समोर
धरतो आणि मला सांगतो यातले सगळ्यात किमती नाणे उचल ..

आणि

मी चांदीचे नाणे उचलतो ..

त्यामुळे तिथे असलेले सगळे
मोठ्याने हसतात ...

सार्यांना मजा वाटते .......

असे रोज घडते

मुलाला सोने चांदी यातला फरक कळतो तरी हा रोज असे का करतो

चांदीचे नाणे मुल्यवान म्हणून उचलतो हे मात्र त्याला उमगले नाही

न राहून त्याने मुलाला विचारले " मग तु सोन्याचे नाणे का उचलत नाही ?

असल्या मुर्खपणा करुन माझी अब्रु चार लोकात का काढतो ?"

मुलगा जरा हसला मग विद्वानाचा हात धरुन त्याला आत घेवून गेला
कपाटातून त्याने एक पेटी काढली आणि उघडली. ती पेटी चांदीच्या
नाण्यांनी भरलेली होती ...

हे पाहून विद्वान अवाकचं झाला ..

मुलगा म्हणाला
" ज्या दिवशी मी सोन्याचे नाणे उचलेल त्या दिवशी हा खेळ बंद होईल ..

त्यांना मला मुर्ख सिध्द करुन मजा येत असेल
तर येवू द्या ..

पण जेव्हा मी हुशार होईल तेव्हा मला काहीचं मिळणार नाही.

मुर्ख असणे वेगळे आणि मुर्ख समजणे वेगळे "

सोन्याची एक संधी साधण्या पेक्षा प्रत्येक संधीचे सोने करा !!!
काय वाटते ?

समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो.

काहीजण त्यातुन मोती उचलतात,

काहीजण त्यातुन मासे घेतात तर काहीजण फक्त आपले पाय ओले करतात.

हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे फक्त तुम्ही त्यातुन काय घेता ते महत्वाचे...

प्लिज नक्की forward करा, खूप छान मेसेज आहे

🙏🏻चला..जगण्याची दिशा बदलूया..!! सुरुवात स्वतःपासून..!!

*हे कायमचे लक्षात ठेऊया:*

*1) 🤑🌶🍒 लिंबू-मिरची खायची असतात - बांधण्यासाठी नसतात..*

*2) 😱🐈 मांजर पाळायची असते - मांजर आडवी गेली कि काही वाईट होत नाही.उलट उंदरांपासून नुकसान होण्याचे टळते.*

*3) 🗣💭💃 शिंक येणे हा नैसर्गिक प्रकार आहे - शिंकल्याने काही अघटीत होत नाही किंवा काही अडचणीही येत नाहीत..*

*4) 💀🌳 भूत झाडावर राहत नाही - झाडावर पक्षी राहतात..*

*5) 🔬🔭 चमत्कार असे काही नसते - प्रत्तेक गोष्टी मागे विज्ञान आहे प्रत्येकाला कारण आहे..*

*6) ⛄☃ बुवा, बाबा लोक खोटे आहेत - ज्या लोकांना अंग मेहनत करायची नसते तेच हे लोक..!!*

*7) ⛈🌪👺🔥 करणी,         जादू टोणा काही नसते - हे भ्याड लोकांच्या मनाचे खेळ आहेत..*
*जादू-टोणा करून ग्रहाची दिशा बदलणारे हे ढोंगी बाबा: वारा, ढगांची दिशा बदलून पाऊस का पाडत नाहीत...?*⛈☁🌒💫

*8)🌏🐠वास्तुशास्त्र भ्रामक आहे. केवळ दिशांची भिती दाखवून लूट आहे.*
*खरे तर पृथ्वी ही स्वत: क्षणा* *क्षणाला दिशा बदलत असते.*
*खरेच कुबेर उत्तर दिशेला* *असता तर जगातील इतर ठिकाणी कसा आला नाही.*

*9) 👼🐓🐐🍇🍎नवसाने,  व्रताने, पुजेने, नैवैद्याने, बळीने, देणगीने, प्रसन्न होऊन फळ देतो देव, म्हणजे तो काय लाचखाऊ आहे का ?!!*

*10) हे जे वाचलात ते स्वता अनुकरण करा आणि आपल्या मित्रांना देखिल send करा ।*

*हा मैसेच बाकी ग्रुपवर send केल्यामुळे काही चांगली बातमी येणार नाही पण पुढची पीढ़ी नक्की  सुधरे

☀  मुहूर्ताचे वेड ☀
ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस, तीच वेळ आपल्यासाठी शुभ..!! जन्माला येताना कधी मुहर्थ पहिला नाही. व मरतानाही पाहणार नाहीत. तरी सुद्धा जिंदगी मुहूर्त पाहण्यात जाते. सगळेच दिवस,, सर्वच वेळ शुभ आहे. फक्त इच्छाशक्ती प्रबळ असावी..आपल्यासाठी  सर्वच दिवस सर्वच वेळ शुभ आहे..!!

☀ कुंडल्या पाहून लग्नांचे मुहूर्त काढले जातात तरी अनेक स्त्रीया विधवा व पुरूष विधूर का होतात...? 
पत्रिका व कुंडली जुळवून लग्न झालेल्या जोडप्यांचे घटस्फोट का  होतात, तर काही अकाली मृत्यू होतात असे का..?
95% विवाह हे मुहूर्तानुसार वेळेवर लागत नाहीत तरी मुहूर्ताचा आग्रह का धरावा...?
  
☀ मुहूर्त पाहून निवडणुकीसाठी उभे राहणा-या सर्व उमेद्वारांपैकी एकच निवडून येतो आणि बाकीचे आपटतात. असे का घडते.....? एकालाच मुहूर्त शुभ होता काय ?

मंत्रीपद मिळाल्यानंतर  मंत्रालयाची  जबाबदारी स्वीकारण्यासाठी  व खुर्चीवर बसण्यासाठी  शुभ मुहूर्त शोधतात तरी त्यांच्या योजना अयशस्वी का होतात...????  मंत्रीपद अल्प कालावधीत का जाते !

☀ शुभ मुहूर्तावर  मूल जन्माला घातल्यास  वैज्ञानिक,  राष्ट्रपती,  पंतप्रधान  होईल काय..?
☀ अंबानीच्या जन्म मुहूर्ताला जन्माला आलेली  व्यक्ती ....ती पण ..अंबानीसारखी  झाली का...?

☀ उच्च शिक्षित डॉक्टर, इंजिनियर  , उद्योजक, आपल्या कार्यालयाचे  बांधकाम करतांना,  व्यवसायास प्रारंभ करतांना मूहूर्त पाहूनच सर्व करतात.....तरी सुद्धा  कित्येकांना अपयश येते असे का...?

         :  कारण :
☀   शुभमुहूर्त  हे थोतांड आहे सत्य नव्हे... ज्यांचा स्वतः वर विश्वास नसतो ,तेच लोकं अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात.
☀मुहूर्त पाहणारी पेशवाई नष्ट झाली ...आणि कधीही मुहूर्त न पाहणारी .....ब्रिटिशशाही अख्खा  भारत देश गिळून बसली.
☀स्वतःवर व स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवा. चांगले कर्म हेच देव-ईश्वर माना.

☀ जर कोणता पंडित, ज्योतिषी, बुवा, बापू, कापु, झापु महाराज,साधू ,साध्वी तथा वास्तूशास्त्र विशारद शुभमुहूर्तावरच सर्व काही केल्यास तथा वास्तूशास्त्राप्रमाणेच बांधकाम केल्यास यश येईल असे सांगत असतील तर..... स्टँम्प पेपरवर लिहून देण्यास सांगा.  यश न आल्यास नुकसानभरपाईचा दावा ठोकेल  असे सांगा . ते तुमच्या जवळही फिरकणार नाहित.
कारण त्यांनाही माहित असते हे सर्व थोतांड आहे.

☀ जर तुमचं  मन साफ असेल व  तुमच्यात प्रयत्न करण्याची क्षमता असेल....तर तुमच्यासाठी कोणतीही  वेळ  ही  ' शुभ मुहूर्तच ' असते " चला तर आजपासून शुभ-अशुभ या चक्रात न पडता विज्ञानवादी होऊ या.

🙏🏻चला..जगण्याची दिशा बदलूया..!!

सुरुवात स्वतःपासून..!!🙏🏻

तूप

तूप

1) जेवण कसलेही असो, पंगतीला तूप वाढले की मगच जेवायला सुरुवात करायची आपली परंपरा आहे. एकंदरीत तूप हा स्वयंपाकघरातील एक अविभाज्य घटक आहे.

2) जुन्या काळात युद्ध-लढाईत झालेल्या जखमा भरून येण्यासाठी तुपाचा वापर केला जात असे. तूप जेवढे जुने तेवढे गुणकारी.

3) घृत, अज्या, हवी, सर्पी, घी वगैरे विविध नावांनी ओळखले जाणारे तूप मधुर, अत्यंत बलवान, थंड, पित्तशामक, मेद, मज्जा आणि शुक्रधातूंचे पोषण करणारे आहे.

4) तुपामुळे स्मृती, बुद्धी इत्यादींची वाढ होते. मेंदूवर तुपाचे कार्य होते. तुपाचे वैशिष्ट्य म्हणजे तूप खाल्ल्यावर भूक वाढते. अग्निवर्धक हे तुपाचे श्रेष्ठ कार्य आहे. तूप डोळ्यांना हितकारक आहे.

5) तुपामुळे स्वरयंत्र सुधारते आणि आवाज उत्तम होतो. तूप योगवाही आणि रसायन गुणधर्माचे आहे.

6) तूप कोणत्याही रोगात विशेषत: वात-पित्तज विकारात वापरता येते. आयुर्वेदात अनेक औषधिद्रव्ये तुपात सिद्ध करून त्यांचे औषधी पाठ बनवले आहेत.

7) डोके दुखत असेल तर तूप कोमट करून नाकपुड्यांत थेंब टाकावेत किंवा दुखर्या कपाळावर हलकेच मालीश करावे.

8) शंभर वेळा धुतलेले तूप (शतधौत घृत) त्वचाविकार, जखमा, अंगाला खाज, पायांच्या टाचा फुटणे, अंग फुटणे इत्यादी विकारात उपयुक्त औषध आहे.

9) तूप किंचित कोमट करून खाल्ल्यास उचकी थांबते. तुपाचे थेंब नाकात टाकल्यास नाकातून रक्त पडणे थांबते.

10) रात्री झोपताना पेलाभर दुधात एक चमचा तूप टाकून प्यायल्यास शौचाला सकाळी साफ होते. तुपामुळेमूळव्याध बरा होतो.

11) तूप खाल्ल्याबरोबर रूप लगेच येत नसले, तरी तूप खाल्ल्यावर लगेच चरबी (कोलेस्ट्रॉल) वाढते हे चूक आहे. जे नेहमी हिंडतात, फिरतात, व्यायाम करतात त्यांनी अवश्य रोज तूप खावे.

12) कॅन्सरच्या पेशंटला तूप म्हणजे अमृतासमान औषध. तुपात कॅन्सर पेशींची वाढ थांबवण्याची शक्ती आहे.

*भारतात आतापर्यंत तीन वेळा नोटाबंदी झाली.*

*भारतात आतापर्यंत तीन वेळा नोटाबंदी झाली.*

*१९४६*

*१९७८*

*२०१६*

*या तिन्हीत  काय साम्य आहे...???*

*तिन्ही वेळी कॉन्ग्रेस सत्तेत नव्हती.*

*ही आहे वस्तुस्थिती*

*सरदार वल्लभभाई पटेल - १९४६*

*मोरारजी देसाई - १९७८*

*नरेंद्र मोदी - २०१६*

*सर्व गुजराथी*

*काय योगायोग ?????*

*👇आस्चर्यकारक पण सत्य*

पंतप्रधान-  गुजराथी

*नरेंद्र मोदी*

भाजपा अध्यक्ष - गुजराथी

*अमित शहा*

आर बी आय गव्हर्नर - गुजराथी

*उर्जित आर पटेल*

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती - गुजराथी

*मुकेश अंबानी*

चलनावरील नोटेवर - गुजराथी

*महात्मा गांधी*

*काय योगायोग...???*

Saturday, 10 December 2016

hasu naka

 डॉन आपल्या जहाजावर
फे-या मारत होता.
.
.
एक मुलगा धावत त्याच्याजवळ आला आणि म्हणाला,
.
.
"भाई.......शत्रुचे एक जहाज आपल्या
दिशेने येत आहे."
.
.
.
.
.
डॉन शांतपणे म्हणाला
"जा आणि माझा लाल शर्ट घेऊन ये "
.
.
.
नंतर शत्रुच्या जहाजा बरोबर जोरदार
युद्ध झाल.
.
.
.
बंदुकीच्या जोरदार फैरी झाडल्या गेल्या आणि अखेरीस डॉनने जहाज जिंकले.
.
.
.
मुलगा डॉन जवळ आला आणि
म्हणाला ,
.
.
.
" अभिनंदन भाई .....पण लाल शर्ट कशासाठी ? "
.
.
.
" जर मी जखमी झालो तर , माझ्या
शरीरावर रक्ताचे डाग बघुन माझ्या माणसाचा धीर खचेल आणि ते
जिंकण्याची आशा सोडून देतील.
.
.
रक्ताचे डाग दिसू नयेत म्हणून लाल
शर्ट !"
.
.
.
(तात्पर्य : for success , hope is
important )
.
.
.
त्यानंतर थोड्याच वेळात तोच मुलगा
धावत आला आणि म्हणाला ,
.
.
.
" भाई....शत्रुची वीस जहाजे आपल्या जहाजाच्या दिशेने येत आहेत !"
.
.
.
डॉन थोडावेळ शांत उभा
राहीला आणि म्हणाला ,




















.
.
" जा........
आणि
.
.
माझी पिवळी पँट घेऊन ये ".
😂😂😂😂😝😝                       
"""""""""""""""""""""""""
 एकदम भारी जोक 😂😂😂😂

कोर्टामधे जज कैद्याला विचारतात

जज - बोल तुझी शेवटची इछा काय आहे?

कैदी - माझ्याएवजी तुम्ही फाशी घ्या 😝😝😝😝
जज फरार 😂😂😂😂😂                       
"""
 कैशलेस भारत में
होटलों या ढाबे पर खाना खाते वक्त सावधानी बरतें 

नेटवर्क न आने पर 
बर्तन धोने पड सकते हैं 😜

Paytm                       
[
""""""""""""""""""""""""
अमेरिकेकडे ताकत आहे

जापान आणि चीन कड़े टेक्नोलॉजी आहे.......

पाकिस्तान कड़े आतंकवादी आहे
तरीपण सगळे भारताला घाबरतात का ?????
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कारण भारताकडे कटप्पा आहे

आणि 7 - 8 साऊथ चे हीरो बॉर्डर वर पाठवले तर विषयच संपला...


टिप:-रजनीकांत चा उपयोग फक्त महायुद्धात होईल....

मराठा क्रांती मोर्चाची भगवी लाट आज पैठणमध्ये – मोर्चाला प्रचंड प्रतिसाद

मराठा क्रांती मोर्चाची भगवी लाट आज पैठणमध्ये – मोर्चाला प्रचंड प्रतिसाद

दिवाळीच्या विश्रांतीनंतर परत एकदा मराठवाड्यात मराठा क्रांती मोर्चाची भगवी लाट आज पहायला मिळाली. यावेळी मोर्चाचे ठिकाण होते औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण.
कोपर्डी बलात्कार घटनेतील आरोपींना फाशी यासह मराठा आरक्षण, अट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापराला आळा, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव, इत्यादि. वेगवेगळ्या मागण्यांचे फलक घेऊन साधारण अडीच ते तीन लाख मराठा समाजबांधव या मोर्चात सहभागी झाले होते. महिला व मुलींची संख्या लक्षणीय होती. तालुक्याच्या ठिकाणीही इतक्या मोठ्या संख्येने लोक एकत्र येतात यावरुन कडाक्याच्या थंडीच्या मोसमातही मराठा क्रांती मोर्चाची धग अजिबात कमी झाली नसल्याचे दिसुन येते.
maratha-kranti-morcha-paithan-2
मराठा क्रांती मोर्चा पैठण ड्रोन फोटो
मोर्चासाठी कावसानकर स्टेडियम या ठिकाणी सकाळपासुन लोक जमा होत होते. सकाळी ११ वाजता मोर्चास प्रारंभ झाला. मोर्चाच्या पहिल्या फळीत महिला व मुली होत्या. मध्यभागी युवक,पुरुष व शेवटी स्वछता करणारे मराठासेवक होते. मोर्चा छत्रपती शिवाजी चौकात आल्यानंतर मुलींनी मोर्चाच्या मागण्यांच्या निवेदनाचे वाचन केले. यावेळी मुलींनी उत्स्फुर्तपणे मनोगते व्यक्त केली. राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता झाली. आतापर्यंतच्या मोर्चात पहायला मिळालेली शिस्त, शांतता आणि स्वच्छता याही मोर्चात पहायला मिळाली.
मराठा क्रांती मोर्चा पैठण जमलेला प्रचंड जनसागर
मराठा क्रांती मोर्चा पैठण जमलेला प्रचंड जनसागर
मराठा क्रांती मोर्चा पैठण जमलेला प्रचंड जनसागर
मराठा क्रांती मोर्चा पैठण जमलेला प्रचंड जनसागर
मराठा क्रांती मोर्चा पैठण जमलेला प्रचंड जनसागर
मराठा क्रांती मोर्चा पैठण जमलेला प्रचंड जनसागर
maratha-kranti-morcha-paithan