Monday, 6 March 2017

सूर्यनमस्कार

सूर्यनमस्काराची निर्मिती

रथसप्तमीबरोबर सूर्यनमस्काराचे महत्त्व कसे जोडले गेले आहे, तसेच सूर्योपासना आणि सूर्यनमस्काराच्या निर्मितीपासूनचे महत्त्व अभ्यासण्यासाठी केलेला हा लेखनप्रपंच-   

सूर्यनमस्काराची निर्मिती

माणसाने परमेश्वराला प्रथम पाहिले ते सूर्याच्या रूपात. माणसांत आणि एकंदर सजीव सृष्टीत जे चैतन्य आहे ते सूर्यापासून आले आहे असे  मानले जाते. परंतु या चैतन्यातून एकापेक्षा एक असे पराक्रम साकार करायचे असतील, तर सूर्योपासनेचे विशिष्ट असे शास्त्र तयार करायला हवे असे भारतातील ऋषींना वाटले. आणि त्यांनी केलेल्या चिंतनातून सूर्यनमस्कार जन्माला आले. यामुळे सूर्योपासना आणि सूर्यनमस्काराचे भारतीय संस्कृतीतील महत्त्व अनन्यसाधारण आहे.

प्राचीन सूर्यमंदिरे व सूर्योपासना यांचे महत्त्व

सूर्याला देवता मानले जाते. सूर्यनमस्काराबरोबरच सूर्यनमस्काराची उपासना गायत्री स्वरूपात किंवा सूर्यस्तुती, अशा कोणत्याही स्वरूपात सूर्योपासना केल्यास एकाग्रता साध्य होते. तसेच बुद्धी, स्मृती तीक्ष्ण होतात. शिवाय आकलनशक्तीही सुधारते.

      भारतात सूर्यमंदिरे फारच थोडी आहेत. सौराष्ट्रातील वेरावळ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, नेपाळ, कोणार्क इ. ठिकाणी सूर्यमंदिरे आहेत. आपल्या महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यात कशेळी या गावी शेकडो वर्षांपासून असलेले हे सूर्यमंदिर मुख्य मार्गाकडून केवळ तीन ते चार किमीवर हे नितांत सुंदर देवस्थान वसलेले आहे.

       उगवत्या व मावळत्या् सूर्याला दंडवत घालणे हे सूर्यनमस्काराचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

सूर्यनमस्काराचे ऐतिहासिक महत्त्व

सूर्यनमस्कारात वापरल्या जाणा-या  आसनांचा ऐतिहासिक ग्रंथात उल्लेख आढळतो. शिवाजी महाराज व समर्थ रामदास सूर्यनमस्काराचा वापर शरीरसौष्ठवासाठी करत असत.

सूर्यनमस्कार करताना म्हटले जाणारे मंत्र व त्यांचे महत्त्व

प्रत्येक सूर्यनमस्काराची सुरुवात करताना मंत्र म्हटले जातात. त्या प्रत्येक मंत्राचा संबंध शरीरातील चक्राशी आहे. –

  क्र.           मंत्र             आसन

१.     मित्राय नमः        अनाहत चक्र

२.     रवये नमः         विशुद्ध चक्र

३.     सूर्याय नमः       स्वाधिष्ठान चक्र

४.     भानवे नमः       आज्ञा चक्र

५.     खगाय नमः       विशुद्ध चक्र

६.     पुष्णे नमः        मणिपूर चक्र

७.     हिरण्यगर्भाय नमः   स्वाधिष्ठान चक्र

८.     मरीचये न मः      विशुद्ध चक्र

९.     आदित्याय नमः    आज्ञा चक्र

१०.     सवित्राय नमः      स्वाधिष्ठान चक्र

११.     अर्काय नमः       विशुद्ध चक्र

१२.     भास्कराय नमः    अनाहत चक्र

सूर्यनमस्कार करताना सूर्याचीच नावे का म्हणावी ?

   सूर्याला चराचर सृष्टीचा आत्मा मानले जाते. सकाळची सूर्यकिरणे अंगावर घेत प्रणवासहित त्याचे नामोच्चरण, दर्शन व सूर्यनमस्कार घालणे म्हणजे एकाचवेळी शारीरिक, मानसिक वा आध्यात्मिक शक्तिंचा विकास साधणे होय. सूर्यावाचून काहीच व्यवहार चालत नाही. मग अंधांना सूर्याचे दर्शन कसे घडावे? एवढे सूर्याला महत्त्व आहे.

सूर्यनमस्कारामुळे होणारे लाभ

सूर्यनमस्कारात आरोग्य, दीर्घायुष्य, कार्यक्षमता हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवायचे असते. या आसनामुळे आयुष्य, बल आणि बुद्धिचा विकास होतो. मस्तक, मान, हात, पाय, छाती, पोट, कंबरेचे स्नायू, मेरूदंड, पायाची बोटे, गुढगे, सर्व सांधे यांना व्यायाम घडतो. तसेच पोटाचे जडत्व, अनावश्यक वाढलेला मेद, ओटीपोटातील चरबी, थायरॉईडसारखे विकार, लहान मुलांचे फिरलेले हातपाय व काही हाडांचे दोष, गंडमाळा, घशातील विकार नाहिेसे होतात. क्षयापासून संरक्षण मिळते, मनोबलाचा विकास होतो. शरीरात शुद्ध रक्ताचा सारख्या प्रमाणात संचार होतो.

सूर्यनमस्कार

सूर्यनमस्काराची निर्मिती

रथसप्तमीबरोबर सूर्यनमस्काराचे महत्त्व कसे जोडले गेले आहे, तसेच सूर्योपासना आणि सूर्यनमस्काराच्या निर्मितीपासूनचे महत्त्व अभ्यासण्यासाठी केलेला हा लेखनप्रपंच-   

सूर्यनमस्काराची निर्मिती

माणसाने परमेश्वराला प्रथम पाहिले ते सूर्याच्या रूपात. माणसांत आणि एकंदर सजीव सृष्टीत जे चैतन्य आहे ते सूर्यापासून आले आहे असे  मानले जाते. परंतु या चैतन्यातून एकापेक्षा एक असे पराक्रम साकार करायचे असतील, तर सूर्योपासनेचे विशिष्ट असे शास्त्र तयार करायला हवे असे भारतातील ऋषींना वाटले. आणि त्यांनी केलेल्या चिंतनातून सूर्यनमस्कार जन्माला आले. यामुळे सूर्योपासना आणि सूर्यनमस्काराचे भारतीय संस्कृतीतील महत्त्व अनन्यसाधारण आहे.

प्राचीन सूर्यमंदिरे व सूर्योपासना यांचे महत्त्व

सूर्याला देवता मानले जाते. सूर्यनमस्काराबरोबरच सूर्यनमस्काराची उपासना गायत्री स्वरूपात किंवा सूर्यस्तुती, अशा कोणत्याही स्वरूपात सूर्योपासना केल्यास एकाग्रता साध्य होते. तसेच बुद्धी, स्मृती तीक्ष्ण होतात. शिवाय आकलनशक्तीही सुधारते.

      भारतात सूर्यमंदिरे फारच थोडी आहेत. सौराष्ट्रातील वेरावळ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, नेपाळ, कोणार्क इ. ठिकाणी सूर्यमंदिरे आहेत. आपल्या महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यात कशेळी या गावी शेकडो वर्षांपासून असलेले हे सूर्यमंदिर मुख्य मार्गाकडून केवळ तीन ते चार किमीवर हे नितांत सुंदर देवस्थान वसलेले आहे.

       उगवत्या व मावळत्या् सूर्याला दंडवत घालणे हे सूर्यनमस्काराचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

सूर्यनमस्काराचे ऐतिहासिक महत्त्व

सूर्यनमस्कारात वापरल्या जाणा-या  आसनांचा ऐतिहासिक ग्रंथात उल्लेख आढळतो. शिवाजी महाराज व समर्थ रामदास सूर्यनमस्काराचा वापर शरीरसौष्ठवासाठी करत असत.

सूर्यनमस्कार करताना म्हटले जाणारे मंत्र व त्यांचे महत्त्व

प्रत्येक सूर्यनमस्काराची सुरुवात करताना मंत्र म्हटले जातात. त्या प्रत्येक मंत्राचा संबंध शरीरातील चक्राशी आहे. –

  क्र.           मंत्र             आसन

१.     मित्राय नमः        अनाहत चक्र

२.     रवये नमः         विशुद्ध चक्र

३.     सूर्याय नमः       स्वाधिष्ठान चक्र

४.     भानवे नमः       आज्ञा चक्र

५.     खगाय नमः       विशुद्ध चक्र

६.     पुष्णे नमः        मणिपूर चक्र

७.     हिरण्यगर्भाय नमः   स्वाधिष्ठान चक्र

८.     मरीचये न मः      विशुद्ध चक्र

९.     आदित्याय नमः    आज्ञा चक्र

१०.     सवित्राय नमः      स्वाधिष्ठान चक्र

११.     अर्काय नमः       विशुद्ध चक्र

१२.     भास्कराय नमः    अनाहत चक्र

सूर्यनमस्कार करताना सूर्याचीच नावे का म्हणावी ?

   सूर्याला चराचर सृष्टीचा आत्मा मानले जाते. सकाळची सूर्यकिरणे अंगावर घेत प्रणवासहित त्याचे नामोच्चरण, दर्शन व सूर्यनमस्कार घालणे म्हणजे एकाचवेळी शारीरिक, मानसिक वा आध्यात्मिक शक्तिंचा विकास साधणे होय. सूर्यावाचून काहीच व्यवहार चालत नाही. मग अंधांना सूर्याचे दर्शन कसे घडावे? एवढे सूर्याला महत्त्व आहे.

सूर्यनमस्कारामुळे होणारे लाभ

सूर्यनमस्कारात आरोग्य, दीर्घायुष्य, कार्यक्षमता हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवायचे असते. या आसनामुळे आयुष्य, बल आणि बुद्धिचा विकास होतो. मस्तक, मान, हात, पाय, छाती, पोट, कंबरेचे स्नायू, मेरूदंड, पायाची बोटे, गुढगे, सर्व सांधे यांना व्यायाम घडतो. तसेच पोटाचे जडत्व, अनावश्यक वाढलेला मेद, ओटीपोटातील चरबी, थायरॉईडसारखे विकार, लहान मुलांचे फिरलेले हातपाय व काही हाडांचे दोष, गंडमाळा, घशातील विकार नाहिेसे होतात. क्षयापासून संरक्षण मिळते, मनोबलाचा विकास होतो. शरीरात शुद्ध रक्ताचा सारख्या प्रमाणात संचार होतो.

Tuesday, 7 February 2017

*स्वामी विवेकानंद म्हणतात:*
"माझा देश हा बिन डोक्याचा बाजार आहे, इथे चटणी कोरडी खातील, अन तेल दगडावर ओततील, नारळातील चवदार, पोषक जल गटारीत, अन नदीतील गटारजल पवित्र म्हणुन स्वतः पितील", चादरी दगडावर चढवतील अन माणसाला उघड ठेवतिल.. "परिवर्तनाच्या चळवळीत काम करायला भिणारी माणसे जिवंतपणी मेलेली असतात , तर चळवळीत काम करणारी माणसे मेल्यानंतर सुद्धा जिवंत राहतात".."लोकांच्या अंगात देवी, भुतंच का येतात शिवाजी महाराज, सम्राट अशोक, सावित्री बाई फुले, न्युटन आयझॅक, यांच्यासारखे विचारवंत का येत नाहीत? जेंव्हा विचारवंत अंगात येतील तेंव्हा भारत जगावर राज्य करेल"..

- *स्वामी विवेकानंद*

Monday, 2 January 2017

“बोलो पाटील…….और लढोगे?”

“बोलो पाटील…….और लढोगे?”

हे ऐकताच दत्ताजींनी सर्व ताकत एकवटत वाघासारखी डरकाळी फोडली…..

“क्यों नही? बचेंगे तो और भी लडेंगे”

जय शिवराय मावळ्यांनो,

इतिहासाच्या काळोखात लुप्त झालेल्या आणि निधड्या छातीवर गानिमांचे वार झेलून आपल्या पिढीसाठी जे शूरवीर लढले अशा मावळ्यांसाठी, अशा विरांविषयी विषयी अजून बरेच लिखाण व्हायला हवे होते परंतु तेवढे नाही ही खंताचीच बाब ..

अशाच वीरांपैकी एक शूरवीर ज्यांनी त्यांच्या अतुलनीय साहसाने, पराक्रमाने कायम माझ्या मनात घर केलेले आहे असे मर्द मराठा वीर म्हणजे “शूरवीर दत्ताजी शिंदे”

“भीषण अन भयाण अशा काळ्या रात्रीत कुठतरी धूसर चांदण पडल्यामुळे गीलच्यांना फक्त एकमेकांची तोंड दिसत होती.. 

लांबच लांब अशा पडलेल्या खाश्या डेर्यापैकी एका शाही डेर्यातून कुजबुज सुरु होती, गुप्त मसलत घडत होती, मराठा साम्राज्यावर चालून आलेल्या त्या अब्दाली नामक राक्षसाला या शाही डेऱ्यात जो तो मस्का मारण्यामध्ये अजिबात कुचराई करत नव्हता..

आणि यामध्ये आघाडीवर होता तो नजीब, तसेच कुतुबशाह…. बऱ्याच चर्चेअंती नजीबाने अब्दालीला ताबडतोब मराठा छावण्यावरती हमला करण्यासाठी मनधरणी करून तयार केलेच..  त्याची हातभार खोटीखोटी प्रशंसा देखील केली..

मल्हारबाबा अजूनही दत्ताजी पर्यंत पोचलेच नव्हते, अन मल्हारबा येईपर्यंत निशाणाला धक्काही लागू द्यायचा नव्हता असा जणू दत्ताजी शिंद्यांनी प्रतिज्ञाच केली होती, पण या मराठा भूमीवर धडकलेल्या दुश्मनाला, या काळ्या सापाला, म्हणजे नजीबाला मात्र दत्ताजी तसेच शिंद्याच्या फौजेला गाठून त्यांचा खातमा करावयाचा मनसुबा होता..

चर्चा संपता संपता बादशाहने हुकुम सोडला कि “सुरज कि पहिली रोशनी के साथ अपनी एक फौज यमुना पार करेगी और उसे नजीब और कुतुबशहा संभालेंगे”

नजीबाच्या अंगाअंगात लाडू फुटू लागले.. झोप तर जवळजवळ डोळ्यातून उडूनच गेली होती.. कधी पहाट होते आणि कधी या मरगठ्यांच्या चिंधड्या चिंधड्या करतो अशी त्याची अवस्था झाली होती..

यमुनेच्या दुसऱ्या तीरावरती जानराव बावळे आपल्या चार हजाराच्या फौजेसह बुराडी घाटाचे रक्षण करत होता, पहाटेची वेळ आणि बोचरी थंडी अंगाला झोंबत होती.. समोरून येत असलेल्या महाभयानक संकटाची त्याला चाहूलही नव्हती..

यमुनेचे पाणीही थोडे आटल्याने बुराडी घाट आज वेगळाच भासत होता, हळूहळू उन वर चढू लागली आणि ९ वाजण्याचा सुमार झाला असेल नसेल तेव्हढ्यात २-४ रावतांनी अक्षरशः कर्कश आवाजात गलका केला..गोंगाट करून ओरडू लागले..

“उठा……उठा….. गिलचे आले……गनीम आले…. उठा……उठा…..”

कावरेबावरे झालेल्या जानराव बावळ्यान्नी नजर रोखून पहिले तर गनिमांच्या रांगाच रांगा दिसू लागल्या, जानराव सावध पवित्रा घेत म्हणाले

“चला.. उठारं..   बोला…… हर हर महादेव…. हाना… मारा…. माग सरू नगासा”

समद्या रावतांना जणू चेव चढला आणि बंदुका आग ओकू लागल्या.. तलवारी तळपू लागल्या…. गीलच्यांनीही मग जम्बुरक्यामधून आगी धडाडन्यास सुरुवात केली.. बंदुकीतून गोळ्यांचा जणू वर्षाव सुरु केला….

अफगाणांचा असंख्य फौजफाटा पाहून जानरावांनी कुमकीसाठी दत्ताजीकडे टाकोटाक स्वार पाठीवले..

ही खबर मिळताच दत्ताजी शिंद्याच्या अंगाअंगातून वीज सळसळून गेली…. जणू काही दत्ताजी या क्षणाची वाट पहात होते..

विलंब न करता दत्ताजींनी ३ तुकड्या केल्या अन आपल्या आवडत्या अन सजवलेल्या लालमणीवरून रणांगनाकडे टाच मारली.. हातात तळपती तलवार….

लालमणीचा लगाम खेचत अन हर हर महादेव चा गजर करत दत्ताजी अन मराठा सैन्य विजेच्या त्वेषाने रणांगणाकढे झेपाऊ लागल.. गिलच्यांच्या नरडी कधी फोडणार अन त्या नरडीचा घोट कधी घेतो या नुसत्या कल्पनेने मराठे झेपावत होते…. अंगाअंगावर रोमांच फुलात होते..

हा हा म्हणता काही वेळातच दोन्ही फौजा एकमेकाला भिडल्या, नुसता हाहाकार माजला..  अफगानाकडे जशा बंदुका होत्या, जशी शस्त्रे होती त्याच्या तोडीस मराठ्यांकडे होत्या फक्त तळपत्या तलवारी… यामुळे काही वेळातच घाटात रूप पार पालटून गेले….

मराठ्याकडे बंदुका जवळजवळ नव्हत्याच, त्यामुळे अर्थातच मराठ्यांच्या रक्ताचा पाट वाहू लागला.. मराठ्यांच्या मुडद्याचे ढीग दिसू लागले.. कुणाचा बाप मेला कुणाच्या पोराने तडफडत समोर जीव सोडला, कुणाचा काका तर कुणाचा चुलता.. पण याचे भान होतेच कुणाला ? दिसत होती ती फक्त अफगाणी घुबडे अन त्यांच्या मुंड्या… काही वेळातच मराठ्यांच्या हाडामासाचा नुसता चिखल दिसू लागला.. मराठ्यांच्या सळसळनाऱ्या रक्ताचे नुसते पाट वाहू लागले, त्या रक्तातून ही अफगाणी घुबड पळत होती… त्या रक्तावरून घसरत होती… जगदंब ! जगदंब !

अशी पडझड चालल्याची भयंकर खबर दत्ताजी पर्यंत पोचते न पोचते तोच कमी कि काय म्हणून आणखी २ धक्कादायक खबरी येऊन धडकल्या…. मालोजी फौजेसह मराठ्यांच्या मुडद्याच्या राशीत बेपत्ता झाले आहेत अन उरल्यासुरल्या फौजेनिशी बुराडी  फौजेनिशी बुराडी घाटाकडे माघारा फिरत आहेत…. अन दुसरी म्हणजे  गनिमांनी एकाच वेळेत तिन्ही बाजूंनी हमला केला आहे..

रणमदाने बेहोष झालेला दत्ताजी शिंदे लालमनीवर स्वार झाला, लालमणी थुईथुई नाचू लागला, मर्द मराठा जवान वीर, शिरावर शिरस्त्राण, पाठीवर ढाल, हातात तळपती तलवार असा दत्ताजी चा रणमर्दाचा अवतार पाहून मराठ्यांना नव-स्फुरण चढले.. 

“हर हर महादेव” चा जयघोष करत या मर्दाने जणू काळावर झेपावे तसा लालमणी गनिमांवर घातला..

तलवारीच्या घावासरशी मुघली घुबडांचे मस्तक उडवू लागला.. बिनामुंडक्याच्या धडातून रक्ताची चिळकांडी उडत होती..

उडालेल्या मुंडक्याचा खच दिसत होता तसे मराठे बंदुकीलाही घाबरेना झाले अन आपसूक मुघली बंदुकीच्या टप्प्यात येऊ लागले.. हळूहळू मराठे निपचित पडून दिसेनासे होऊ लागले.. तसा दत्ताजीच्या जवळ येऊन तानाजी खराडे म्हणाला

“बाबा पडती बाजू झालिया.. कुनीबी दिसना गेलया, निशाण गुंडाळाव अन निघावं”

हे ऐकताच दत्ताजी जणू कडाडलाच….

”या रणांगणासाठीच अन या दिसासाठीच तर माझा जन्म आहे, दत्ताजी यमासमोर देखील उभा टाकील मग ह्या घुबडांना पाठ दाखवू ? शक्य नाही “

इतका वेळ निशाणापाशी झुंजत असलेला जनकोजी दंडावर गोळी लागल्याने घोड्यावरून खाली कोसळला, कुणीतरी घाबरून अन ते भयावह दृश्य पाहून  दत्ताजींना म्हणाले

“बाबा, घात झाला….जनकोजीबाबा ठार झाले”

दत्ताजींच्या कानाच्या पाळ्या तप्त झाल्या, बाहू स्फुरण पावू लागले, अंगातले रक्त लाव्ह्याप्रमाणे उसळू लागले.. जगदंबे आज तुझे भुत्ये इथे राक्षसाचे मर्दन करणारच या भावनेने अन सुडाने दत्ताजी नुसता धगधगत होता… रागाने लालबुंद झालेला दत्ताजी हातात तलवार घेऊन पुढे झेपावत होता..

एव्हड्यात डोळ्यासमोर हलकट नजीब दिसताक्षणी क्षणाचाही विलंब न लावता हातातील समशेर उंच उडवत “हर हर महादेव…. जय भवानी” च्या जयघोषात दत्ताजी आवेशाने नजीबाकडे झेपाऊ लागला आणि वाटेतल्या अफगानावर तुटून पडला.. समशेरीच्या दणक्यासरशी अफगाणी माकडांची मुंडकी उडवू लागला, सपासप बरगडीत तलवार घुसवू लागला..

इतक्यात अचानक एक जम्बुऱ्याचा गोळा धडधडत येऊन दत्ताजीच्या बरगडीस छेदून लालमणीवर धडकला तसा दत्ताजी खाली पडला.. निपचित पडलेल्या आपल्या प्रिय लालमणी कढे पाहू लागला….

नजीबाला अन कुतुबशहाला हे दृश्य पाहताच आकाश ठेंगणे झाले.. दोन्ही सैतानासारखे दत्ताजीकडे झेपावले..

दत्ताजी तळमळत असलेला पाहून कुतुबशाहने दत्ताजीची मान पकडली अन हातातले खंजीर दत्ताजीच्य्या डोळ्यासमोर नाचवत म्हणाला….

“बोलो पाटील…….और लढोगे?”

हे ऐकताच दत्ताजींनी सर्व ताकत एकवटत वाघासारखी डरकाळी फोडली…..

“क्यों नही? बचेंगे तो और भी लडेंगे”

मराठा वीराची ही जिद्द, ही डरकाळी कानावर पडताच कुतुबशहा कुत्र्यासारखा दत्ताजींच्या अंगावर बसला अन हातातल्या खंजिराने दत्ताजींच्या छातीची चाळणी करू लागला.. अंदाधुंद खंजीर छातीत घुसवू लागला..  अशातच अंगात संचारलेल्या हैवानासारखा नजीब हे दृश्य पाहून बेभान झाला अन झटक्यात हातातला जमदाडा दत्ताजीच्या मानेवर घातला अन दत्ताजीची मान धडावेगळी केली.. दत्ताजीची मान खाली पडली तरीही चेहऱ्यावरचे ते सूर्यासारखे तेज अन डोळ्यातील अंगार पाहून नजीब आणखीन चेताळला..

दत्ताजीचा देह हळूहळू रक्ताने पूर्ण माखत माखत थंड पडू लागला..

या हरामखोर नजीबाने जवळच्या एका रोहील्याच्या हातातला भाला हिसकावून घेतला अन दत्ताजीचे मुंडके हातात घेऊन भाला त्यात खसकन खुपसला.. अन तो भाला हवेत उडवू लागला…..

आणि तसाच बेधुंद झालेला नजीब पळणाऱ्या मराठ्यांना अभय द्यायचे सोडून पाठलाग करून कत्तल करण्याचा आदेश देऊन तो मुंडके खोवलेला भाला घेऊन नाचत नाचत अब्दालीकडे निघून गेला…..

बुराडी घाटाच्या त्या धरणीमातेला स्वतःचा ठोकाच जणू चुकल्यागत वाटू लागले…. नदीच्या पाण्याला दिशा सैरभैर वाटू लागली…. अवतीभवतीच्या झाडाला, पानांना कंठ दाटून आला…. हे भयावह दृश्य पहात असलेले अफगाणी गिलचे देखील स्तब्ध झाले..

आपल्याच स्वतःच्या धरणीवर या मर्द मराठ्याने बुराडी घाटाच्या त्या रणांगणावर रक्ताचा अभिषेक केला…. पण निश्चय मात्र तिळमात्र ढळू दिला नाही.. ना माघार घेतली ना नुसता माघार घेण्याचा विचार केला……

अशा नरपुत्राला, रणमर्दाला, मर्द मराठ्याला, सह्याद्रीच्या ढाण्या वाघाला, आम्हां तमाम मावळ्यांचा त्रिवार मुजरा…

“दत्ताजी आमचा जीव जाईल… कदाचित चंद्रतारेही नष्ट होतील…… परंतु आपल्या अतुलनीय अनाकलनीय साहसाला बलाढ्य पराक्रमाला हा बुराडी घाटच काय पण आम्ही असंख्य मावळे आम्ही मराठे कधीही विसरू शकणार नाही”

☀🔥⛳|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी....||⛳🔥☀

Sunday, 18 December 2016

कवी कलश -शंभूराजे

अजरामर मैत्रीचे प्रतीक कवी कलश -शंभूराजे

कविची जातकुळी त्याच्या रंगावरून वा वर्णावरून जोखली जात नाही. ती
त्याच्या शब्दसामर्थ्यावरून मापली जाते. तेव्हा औरंगजेबासमोर अकलूज येथे
कवी कलश आणि शंभूराजांना साखळदंड आणि काढण्या लावून उभे केले होते.
तेव्हा हे दोन्ही राजबंदी आपल्या हाती खरेच गवसले आहेत का यावर
औरंगजेबाचा विश्वास बसत नव्हता.

तो आपल्या सिंहासनावरून अचंब्याने खाली उतरून जमिनीवर नाक रगडून
अल्लातालाला लाख लाख दुवे देऊ लागला होता. तेव्हा तो देखावा पाहून कवी
कलशांच्या मुखातून विजय- उन्मादाने कोणते शब्द बाहेर पडले पाहा;

'यावन रावन की सभा संभू बंध्यो बजरंग
लहू लसत सिंदूर सम खूब खेल्यो रनरंग
ज्यो रवि सारी लखतही, खद्योत होत बदरंग
त्यो तूव तेज निहार के तख्त त्यजो अवरंग.'

(अर्थ - रावणाच्या सभेत जैसे जखडूनी उभे केले हनुमाना
औरंगदरबारी तसाच ठाकसी उभा तू मराठ्यांच्या पंचप्राणा.
शेंदुरासवे रणरंग माखला अंगावरी तुझ्या रे भाग्यवंता
काजव्याचा जळतो टेंभा सूर्यबिंब देखता।
दिव्य मुरत, नखरा नजाकत पाहुनी झुकली दिल्ली
मुजर्‍यास्तव तुझ्या औरंग्या तख्त उतरून येई खाली)

मराठ्यांना कावेबाज शत्रूंचे अंतरंग कधी ओळखता आले नाही आणि दिलदार
दोस्तांची यारीदोस्तीही कधी जोखता आली नाही!

आजमितीला कवि कलशाइतका मराठी इतिहासात कोणी दुष्ट, कपटी आणि बदनाम खलनायक
दुसरा नाही.  मराठी नाटककारांना इतके सुंदर कुपात्र सापडल्यावर त्यांनी
त्याच्याभोवती एकापेक्षा एक नाट्यप्रसंग चितारले. कलश म्हणे कब्जी,
महाकारस्थानी, महापाताळयंत्री. उलट्या काळजाचा. व्यसनांचे वारूळ म्हणजेच
कवि कलश! ज्याने शिवाजीराजांच्या संभाजी नावाच्या कोवळ्या राजकुमाराला
मद्यपी बनविले आणि सरतेशेवटी संभाजीसह मराठ्यांचे राज्य बुडवायचे पापकर्म
केले.

संभाजीराजांनी कवि कलशांना 'छंदोगामात्य' व 'कुलयेख्तियार' असे दोन किताब
दिले होते. त्यांचा समावेश आपल्या अष्टप्रधानांमध्ये केलेला होता. तसेच
पोर्तुगीजांच्या सुद्धा १६८४मधील दोन पत्रांमध्ये ''संभाजीराजांचा
सर्वेच्च प्रधान'' असा कवि कलशांचा उल्लेख करण्यात आला आहे. यावरूनच कवि
कलश हे संभाजीराजांचे अत्यंत निकटतम मित्र होते याबद्दल शंकाच नाही.
संभाजीराजांनी 'बुद्धभूषण' हा संस्कृत ग्रंथ लिहिला. तसेच 'नखशिख',
'सातसतक', 'नायिकाभेद' हे तीन ब्रिज भाषेतील ग्रंथ लिहिले. या
ग्रंथरचनेवेळी संभाजीराजांना कवि कलशांच्