पाचशे आणि हजारच्या नोटा बदलत आहेत . पाचशेची नोट नवीन रूपात
येणार व हजाराची नोट आपल्याला
Good Bye करणार ,या विषयावर
प्रा. विजय पोहनेरकर यांची त्यांच्या शैलीतली कविता .........
--------------------------------------------
" बुळकीची गोळी "
---------------------------------------------
Black & White Money ची
चर्चा खूप झाली
एका झटक्यात मोदींनी
" बुळकीची गोळी दिली "
दोन नोटा बंद करून
चांगलाच दिला फटका
मी मी म्हणणाऱ्यांना
जोरात बसला चटका
गाडी ने पटरी बदलली की
खडबडाट होतच असतो
थोडा काळ गेल्या नंतर
प्रवास सुखरूप होत असतो
सर्वांना हेच वाटत असतं
राजा Solid असला पाहिजे
चूक वागणाराच्या पाठी मधे
जोरात बुक्का घातला पाहिजे
पाचशेची नोट आता
नवीन मेकअप करणार
हजाराची नोट मात्र
अनंतात विलीन होणार
दहा , पन्नास , शभंर च्या
नोटा झाल्या खुष
पाचशे , हजार दोघींची ही
हवा गेली फुस्स्स्स
पाचशे अन हजारच्या नोटा
फार शहाणपणा करायच्या
दहाच्या अन पन्नासच्या नोटला
गरीब म्हणून हिणवायच्या
हजाराच्या नोटचा तर
फारच दिम्माख होता
लाल लाल काठाचा
शालुच नेसला होता
काठ पदर मोठा नेसून
नेहमी कडक दिसायची
वॉच पॉकेट मधे जाऊन
अलगद ऐटीत बसायची
बरं झालं सटवीची
हकालपट्टी केली
एका क्षणात वकट्टीची
किंमत शून्य झाली
काळा पैसा तयार होण्यात
" नोटा " नव्हत्या दोषी
आपलंच घर पोखरीत होत्या
मोठ्या मोठ्या घुशी
Tax नावाच्या राक्षसाचा
ब्रह्म राक्षस होऊने
व्यवसाय करणाऱ्याचा
बोकांडीवर बसूने
सरकारच्या हाता मधे
चाबूक जरूर असला पाहिजे
चुकणाराच्या पाठीवरती
सपकन " तो " बसला पाहिजे
नोटा जश्या बदलल्या तश्या
माणसांनीही बदलावं
Luxary कमी असली तरी
समाधानानं जगावं
भारत माझा देश आणि
सारे भारतीय बांधव
नोटा का बदलल्या म्हणून
करू नका तांडव
ऐतिहासिक घटना आहे
सर्वांनी साथ दिली पाहिजे
मातृभूमीच्या भल्यासाठी
स्वार्थी वृत्ती गेली पाहिजे
काही काळजी करू नका
सगळं चांगलं होणार आहे
विश्वास ठेवा नक्कीच आता
" अच्छे दिन " येणार आहे
No comments:
Post a Comment