Monday, 28 November 2016

बघा आयुष्य किती सुंदर आहे..............

वडिल दिवसभर काम करुन थकून भागुन रात्री ९.३०
ला घरी येतात.
त्यांची आतुरतेने वाट बघणारा ५ वर्षाचा मुलगा दार
उघडतो.

मुलगा: मी तुम्हाला एक प्रश्र्न विचारु का?

वडिल: हो

मुलगा: बाबा, तुम्ही तासाला किती पैसे मिळवता?

वडिल: तुला काय करायचय

मुलगा: प्लिज सांगाना

वडिल: रु.500 तासाला

मुलगा: बाबा मला २५० रु. उसने देता का?

वडिल रागाने मुलाला ओरडले व म्हणाले जा झोप जा.

मुलगा बेडरुम मध्ये गेला व दार लाऊन घेतले.

काही वेळाने वडिलांचा राग शांत झाल्यावर ते
मुलाच्या खोलीत गेले व रागावल्याबद्दल
मुलाला साँरी म्हणाले व त्यानी त्याला २५० रु. दिले व
म्हणाले हे तुला घे व काय ते कर.

मुलगा: थँक यु
त्यानंतर त्या मुलाने आपल्या मनी बाँक्स उघडला व
तो त्यातील पैसे मोजू लागला व नंतर
म्हणाला आता माझ्याकडे रु.५०० जमा झाले आहेत.

मला तुमचा एक तास विकत देता काय.
प्लीज उद्या एक तास लवकर याल काय?
मला तुमच्या बरोबर जेवायचे आहे.

बापाने मुलाला गहिवरुन कवेत घेतले.
पुढचे सारे तुम्ही इमँजीन करा.

तुम्ही सारे तरुण पैसे मिळवण्यासाठी फार कष्ट करता,

पण हे विसरु नका कि त्यांच्यासाठी सुध्दा थोडा वेळ
द्या जे तुमच्यावर जीव लावत आहेत, जिवाला जीव
देण्यास तयार आहेत.

जर उद्या आपण मेलो तर ज्या कंपनीसाठी आपण
मरेस्तोवर काम करतो ती कंपनी काही दिवसातच
आपल्या जागी दुस-याची नेमणूक सहजपणे करेल.
पण
जे कुटुंबीय व मित्र तुमच्यावर जिवापाड प्रेम करतात
त्याना मात्र तुमची उणीव कायमचीच वाटेल.    👍👍👍👍👍खरच फार छान विचार आहे. ...आपल्या कुटुंबासाठी वेळ दया मग बघा आयुष्य किती सुंदर आहे..............💐💐💐💐

   🙏🙏🙏 सुप्रभात 🙏🙏🙏

-------------------------------------------- " बुळकीची गोळी "

पाचशे आणि हजारच्या नोटा बदलत आहेत . पाचशेची नोट नवीन रूपात
येणार व हजाराची नोट आपल्याला
Good Bye करणार ,या विषयावर
प्रा. विजय पोहनेरकर यांची त्यांच्या  शैलीतली कविता .........
--------------------------------------------
" बुळकीची गोळी "
---------------------------------------------

Black  &  White Money ची
चर्चा खूप झाली
एका झटक्यात मोदींनी
" बुळकीची गोळी दिली "

दोन नोटा बंद करून
चांगलाच  दिला फटका
मी मी म्हणणाऱ्यांना
जोरात बसला चटका

गाडी ने पटरी बदलली की
खडबडाट होतच असतो
थोडा काळ गेल्या नंतर
प्रवास सुखरूप होत असतो

सर्वांना हेच वाटत असतं
राजा Solid असला पाहिजे
चूक वागणाराच्या पाठी मधे
जोरात बुक्का घातला पाहिजे

पाचशेची नोट आता
नवीन मेकअप करणार
हजाराची नोट मात्र
अनंतात विलीन होणार

दहा , पन्नास , शभंर च्या
नोटा झाल्या खुष
पाचशे , हजार दोघींची ही
हवा गेली फुस्स्स्स

पाचशे अन हजारच्या नोटा
फार शहाणपणा करायच्या
दहाच्या अन पन्नासच्या नोटला
गरीब म्हणून हिणवायच्या

हजाराच्या नोटचा तर
फारच दिम्माख होता
लाल लाल काठाचा
शालुच नेसला होता

काठ पदर मोठा नेसून
नेहमी कडक दिसायची
वॉच पॉकेट मधे जाऊन
अलगद ऐटीत बसायची

बरं झालं सटवीची
हकालपट्टी केली
एका क्षणात वकट्टीची
किंमत शून्य  झाली

काळा पैसा तयार होण्यात
" नोटा " नव्हत्या दोषी
आपलंच घर पोखरीत होत्या
मोठ्या मोठ्या घुशी

Tax नावाच्या राक्षसाचा
ब्रह्म राक्षस होऊने
व्यवसाय करणाऱ्याचा
बोकांडीवर बसूने

सरकारच्या हाता मधे
चाबूक जरूर असला पाहिजे
चुकणाराच्या पाठीवरती
सपकन " तो " बसला पाहिजे

नोटा जश्या बदलल्या तश्या
माणसांनीही बदलावं
Luxary कमी असली तरी
समाधानानं जगावं

भारत माझा देश आणि
सारे भारतीय बांधव
नोटा का बदलल्या म्हणून
करू नका तांडव

ऐतिहासिक घटना आहे
सर्वांनी साथ दिली पाहिजे
मातृभूमीच्या भल्यासाठी
स्वार्थी वृत्ती गेली पाहिजे

काही काळजी करू नका
सगळं चांगलं होणार आहे
विश्वास ठेवा नक्कीच आता
" अच्छे दिन " येणार आहे

*मैत्री तुटायला कधी सुरुवात होते..??*

*मैत्री तुटायला कधी सुरुवात होते..??*

1) आपण मैत्री मध्ये व्यवहार आणतो तेव्हा..

2) मैत्रीमध्ये आपण खूप अपेक्षा ठेवायला सुरुवात करतो तेव्हा..

3) आपण मित्राला गृहीत धरायला सुरुवात करतो तेव्हा..

4) मैत्रीमध्ये आपणच कसे प्रामाणिक आहोत.. हे समोरच्याला सांगायला लागतो तेव्हा..

5) मित्र असे का वागला हे त्याला न विचारता.. आपणच मित्राच्या तसे वागण्यामागची कारणे शोधायला सुरुवात करतो तेव्हा..

6) आपण कसेही वागलो तरी मित्र आपल्याला समजून घेईल.. असे जेव्हा आपण समजायला लागतो तेव्हा..

7) मित्राने गमतीने बोललेल्या शब्दांचा अर्थ.. आपण आपल्या पद्धतीने घ्यायला सुरुवात करतो तेव्हा..

8) भांडण झाल्यावर पहिला फोन मित्रानेच केला पाहिजे.. असे आपण ठरवतो तेव्हा..

9) मित्र श्रीमंत झाल्यावर.. आपणच आपल्याला त्याच्या समोर गरीब समजायला लागतो तेव्हा

10) आपला मित्र आता बदलत चालला आहे.. अशी आपली धारणा व्हायला लागते तेव्हा..

11) मित्र बिझी असेल.. त्यालाही त्याच्या अडचणी असतील.. हे आपण विसरायला लागतो तेव्हा..

12) आपल्या मित्राची आपण चार चौघात टर उडवायला सुरुवात करतो तेव्हा..

13) आपण जसा विचार करतो.. तशाच विचाराने मित्राने वागले पाहिजे.. असा दुराग्रह बनतो तेव्हा..

14) आपली चूक असतानाही मित्राने आपलीच बाजू कशी बरोबर आहे.. हे लोकांना सांगायला हवे.. अशी बावळट अपेक्षा आपण करायला लागतो तेव्हा..

15) खिशात पैसे असूनही जेवणाचे बिल भरताना आपला हात आपल्या पाकीटाकडे जात नाही तेव्हा..

16) कुठलातरी निकष लावत आपण आपल्या मित्राची इतरांबरोबर तुलना करायला लागतो तेव्हा..

17) आपले मित्रांशिवाय काही अडत नाही.. हे आपण नकळतमित्राला दर्शवायला लागतो तेव्हा..

18) आपल्या भल्यासाठी मित्राने सांगितलेल्या गोष्टी आपल्याला पकाऊ लेक्चर वाटायला लागते तेव्हा..

19) मित्र online दिसतोय पण आपल्या message ला reply देत नाही.. याचा अर्थ तो आपल्याला ignore करतोय.. असला सडका विचार आपल्या मनात येतो तेव्हा..खरं तर कुठलीही मैत्री कधी तुटत नसते.. तर त्या मैत्रीमधील मित्र एकमेकांपासून तुटत असतात..

असे असेल.. तसे झाले असेल.. असे काल्पनिक विचार करीत आपण मैत्रीत संशयाचे वादळ निर्माण करीत असतो.. मित्र एकमेकांपासून तुटले तरी त्यांच्यातील मैत्री दोघांच्याही मनात जिवंत असते.. पण कुठेतरी गैरसमज, अहंकार असल्या फालतू गोष्टीमुळे ती मैत्री मनातल्या मनात दडपून जाते..

*चांगली मैत्री बनायला अनेक काळ जावा लागतो.. पण मैत्रीमधील धागे तुटायला एका क्षणाचाही वेळ लागत नाही..तेव्हा मित्रांनो..!!तुमच्या मित्राकडून एखादी चूक झाली असेल तर त्यालामाफ करा.. आणि तुमच्याकडून कुठली चूक घडली असेल तर मित्राची क्षमा मागायला लाजू नका..!*

"गरीबीमुळे स्वाभिमान गहान टाकू नका."

डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,
"मी माझ्या आयुष्याची ५५ वर्षे जर
सरकारी नोकरीत असतो, तर मला आता सेवानिवृत्ती होणे भागच पडले असते .परंतु मी माझ्या आयुष्यातील एकमेव धेय्याखातीर बड्या पगाराच्या नोक-या नाकारल्या आहेत .
हे सांगत असतांना पुढे बाबासाहेब म्हणाले,
"इकॉनाॅमिक्स विषयातील परदेशातील पदवी घेऊन भारतात परतलेला मी केवळ
अनुसूचित जातीमधुनच नव्हे, तर
संपूर्ण भारतातून पहिला होतो.
मुंबईत पाय टेकताच मुंबई सरकारने
मला राजकीय अर्थशास्त्राचे
प्राध्यापकपद
स्वीकारण्याची विंनती केली. मी जर
ती मान्य केली असती तर आज मला लठ्ठ
पगार मिळाला असता. पण मी ती नाकारली. कारण सरकारी नोकर
व्हायचे म्हणजे
आपल्या लोकांच्या उन्नतीसाठी काम
करायच्या तुमच्या इच्छेवर
स्वाभाविकच मर्यादा पडतात.
त्यानंतर पुन्हा मी पुढील शिक्षण
घेण्यासाठी इंग्लंडला गेलो. तेथून पात्रता संपादन करून आल्यावर पुन्हा मला जिल्हा न्यायाधीशाचे
पद देऊ करण्यात आले. तीन वर्षात
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर नेमण्याचे आश्वासनही त्यासोबत दिलेले होते.
त्यावेळी मला धड शंभर रुपये हि मिळत
नव्हते. अत्यंत गरीब
लोकांसाठी बांधलेल्या चाळीतील एका खोलीत मी तेव्हा राहत होतो. तरीही मी तो देकार नाकारला. जर
मी ती नोकरी केली असती, तर
सुखवस्तूपणाची हमी मिळाली असती. पण
माझ्या सहबांधवांच्या कल्याणाचे व उन्नतीचे प्रयत्न करण्याचे
माझ्या आयुष्याचे ध्येय सफल
करण्याच्या मार्गात त्या नोकरीमुळे
अडथळे उत्पन्न झाले असते. या एकाच
करणाने मी नकार दिला.
१९४२ साली पुन्हा माझ्यासमोर एक
पर्याय आला होता. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी माझी नियुक्ती होऊ
घातली होती. ती झाली असती तर मी आर्थिकदृष्ट्या तर श्रीमंत झालोच असतो, शिवाय दहा वर्षानंतरच्या सेवेनंतर
मी सुखाची जिंदगी जगली असती. पण
"माझ्या लहानपणापासून
जेव्हा मला आयुष्याचा अर्थ समजू लागला, तेव्हापासून मी जीवनाचे एक तत्व सतत अनुसरत आलो. ते म्हणजे माझ्या समाज बांधवांची सेवा करण्याचे. एव्हढे
लक्ष मी कधीच दुस-या प्रश्नाकडे दिले नाही. अस्पृश्यांचे हितसंबंध मला सुरक्षित केलेच पाहिजेत. माझ्या आजवरच्या आयुष्याचे तेच
ध्येय होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जेंव्हा माझा मुलगा यशवंतचा मृत्यु झाला होता, तेंव्हा कांही लोक माझ्याकडे येऊन यशवंतसाठी 'कफन' आणायला पैसे मागायला आले होते. पण माझ्याकडे स्वतःच्या मुलाला कफन विकत आणण्यापूरते सुध्दा पैसे नव्हते. शेवटी माझी पत्नी, रमाबाईने, आपल्या स्वतः च्या अंगावरील साडीचा एक पदर फाडून दिला आणि मग आम्ही यशवंतला त्यामध्ये गुंडाळून स्मशानात घेऊन गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, या मी जेवढी गरीबी अनुभवली आहे, तेवढी गरीबी कदाचित भारतातील एकाही नेत्याने आनुभवली नसेल.मी गरीब असूनही कधी गरीबीचे कारण सांगून माझा स्वाभिमान व माझे आंदोलन कधीच कमी पडू दिले नाही. एवढी गरीबी असूनही मी पैशासाठी विकलो गेलो नाही आणि यापुढील आयुष्याचेही तेच ध्येय राहणार आहे आणि हेच ध्येय प्रत्येकाने आपल्या डोळ्यासमोर ठेवून
आपल्या प्रत्येक रक्ताच्या माणसांसाठी काम करीतच रहावे. प्रत्येकाने आपल्या समोर एक धेय बनवा आणि आपल्या बांधवाना एकत्रीत करा. कारण तुम्ही एकत्र आल्याशीवाय तुम्ही कोणालाही लढा देऊ शकत नाहीत. कारण एकीचे बळ हे कोणीही जगात मोडू शकत नाही. म्हणून खूप शिका, संघटीत व्हा, आणि संघर्ष करा.
"गरीबीमुळे स्वाभिमान गहान टाकू नका."

_🏦बँकेबाहेरच्या_पुणेरी_📃पाट्या

आत्ताच्या_🏦बँकेबाहेरच्या_पुणेरी_📃पाट्या
टेन्शनच्या आणि धावपळीच्या वातावरणात #पुणेरी_टोमणे कडून थोडा गमतीने दिलासा देण्याचा प्रयत्न. एन्जॉय!
1. हि कोणाच्याही तिर्थरूपांची बँक नसून सर्वांनी लायनीत उभे राहून आत येणे
2. "तुला माईत्ये का मी कोने?" म्हणणाऱ्यांना नोटा बदलून मिळणार नाहीत.
3. दादागिरी करणार्यांना जुन्या 500 च्या नोटा दिल्या जातील.
4. फॉर्म नीट भरा, दादा, तात्या, अण्णा, यांना आम्ही ओळखत नाही, कारण आम्ही आत्ता बाप आहोत.
5. अरेरावी करू नये, कोणीही तुमच्या मदतीला येणार नाहीत कारण जुना नोटा कामाच्या नाहीत.
6. उगाच पाणी वाटप वगैरे कार्य करुन मते ओढण्याचा प्रयत्न करू नये, आणि गर्दी वाढवू नये,आम्ही पाण्याने भरलेला माठ आणि पेला ठेवला आहे. लोकं आपापली घेतील.
7. विनाकारण कोणी केमेरे चालू करून लोकांना तुमचे काय मते? काय वाटतंय नोटा बंद झाल्यावर वगैरे लोकांचे इंटेर्विव्यु घेत बसू नये, सरकार ने फायनल निर्णय घेतलाय, आता कोणी काही हि बदलू शकत नाही... #नोटांशीवाय
8. घाई करू नये, हि बँक आहे लोकल ट्रेन नाही.
9. कॅशिअर सोबत फालतू वाद घातल्यास केशिअर ला झोपायला सेपरेट बेड ची सोय आहे, विचार करून बोला.
10. आम्ही तुमचे सेवक आहोत, नोकर नाही.
11. हे पुणे आहे, सभ्य भाषेत अपमान करायची इंडायरेक्ट पद्धत आहे.
12. नोट हि लक्ष्मी आहे, त्यामुळे तिच्यासोबत इथे सेल्फी काढत बसू नये...
13. थोडा उशीर होत असलेतरी भाईगिरी न करता लायनीतच थांबावे, इथे आजूबाजूला पोलीस आहेत, आणि तुमच्याकडे 500-1000 व्यतिरिक्त दुसऱ्या नोटा नाहीत.
14. गर्दी असल्याने वेळ लागणारच, तरी कृपया सारखं पिचिक पिचिक आवाज काढू नये... घरी पैसे साठवायला आम्ही सांगितलं न्हवते.
15. हा परीक्षा हॉल नाही, तरी, इतरांचा फॉर्म पाहून भरू नये.
16. अजून किती वेळ लागेल वगैरे फाजील प्रश्न विचारू नये,
कारण त्याचे उत्तर आम्हालाही माहित नाही.
17. इथे गाडी पार्क केली तर चालेल का वगैरे पांचट प्रश्न विचारू नये.
18. ATM चालू आहे का हे पाहण्यासाठी ATM च्या बाहेर लाईन आहे का ते पाहावे.
19. सरकार कडून मिळालेलेच फोटो भिंतीवर लावले आहेत, तरी आमच्या यांचा फोटो नाहीये वगैरे वाद घालू नये.
20. "शी बाबा" म्हणून उकडणे थांबत नाही, तुमच्या इतकंच आम्हालाही उकडते आहे, आणि आहेत तेवढे सगळे फॅन्स चालू ठेवलेत.
21. आमच्याकडे ज्या नोटा अव्हेलेबाल आहेत त्याच आम्ही देऊ शकतो, आमचा स्वतःचा नोट छापायचा कारखाना नाही.
22. सर्वांच्या नोटा दिसायला सारख्याच आहेत, त्यामुळे विनाकारण, तुझी बघू... तुझी बघू करत वेळकाढू पणा करून गर्दी वाढवू नये.
23. आपली संस्कृती आणि आई वडिलांची शिकवण हि आपण गर्दीत वयस्कर लोकांशी कसे बोलतो यवरूनही समजून येते.
24. उगाच मोठ्या मोठ्या राजकर्त्यांनी बँकेत येऊन लोकांना कित्ती कित्ती त्रास होतोय याची चाचणी करत बसू नये, मोठा निर्णय आहे, थोडा त्रास तर होणारच.
25. "अत्तापर्यंत किती काळे पैसे बँकेत जमा झाले ओ???"
हा प्रश्न विचारू नये. कारण आम्ही एकही काळ्या रंगांची नोट घेत नाही.
26. "काका जरा पटापट करा ना" म्हणून आम्हाला सल्ला देऊ नये, आम्ही माणूस आहोत आणि मशीन नाही.
27. 1000 च्या नोटा बंद करून 2000 ची नोट का? असले फाजील प्रश्न आम्हाला विचारू नये. त्यासाठी रात्री कुठलाही न्यूज चॅनल लावून भांडणे पहात बसावे.
28. दारावर उभ्या असणाऱ्या शिपायाशी भांडू नये, त्याच्याकडे भरलेली बंदूक आहे.
29. घुसखोरी केलेल्या बांग्लादेशवासीयांनी आता आमचे काय होणार वगैरे प्रश्न विचारून आमचा वेळ वाया घालवू नये, घुसायाच्या आधी आम्हाला विचारले होते का?
30. आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत, निशिंत रहावे
31. किती हि गर्दी असेल तरी ही दुपारी 1 ते 4 बँक बंद राहणार नाहीत, काळजी नसावी...🙏

*" आयुष्य खुप सुंदर आहे "*

एक ब्राह्मण दुपारी भिक्षा मागण्याकरीता एका दारात उभा राहीला , ''ॐभवती भिक्षांदेहि " अशी गर्जना केली.

घरात एकटीच म्हातारी होती, ती म्हणाली, "महाराज ! मी एकटीच आहे, घरात आमटी भात तयार आहे, चार घरात भिक्षा मागण्या पेक्षा आज इथेच जेवा."

ब्राह्मण "हो" म्हणाला

ब्राम्हणाचे पोटभर जेवण झाले ब्राम्हणाने ताक मागीतले.

*भोजनांते तक्रं पिबेत* अस म्हणतात.

नेमकं म्हातारीच्या घरात त्या दिवशी ताक नव्हते.

ती म्हणाली, "थांबा महाराज मी आत्ता शेजारणी कडून ताक घेवुन येते."

तिने शेजारणीला ताक मागीतले , शेजारणीने भांडभर ताक दिले,

आजीने ब्राम्हणाच्या भातावर ताक घातले , ब्राम्हणाने भुरका मारला तो शेवटचाच.
ब्राह्मण तडकाफडकी मेला.

चित्रगुप्त आणि यमधर्माला प्रश्न पडला की, या कर्माचा भागीदार कोण?

कारण ब्राम्हणाने आत्महत्या केली नव्हती.

म्हातारीने अतिथीधर्म पाळला होता तिने ब्राम्हणाला मारले नव्हते,दारात आलेल्या अतिथ्याला पोटभर जेवण दिले होते.

शेजारणीने शेजारधर्म पाळला होता कोणी दारात मागायला आले तर नाही म्हणू नये म्हणून तिने ताक दिले होते. आणि ताक पिवुन ब्राह्मण मेला होता कारण त्या ताकात विष होते आणि हे विष एका नागाच्या तोंडातून ताकात पडले होते.

यमधर्माने नागाला जाब विचारला, नाग म्हणाला यात माझा काय दोष ? घार मला पकडून आकाशमार्गे चालली होती,माझे तोंड खाली झाले होते त्यामुळे माझ्या तोंडातील गरळ त्या ताकात पडली म्हणून ब्राह्मण मेला.

यमाने घारीला जाब विचारला , घार म्हणाली यात माझा काय दोष ? सापाला पकडून खाणं हा माझा धर्म आहे.

प्रत्येकाने आपला धर्म पाळला होता मग आता कर्माचा भागीदार कोण ? कोणाच्या माथी मारायचे हे कर्म ?

चित्रगुप्त यमाला म्हणाला, "चला माझ्याबरोबर या कर्माचे भागीदार मी तुम्हाला दाखवतो."

दोघेही गुप्तरूपाने ब्राम्हण मरून पडला होता तिथे आले.

हा!हा! म्हणता संपूर्ण गावात बातमी पसरली की, म्हातारीच्या घरी ब्राह्मण जेवता जेवता मेला.

हळुहळु आळीतल्या बायका तिथं जमल्या.

शांताबाई उज्वला ताईना म्हणाल्या, "काय हो उज्वलाताई ब्राम्हण कसा मेला कळले का हो ?"

उज्वलाताई म्हणाल्या, "नाही हो"

तेंव्हा शांताबाई म्हणाल्या, "आहो कसं सांगु s s s तुम्हाला , या ब्राम्हणाकडे भरपूर द्रव्य होते , म्हातारीने भोजनात विष घालून त्याला ठार मारले व त्याचे द्रव्य हडप केले."

चित्रगुप्त यमाला म्हणाला पहिल्या क्रमांकावर हिचे नाव लिहा.

आणि तिथे जे जे या घटनेबद्दल बोलत होते त्यांची नावे रजिस्टर मधे लिहुन त्यांच्या माथी मारले गेले.

थोडक्यात कर्माचा इतका सूक्ष्म विचार केला आहे. एखाद्या घटने बद्दल सत्य माहीत नसताना बोलणे हे सुद्धा पाप आहे.

म्हणून आजचा सुबोध दिला आहे.
प्रत्येकाच्या कानात आणि डोळ्यात देवाने चार बोटाचे अंतर ठेवले आहे.

त्याचे कारण *जोपर्यंत एखादी घटना तुम्ही प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी पाहत नाही तो पर्यंत कोणाच्या तरी तोंडून निघालेली बातमी कानाने ऐकून तुमच्या तोंडाने बोलू नका हे सुद्धा एक प्रकारचे पापच आहे.*
*माणसाचे " मी "बरेच नुकसान करतो*
*मी* का बोलू ?
*मी* का फोन करू ?
*मी* का कमीपणा घेऊ ?
*मी* का नमते घेऊ ?
*मी* का नेहमी समजून घ्यायचं ?
*मी* काय कमी आहे का ?
असे बरेच सारे *"मी"* आहेत
जे आयुष्यात विष कालवतात.
*म्हणून मी पणा सोडा व नाती जोडा.*
=============================
*" आयुष्य खुप सुंदर आहे "*

टी वी चॅनेल च्या बातम्यांच मोदी नोटा बदल विषयीचं विश्लेषण

टी वी चॅनेल च्या बातम्यांच मोदी नोटा बदल विषयीचं विश्लेषण ऐकल्यावर लक्षात येत की

1)  ( चॅनेल व पेपर)आणी india tvसारखे  फक्त नकारात्मक बातम्या दाखवत आहेत.
प्रत्येक वेळा Atm च्या बाहेरील लाईना दाखवून नकारात्मक बाजू वातावरण तयार करता आहेत .फायदा सकारात्मक बदल का दाखवत नाहीत

2)Z tvग्रुप सकारात्मक बाजू दाखवत आहेत🙏🙏

3)सृजनात्मक बदल अचानक घडत नाहीत .देश बदलतो आहे कृपया विरोध करू नका

4)सैनिक दिवस राञ सिमेवर तैनात असतो.24 तास बंदूक घेऊन तो उभा असतो. आपण Atmच्या लाईनीत उभे राहू शकत नाही😞जिथे आपल्याला पैसे मिळणार आहेत.

5)मोदी विरोधात तेच लोक बोंबलता आहेत ज्यांनी करोडोची मालमत्ता दाबून ठेवलेली आहे.आणी त्यांची घराणेशाही नष्ट होणार आहे.सामान्यांच्या लाईनमध्ये ते येणार या भितीने ते वेडेपिसे कावरलेले होताय.

6)मिञांनो भारत पाकीस्तान मॅच असली तेव्हाच आपली देशभक्ती जागृत होते का?नुसते गाड्यांना झेंडे बांधून हिंडण्याने देशासाठी आपण काय करणार आहे.

7)समजा भारत पाक युध्द झाले आणिबाणी लागली तेव्हा तापासाठी पॅरासिटेमोल पण मिळणार नाही.काय सहण करणार तेव्हा?साधा हफ्ताभर पैशाच्या लाईनित उभे राहू शकत नाही आपली केवढी शोकांतीका ही.

8)आपल्याला मनात माहित आहे साधारण 8/10 दिवसात परिस्थिती पूर्वपदावर येणार आहेच.साधारण माणसाचा रोजचा खर्च 2000 रू आहे का?हफ्ताभराचा भाजिपाला येणार नाही का यात .हफ्ताभर चिकण नाही खाल्ल तर मरणार आहात का तुम्ही.?आठवड्याला 10000 मिळणार आहेत. महिण्याला
10000×4=40000रू एवढा पगार तरी आहे का राव सर्वसामान्याला?

9)विरोध करणार्यांचे करोडोचे पैसे डूबणार आहेत म्हणूण दु:खाचा  डोंगर ऊभा केला आहे यांनी.आपण सर्वसामान्य .का पाठींबा देता या चोरांना?

10) मोदीला त्याच्या मागे कोणताच परिवार पोसायचा नाही आहे.हा प्रामाणीकपणा आपण जाणू शकत नाही का?

11)हीच वेळ आहे .
मोदींना सहकार्य करा .देशसेवेत योगदाण द्या.कदाचित आपल्या पिढीला एक नविन ह्काचा रस्ता तयार करा,मिळवून द्या.

12)नकारात्मक वरील       व india tv सारखी चॅनेल बंद करा.देशसेवेसाठी विरोध पत्करणार्या Z tvग्रुप ला सपोर्ट करा.
मोदिला चान्स दिलाच आहे तर पूर्ण द्या.नुसत्या झाडाच्या फांद्या कापूण उपयोग नाही भारतरूपी वृक्षाला आतुन लागलेली वाळवी दुर करण्यासाठी मोदींना सहकार्य करा.

13)या बदलांचे सकारात्मक परिणाम आत्ताच दिसत आहेत .मोदींच्या या निर्णयाने पाकीस्तान ची अर्थव्यवस्था कोडमडली आहे.दाऊद सारखे थंडेगार पडले आहेत.चिन मध्ये मंदी वाढली आहे.

14) नोटा बदलल्याने बाहेरदेशातील काळा पैसा टोटल काळा झाला आहे

15) बॅकामध्ये आत्ताच इतका पैसा जमा झालाय ,जितका ऑस्ट्रलियाचा वार्षिक टर्न ओव्हर आहे👍

16) बॅकातील या बचतींमुळे व व्यवहारांमुळे बॅका 3%दराने कर्जपुरवठा करू शकतील.घरांचे स्वप्न, मुलांचे शिक्षणाचे प्रश्न सुटणार आहेत.मग विरोध का?